ओझोनच्या थरातील छिद्राचे काय झाले? - स्टेफनी हॉन्चेल स्मिथ
490,791 views |
स्टेफनी हॉन्चेल स्मिथ |
TED-Ed
• April 2023
1980 च्या दशकात, जगाला एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागला: ओझोनच्या थरात वेगाने विस्तारणारे छिद्र. जर ते वाढतच राहिले असते, तर त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण गगनाला भिडले असते, प्रकाशसंश्लेषण बिघडले असते, कृषी उत्पादनात घट झाली असती आणि संपूर्ण परिसंस्था कोलमडून पडली असती. तर, काय झाले? स्टेफनी हॉन्चेल स्मिथने ओझोन थर पुनर्संचयित करण्यासाठी निर्णायक जागतिक सहकार्याने कशी मदत केली हे शेअर केले. [डेनिस स्पोलिटक द्वारे दिग्दर्शित, पेन-पेन चेन यांचे कथन, स्टीफन लारोसा यांचे संगीत].