Return to the talk Watch the talk

Subtitles and Transcript

Select language

Translated by Ajay Mulay
Reviewed by Chaitanya Shivade

0:11 काही वर्षांपूर्वी, मला जाणवले की मी चाकोरीबद्ध जीवन जगतोय, म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले, म्हणून मी थोर अमेरिकन विचारवंत मॉर्गन स्परलॉक ह्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालायचे ठरविले, आणि ३० दिवस काहीतरी नवीन करायचे ठरविले. कल्पना अगदी साधी सोपी आहे. आयुष्यात नेहमीच कराव्याश्या वाटलेल्या कुठल्यातरी गोष्टीचा विचार करा आणि पुढचे ३० दिवस ती करायचा प्रयत्न करा. असा आहे की, ३० दिवस हा अगदी बरोबर कालावधी आहे तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी — उदाहरणार्थ बातम्या पाहणे. तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी — उदाहरणार्थ बातम्या पाहणे. तुमच्या आयुष्यात नवीन सवय लावून घेण्यासाठी किंवा जुनी सवय सोडण्यासाठी — उदाहरणार्थ बातम्या पाहणे.

0:42 ही ३० दिवसांची आव्हाने पेलवताना मी काही गोष्टी शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे, महिनोन महिने असेच विस्मृतीत जाण्यापेक्षा, हा काळ अधिक संस्मरणीय होता. महिनाभर रोज एक छायाचित्र काढण्याच्या आव्हानाचा हा एक भाग होता. आणि मला व्यवस्थित आठवतेय की मी कुठे होतो आणि त्या दिवशी काय करत होतो. माझ्या हे पण लक्षात आले की जसजशी मी आणखी आणि अधिक कठीण ३०-दिवसांची आव्हाने स्विकारण्यास सुरुवात केली तसा माