Return to the talk Watch the talk

Subtitles and Transcript

Select language

Translated by CHIDANAND PATHAK
Reviewed by Anuradha Pathak

0:11 दीर्घकाळ टिकणारे असते नेहमीच वस्तूचे मोल. आपण नेहमीच पैशाचे मूल्य मिळविण्याच्या प्रयत्नात असतो. पण लक्ष देत नाही अधिकांसाठीच्या मूल्याकडे, पैशाचे मूल्य निर्माण करताना. आपण पर्वा करतो का चारशे कोटी लोकांची? ज्यांची रोजची मिळकत दोन डॉलर पेक्षा कमी आहे? ज्याना तळागाळाचे अशी सम्भावना केली जाते ? आव्हाने तरी काय आहेत पैशाचे मूल्य मिळविण्याबाबत , तसेच सर्वांसाठीचे मूल्य ? इथे आपण विवेचन केले आहे कृती च्या संबंधात तसेच पैशाच्या. तुमच्याजवळ पैसे असतील तर अर्थातच त्याचे मूल्य मिळते . तुम्ही एक मर्सिडीज गाडी मिळवू शकता खूप जास्त किमतीची . खूप जास्त क्षमतेची . पण पैसे नसतील तर काय होते? तुम्ही एक दुचाकी चालवता . स्वताचे आणि आणखी दुसरे वजन बाळगत . तुम्हाला रोजी रोटी मिळावी यासाठी. गरीब हे गरीबच राहत नाहीत ते मध्यमवर्गीय बनतात. आणि तसे झाले तर, अर्थातच त्यांच्या परिस्थितीत फरक पडतो, ते स्कूटर चालवितात . पण आव्हान असे आहे की त्याना त्याचे मूल्य मिळत नाही, कारण त्याना स्कूटर पेक्षा काही परवडत नाही. मुद्दा असा आहे की त्याच पैशात, आपण त्यांना अधिक मूल्य देवू शकतो का ? उत्तम मूल्य, मोटार गाडी चालविण्याच्या संबंधात, सुरक्षा आणि प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, प्रत्यक्षात अशक्य वाटते, नाही का ?

1:36 आता हे पहा जे आपण भारतातील रस्त्यांवर पाहतो नेहमीच . सर्वजण तेच पाहतात पण निरनिराळ्या तर्हेने विचार करतात . त्यातले एक आहेत रतन टाटा. आपल्या पुढार्यांचे मोठेपण असे आहे की त्यांच्या अंतःकरणात केवळ उत्कटता असायला पाहिजे असे नाही तर, जी बहुतेकांच्यात असते, पण त्याच बरोबर ते बदल घडवणारे सुद्धा असतात . नवसाम्प्रदायी प्रवर्तकाला काही करता न येणे माहित नसते . गोष्टी करता येतात यावर त्याचा विश्वास असतो . पण रतन टाटा सारख्या श्रेष्ठ पुढार्यापाशी अनुकंपा असते लक्ष्मी तू म्हणालीस ते पूर्णपणे बरोबर आहे: फक्त रतन टाटा बद्दलच नाही तर टाटा उद्योग समुहाबद्दल ते खरे आहे . ती जे म्हणाली ते मी सिद्ध करतो. होय ; मी शाळेत अनवाणी जात असे १२ वर्षाचा होई पर्यंत . मी कष्ट घेतले (अस्पष्ट) फार मोठा प्रश्न होता. आणि मी शालांत , अकरावी उत्तीर्ण झालो, एक लाख पंचवीस विद्यार्थ्या मध्ये ११ वा येऊन . पण मी शाळा सोडण्याच्या विचारात होतो, कारण माझ्या गरीब आईला माझे शिक्षण परवडणारे नव्हते. त्यावेळी सर दोराबजी टाटा ट्रस्ट ने मला दिले दरमहा सहा रुपये सुमारे एक डॉलर , अशी सहा वर्षे. म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे. तर असा हा टाटा उद्योग समुह. (टाळ्या) नव निर्मिती , अनुकंपा आणि उत्कटता. यांचा संयोग.

2:55 आणि ही अनुकंपा त्याना चिंताजनक झाली, कारण त्यांनी जेव्हा पाहिले ...खरे तर मला आठ , नऊ वर्षापूर्वी सांगितले स्वतःची गाडी चालविताना —- तसे स्वतःची गाडी तेच चालवितात— आणि पावसात त्यांनी पाहिले, एक कुटुंब , जे मी तुम्हाला दाखवले. चिंब भिजलेले, एका तान्ह्या बाळासह. आणि मग ते म्हणाले ” मी त्याना परवडणारी मोटारगाडी द्यायला पाहिजे, एक लाख रुपये —दोन हजार डॉलर — किमतीची." अर्थातच तुम्ही जेव्हा असे म्हणता तेव्हा लोक म्हणतात हे अशक्य आहे. सुझुकीही तेच म्हणाले. ते म्हणाले ” फार तर ते एक तीन चाकी रिक्षा बनवतील स्टेपनी सह " तुम्ही हे व्यंग चित्र पहा . टाटांनी हे नाही बनविले. एक खरी गाडी बनवली —नानो लक्षात घ्या , माझी उंची सहा फूट अर्धा इंच आहे. रतन माझ्यापेक्षा उंच आहेत . आणि आम्हाला बसायला पुढे पुरेशी जागा आहे तशीच या (नानो )गाडीत मागेही आहे . एक अविश्वसनीय गाडी . आणि यशासारखे दुसरे यश नाही; काही आधीचे शंकेखोर नंतर बदलले, एकामागून एक आणि म्हणू लागले ” आम्हालाही याच प्रकारची गाडी बनवायची आहे, आणि आम्ही नानो प्रकारची गाडी बनविणार ".

4:02 ही मोठी गोष्ट कशी घडली, नानो बनविण्याची ? मी त्याबाबत थोडे सांगतो . उदाहरणार्थ , त्यांनी कशी सुरुवात केली रतनने अवघ्या पाच इन्जीनियरांच्या चमुबरोबर सुरुवात केली, तरुण मुले , विशीतली. आणि ते म्हणाले मी गाडीचा आराखडा नाही सांगणार पण किंमत काय असावी ते मात्र सांगणार आहे . ती आहे एक लाख रुपये आणि तुम्ही ती तेवढ्या रकमेत करायची आहे" आणि त्यांनी सांगितले, “उत्तरे माहित नसलेले प्रश्न विचारा . (बुद्धीला ) ताण द्या ” आणि एका योग्य क्षणी, ते या संपूर्ण आव्हानात इतके गर्क झाले, कि त्या चमूचा एक भाग बनले . तुमचा विश्वास बसतो आहे ? मला एक गोष्ट अजून सांगितली जाते आहे, वायपरची. ज्याचा आराखडा बनविण्यात त्यांचा सहभाग होता . मध्य रात्री पर्यंत ते विचार करीत. आणि भल्या सकाळी काहीतरी तोडगा घेऊन येत. पण चमूचा मुख्य कोण होता ? त्याचे नाव गिरीश वाघ . एक ३५ वर्षाचा मुलगा आणि या नानो चमूचे सर्व साधारण वय होते फक्त सत्तावीस वर्षे .

5:02 आणि त्यांनी आराखड्यात नवीन बदल करण्यापलीकडे जाऊन पारंपारिक संकेताची प्रमाणे प्रथमच मोडली. उदाहरणार्थ , दोन सिलिंडरचे gas इंजिन जे ‘ सिंगल सिलिंडर बलन्सर शाफ्ट (Single cylinder balancer shaft ) च्या गाडीत वापरले जात होते . त्यात ‘रिवेट ’च्या ऐवजी चिकट पदार्थ वापरला जात होता. ही सह निर्मिती होती , फार मोठी सह निर्मिती , विक्रेते आणि पुरवठादार यांच्या बरोबर . सर्व संबंधित कल्पनांचे इथे स्वागत असायचे . १०० पुरवठा दारांचे कारखान्याच्या जवळपास पुनर्वसन झाले आणि मोटारीच्या व्यवसायातील विक्रेत्यांच्या नवीन प्रतिकृती निर्माण केल्या . कल्पना करा एक व्यापारी जो कपडे विकतो , तो नानो विकणार होता . मला वाटते , हे अविश्वसनीय परिवर्तन होते . ऑटो क्षेत्राच्या बाहेर असलेल्यांसाठी वाटा शोधणे . ते एक उघड परिवर्तन होते . मुक्त कल्पनांचे तिथे स्वागत होते . हेलीकोप्टर मधील बैठका व खिडक्यांच्या रचनेचा वापर केला होता . तसेच दाश बोर्ड (dash board) चाही स्वयंचलित दुचाकी तून प्रेरणा घेऊन . इंधन वाहण्याच्या नळ्या आणि दिवे हे दुचाकी मधल्या सारखे होते .

5:58 आणि मेख मात्र अशी होती किमानातून अधिक मिळविणे . सर्वकाळ तुम्हाला एक चौकट (अट) होती तुम्ही त्याचे उल्लंघन करायचे नव्हते . ते म्हणजे एक लाख रुपये किंवा दोन हजार डॉलर . म्हणून प्रत्येक घटकाचे . दुहेरी कार्य असणे आवश्यक होते . उदाहरणार्थ , बैठक उंचावणारे उपकरण बैठक उंचावताना मूळ आराखड्यातील कणखर पणाही जपते . सुमारे निम्मे भाग नानो मध्ये तेच आहेत . सर्व साधारण गाड्यांच्या तुलनेत. लांबी ८ % कमी आहे . पण सध्या सुरुवातीच्या गाडया तुलनेत आठ टक्के कमी असल्या तरी आतली जागा २१ टक्के जास्त आहे .

6:41 आणि हे झाले होते —— कमी मधून अधिक तुम्हीच पहा , किती जास्त कमीतून. जेव्हा मोडेल T (बाजारात ) आले आणि हे सर्व आकडे २००७ च्या डॉलरच्या भावा नुसार जुळवून घेतले आहेत . फोर्ड चे मोडेल T 19700 डॉलर होते वोक्सवागन 11333 आणि ब्रिटीश मोटार 11,000 आणि नानो चक्क २००० डॉलर . आणि म्हणूनच सुरुवात झाली एका खरोखरीच्या नव्या प्रारूप बदलाला , जिथे तेच लोक , जे गाडीत बसण्याचे स्वप्नही पाहू शकत नव्हते जे त्यांचे सर्व कुटुंब स्कूटर वर नेत होते , ते गाडीत बसण्याची स्वप्ने पाहू लागले आणि ती स्वप्ने आता खरी होत आहेत . हे छायाचित्र पहा एक घर , वाहन चालक आणि गाडी यांचे माझ्या घराजवळ चालकाचे नाव नारायण आहे. त्याने स्वतःची नानो गाडी विकत घेतली आहे . आणि तुम्हाला दिसत असेल , एक जागा निर्माण झाली आहे त्याच्यासाठी, मालकाबरोबरच त्याची गाडी पार्क करायला . पण त्याहून महत्वाचे की त्यांनी निर्माण केली आहे एक जागा त्यांच्या मनात. “होय , माझा वाहन चालक स्वतःच्या गाडीतून येऊन इथे गाडी पार्क करणार आहे" आणि म्हणूनच त्याला मी परिवर्तनशील नाविण्यपूर्ण बदल म्हणतो केवळ यांत्रिक नव्हे हे आपण बोलतो ते सामाजिक परिवर्तन आहे.

8:03 आणि तिथेच असलेली , सभ्य स्त्री , पुरुषहो, ही प्रसिद्ध संकल्पना जास्तींसाठी कमीतून जास्त ही महत्वाची ठरते . मला आठवते आहे , याबद्दल मी प्रथम ऑस्ट्रेलियात बोललो , सुमारे दीड वर्षापूर्वी ज्यावेळी त्यांनी मला दिले सन्मान्य सभासदत्व . आणि आश्चर्य म्हणजे ४० वर्षातील हा मान मिळालेला मी पहिला भारतीय होतो . आणि माझ्या भाषणाचा विषय होता अर्थातच “भारतातील नवीन बदल गांधींपासून गांधीप्रणीत अभियांत्रिकी पर्यंत" आणि मी हे नामकरण ’जास्तींसाठी कमीतून जास्त ' गांधीप्रणीत अभियांत्रिकी असे केले . आणि माझ्या मते गांधी प्रणीत अभियांत्रिकी, हेच जगाला पुढे नेणार आहे ,. आणि बदल घडवणार आहे , काही मोजक्यांसाठी नाही , तर सर्वांसाठी . गाडीच्या गतीशीलतेतून व्यक्तिगत चलनशीलतेकडे आता वळतो , त्या दुर्दैवी लोकांसाठी ज्यांनी आपले पाय गमावले आहेत . हा आहे एक अमेरिकन नागरिक आणि त्याचा मुलगा , ज्याचा पाय कृत्रिम आहे . त्याची किंमत काय आहे ? २० ,००० डॉलर आणि अर्थातच हे पाय असे बनविले आहेत कि जे चालू शकतात फक्त परिपूर्ण पदपथ किंवा रस्त्यावर .

9:09 दुर्दैवाने भारतात तशी परिस्थिती नाही . हा पहा , अनवाणी चालतो आहे . खडबडीत पृष्ठभागावरून , कधी कधी दलदलीतून , इत्यादी इत्यादी . आणि जास्त महत्वाचे की, ते कामावर जाण्यासाठी लांबवर चालत तर जातातच आणि सायकल वरून कामाला जातात इतकेच नाही पण ते कामासाठी सायकल वापरतात , जसे तुम्ही इथे बघताय . आणि त्यासाठी त्याना वर चढावे लागते . ही परिस्थिती लक्षात घेवून कृत्रिम पायाचा आराखडा बनवावा लागतो अर्थातच हे एक आव्हान आहे . ४०० कोटी लोक , ज्यांचा रोजगार दोन डॉलर आहे . आणि तुम्ही २० ,००० डॉलरच्या पायाबद्दल जर बोलत असाल, तर तुम्ही १० ,००० दिवसांच्या रोजगाराबद्दल बोलत आहात . हे अजिबात शक्य नाही आणि म्हणून तुम्हाला पर्यायांकडे पहावे लागते

9:47 आणि त्यामुळेच जयपूर फूटची निर्मिती झाली . त्यात उपभाग जोडणी आणि हालचालीची क्रांतिकारी यंत्रणा होती , संचातून जलद आकार घेणारे प्रमाणित स्वतंत्र भाग जागेवरच बेतशीर मापात अवयवांवर अचूक बसतील असे . तुम्हाला एका तासातच त्याची सवय होते , जेव्हा तशा तर्हेच्या दुसऱ्या पायांना एक दिवस सुद्धा लागतो . बाहेरची खाच उच्च घनता असलेल्या गरम पोलीथिन नळ्यापासून केली तापविलेल्या पत्र्याची न करता आणि विशिष्ठ घोट्या पर्यंतची मानवसदृश रचना (असंदिग्ध ) कार्य . आणि ते कसे दिसते मी दाखवतो आणि ते कसे कार्य करते . (संगीत ) पहा , हा उड्या मारतो आहे . किती कष्ट होत असतील

10:36 गुढग्याच्या खाली अवयव असलेला कुणीही हे करेल . पण त्यावर ? होय , अवघड आहे . “दुखले का ?” “ नाही —, बिलकुल नाही ” तो ४ मिनिटे आणि तीस सेकंदात एक किलो मीटर धावतो

10:56 एक किलो मीटर ४ मिनिटे आणि तीस सेकंदात टाळ्या तर हे सर्व असे आहे म्हणून ‘Time’ ने त्याची दखल घेतली . या २८ डॉलर किमत असलेल्या पायाची . टाळ्या अविश्वसनीय गोष्ट खरीच .

11:23 जरा दुसरीकडे वळू या . मी बोलतोय कमीतून जास्त, जास्त लोकांसाठी आपण आरोग्याकडे वळू या . आपण चलन वळण वगैरे बद्दल बोललो . आता आरोग्याबद्दल बोलू या . काय घडतंय आरोग्य क्षेत्रात ? तुम्हाला माहित आहेच , नवीन रोगासाठी नवीन औषधे लागतात . आणि तुम्ही औषधी द्रव्याचा १० वर्षा पूर्वीचा आणि आताचा विकास पहा काय घडले ? १० वर्षापूर्वी ज्याला २५ कोटी रुपये लागायचे त्याला आता दीडशे कोटी लागतात . पदार्थातील रेणू बाजारात यायला वेळ लागतो , मानवावर आणि प्राण्यावरच्या चाचण्या झाल्यावर १० वर्षे लागायची , आता १५ लागतात . जास्त पैसे आणि जास्त वेळ खर्च केल्याने , तुम्हाला जास्त औषधे मिळतात का ? नाही , मला खेद आहे . पूर्वी ४० मिळायची , आता ३० मिळतात म्हणजे प्रत्यक्षात ज्यास्तीतून कमी . कमी कमी लोकांसाठी. कमी कमी लोकांसाठी का ? तर ती महाग आहेत म्हणून . खूप कमी लोकाना ती परवडतील .

12:14 एक उदाहरण घेऊया . सोरायसिस फारच भयंकर असा त्वचेचा रोग आहे . उपाययोजनेचा खर्च २०,००० डॉलर आहे . त्वचेखालील एक प्रतिद्रव्य इंजेक्शन १००० डॉलरचे आणि अशी २०. विकसित करायला लागली १० वर्षे आणि ७० कोटी डॉलर. आपण या विचाराने सुरुवात करू या . कमीतून जास्त आणि जास्तींसाठी आणि समोर काही उद्दिष्ट ठेवून. उदाहरणार्थ आपल्याला २०, ००० डॉलर नकोत ; आपल्याकडे ते नाहीत . आपण १०० डॉलरमध्ये करू शकतो का ? विकसनासाठी काल ? १० वर्षे नकोत . आपल्याला घाई आहे ; ५ वर्षे विकसनाचा खर्च —- ३० कोटी डॉलर . माफ करा ; मी १ कोटी पेक्षा ज्यास्त खर्च करू शकत नाही अगदीच धाडसी वाटते . काहीच्या बाहीच वाटते .

12:55 पण माहिती आहे ? हे भारतात साध्य झाले आहे . ही उद्दिष्टे भारतात साध्य झाली आहेत . आणि कशी साध्य झालीत? सर फ्रान्सिस बेकन एकदा म्हणाले होते , “जेव्हा तुम्हाला परिणाम साधण्याची इच्छा असते , जे पूर्वी साधलेले नाहीत, तेंव्हा असा असंभाव्य विचार करणे शहाणपणाचे नसते कि ते अशा पद्धतीनी वापरून साध्यं होतील ज्या पूर्वी वापरलेल्या आहेत .” आणि म्हणुन , प्रमाणभूत प्रक्रिया , ज्यात तुम्ही रेणू विकसित करून उन्दरामध्ये, माणसामध्ये घालता , काही हवे ते परिणाम साधत नाही कोट्यावधी रुपये खर्च झालेले असतात . भारतीय हुशारी त्यांचे पारंपारिक ज्ञान वापरत होती , तरीही , शास्त्रीय पद्धतीने ते सिद्ध करत आणि मानव ते उंदीर ते मानव अशी प्रक्रिया करत, रेणू ते उंदीर ते मानव अशी नाही , बर का . आणि म्हणुन असा फरक पडला आहे . आणि तुम्हाला हे मिश्रण दिसेल पारंपारिक औषधे , आधुनिक औषधे , आधुनिक शास्त्र यांचे . मी एका मोठा कार्यक्रम हाती घेतला (अस्पष्ट ) CSIR मध्ये नऊ वर्षापूर्वी . ते आपल्याला देत आहेत केवळ सोरायसिस नव्हे तर, कॅन्सर आणि तत्सम विविध गोष्टी , प्रतिकृती बदलणार्या . आणि तुम्ही बघू शकाल या भारतीय सोरायसीसची घुसखोरी (अस्पष्ट ) च्या उलट पद्धतीने मिळवलेली वेगळ्या पद्धतीने गोष्टी करून . उपचारापूर्वी आणि नंतर तुम्ही पाहू शकता . खरोखर , हे म्हणजे कमीतून जास्त आणि जास्त लोकांसाठी आहे . कारण हे उपचार परवडण्या सारखे आहेत .

14:05 तुम्हाला आठवण करून देतो महात्मा गांधी काय म्हणाले त्याची . ते म्हणाले “पृथ्वी पुरेसे पुरवते माणसाची गरज भागविण्या पुरते , पण प्रत्येकाची हाव नाही .” तर ते संदेश हा देत होते की तुम्ही कमीतून जास्त आणि जास्तीत जास्त लोकांसाठी निर्माण केले पाहिजे जेणे करून तुम्ही जास्त लोकां बरोबर वाटणी करू शकाल , फक्त चालू पिढीतीलच नाही तर पुढील पिढ्यांसाठी सुद्धा . आणि ते असेही म्हणाले , “ मी सर्वच शास्त्रीय संशोधनाला बक्षीस देईन जी सर्वांसाठी फायदेशीर असतात .” तर ते संदेश देत होते की जास्त लोकांसाठी तुम्ही केले पाहिजे , केवळ थोडयांसाठी नाही. आणि म्हणून स्त्री पुरुष हो, हा विषय आहे , जास्त मिळविणे कमीतून अधिकांसाठी. आणि लक्षात असू द्या , हे केवळ थोडया जास्त, थोडया कमीतून इतकेच नाही , कमी किमतीबद्दल नाही , हे आहे खूपच कमी किमती बद्दल . तुम्ही असे म्हणू शकत नाही की १० ,००० डॉलर चा उपचार, तुम्ही गरीब आहात म्हणून मी तुम्हाला ९ ,००० डॉलर मध्ये देईन . माफ करा , हे चालणार नाही . तुम्हाला ते १०० , २०० डॉलरमध्ये द्यायला लागेल . हे शक्य आहे ? हे शक्य करून दाखवले आहे, काही वेगळ्या कारणांनी. तेव्हा तुम्ही कमी नाही तर खूपच कमी किमती बद्दल बोलत आहात . तुम्ही परवडणार्या बद्दल बोलत नाही, तर तुम्ही सहज परवडणार्या बद्दल बोलत आहात . अशा ४०० कोटी लोकांबद्दल ज्यांचे वार्षिक उत्पन्न दर डोई २ डॉलरपेक्षा कमी आहे . तुम्ही केवळ निवडक बदलाबद्दल बोलत नाही. तर सर्व समावेशक बदला बद्दल बोलत आहात . आणि म्हणून तुम्ही वाढीव बदलाबद्दल बोलत नाही , तुम्ही विस्कळीत करणारया , खीळ घालणार्या बदला बद्दल बोलत आहात . कल्पना अशा पाहिजेत की ज्यावर तुम्ही अगदी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकता . आणि मी पुढे असेही म्हणेन , हे फक्त कमीतून जास्त आणि जास्तींसाठी मिळवणे नाही . जास्तीत जास्त लोकांनी , तर संपूर्ण जगाने .त्यावर काम केले पाहिजे .

15:39 एक दिवस पाहिलेल्या बदलाने मला खूप हेलावले . नवजात अर्भकाना उब देणारी साधने , उदाहरणार्थ , ते आफ्रिकेत मिळत नाहीत . भारतातील खेड्यांमध्ये सुद्धा मिळत नाहीत. आणि अर्भके मरतात . उबवणी उपकरणाची किमत आहे २ ,००० डॉलर . आणि हे आहे २५ डॉलरला मिळणारे साधन . तोच परिणाम साधणारे. आणि कुणी बनविले ? स्टेनफोर्ड युनिवर्सिटी च्या विद्यार्थ्यांनी , मूलतः अतिशय परवडणार्या प्रकल्पांतर्गत . त्यांचे अंतःकरण योग्य जागी होते , रतन टाटा सारखे. हा केवळ बदल , अनुकंपा किंवा उत्कटता नाही —- हृदयात अनुकंपा आणि पोटात उत्कटता . असे नवे जग आपणास निर्माण करायचे आहे. आणि म्हणूनच गांधीवादी अभियांत्रिकीचा संदेश .

16:18 सभ्य स्त्री पुरुषहो , मी वेळेपूर्वीच संपवतो आहे . मला त्या १८ मिनिटांची धास्ती होती . अजून दीड मिनिट आहे . संदेश , अखेरचा संदेश हा आहे : भारताने जगाला एक मोठी देणगी दिली . काय होती ती ? २० व्या शतकात आम्ही जगाला गांधी दिले . २१ व्या शतकाची भेट , जगासाठी खूप , खूप महत्वाची आहे . जागतिक आर्थिक पडझड असो , कि हवामानातील बदल असो — कुठल्याही समस्येबद्दल तुम्ही बोलत असाल तर ती आहे कमीतून जास्त आणि जास्तींसाठी मिळविण्याची — केवळ सध्याच्या पिढी साठीच नाही, तर पुढल्या पिढ्यांसाठी. आणि ते मिळते फक्त गांधी प्रणीत अभियांत्रिकी मधून . तेंव्हा सभ्य स्त्री पुरुषहो , मला आनंद होतो आहे जाहीर करायला, ही एकविसाव्या शतकाची भेट जगाला भारता कडून , गांधी प्रणीत अभियांत्रिकी .

17:03 टाळ्या .

17:11 लक्ष्मी : धन्यवाद डॉक्टर माशेलकर .( डॉक्टर माशेलकर : खूप धन्यवाद .)

17:14 लक्ष्मी : धन्यवाद डॉक्टर माशेलकर .( डॉक्टर माशेलकर : खूप धन्यवाद .) तुमच्यासाठी एक झटपट प्रश्न . तुम्ही जेव्हा शाळेत एक बालक होतात, तेव्हा तुमचे विचार काय होते , काय व्हायचे होते ? प्रेरणा कशामुळे मिळाली असे वाटते? काही दूर दृष्टी होती ? कशामुळे प्रेरणा मिळाली ?

17:27 डॉक्टर मा .: मी एक कथा सांगतो , जिच्यामुळे प्रेरणा मिळाली , माझे आयुष्य बदलले . मला आठवते मी एका गरीब शाळेत गेलो , कारण माझी आई २१ रुपये जमा करू शकली नाही . अर्धा डॉलर हवा होता ठराविक वेळेत . ती (अस्पष्ट ) माध्यमिक शाळा होती . शाळा गरीब होती , पण शिक्षक श्रीमंत होते , खरच . आणि त्यातले एक पिन्सिपाल भावे होते , ज्यांनी आम्हाला पदार्थ विज्ञान शिकविले . एक दिवशी ते आम्हाला उन्हात घेवून गेले आणि शिकवायचा प्रयत्न केला बहिर्गोल भिंगाचे केंद्र बिंदू पर्यंतचे अंतर. इथे भिंग होते . कागद तिकडे होता . त्यांनी तो वर खाली केला . आणि तिथे एक तळपणारा ठिपका होता. आणि ते म्हणाले हेच ते केंद्र बिंदू पासूनचे अंतर . पण लक्ष्मी , त्यांनी थोडा वेळ तसेच धरून ठेवले . आणि तो कागद जळाला. जेव्हा तो कागद जळाला तेंव्हा काही कारणास्तव ते माझ्याकडे वळले , आणि म्हणाले ” माशेलकर , या सारखी, तुम्ही जर उर्जा विखुरली नाही , तुम्ही जर उर्जा केंद्रित केली, तर जगात हवे ते साध्य करू शकता." तो मला एक फार मोठा संदेश मिळाला : केंद्रित करा आणि साध्य करा . मी म्हटले ” व्वा , शास्त्र किती आश्चर्यकारक आहे , मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे." पण जास्त महत्वाचे हे की केंद्रित करा आणि मिळवा. आणि खरच , तो संदेश, आज समाजासाठी मौल्यवान आहे .

18:35 ते केंद्र बिंदूचे अंतर काय करते ? त्याला समांतर रेषा आहेत . सूर्य किरणाच्या . आणि त्या समांतर रेषांचा गुणधर्म आहे की त्या कधीच भेटत नाहीत. ते बहिर्गोल भिंग काय करते ? ते त्यांची गाठ घालून देते . हे त्या बहिर्गोल भिंगाचे नेतेपण आहे. अलीकडील नेतेपण काय करते आहे ? अंतर्गोलाचे अंतर . ते त्याना अधिकच दूर नेते . म्हणून मी धडा शिकलो बहिर्गोलाच्या नेते पणाचा. आणि म्हणून मी जेव्हा NCL(राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ) मध्ये होतो ( अस्पष्ट ). जेव्हा मी CSIR मध्ये होतो —- ४० प्रयोग शाळा —- एकमेकींशी संवाद नसलेल्या , मी —-( अस्पष्ट ) आणि सध्या मी जागतिक संशोधन केंद्राचा अध्यक्ष आहे , ६० ,००० शास्त्रज्ञ , ९ देशात , भारतापासून अमेरिकेपर्यंत. मी एक जागतिक गट बनवितो आहे , जो जगापुढील मोठ्या आव्हानांना तोंड देईल. हा तो धडा . हाच तो प्रेरणादायी क्षण .

19:24 लक्ष्मी : खूप धन्यवाद . ( डॉक्टर माशेलकर : धन्यवाद .)

19:27 (टाळ्या) ......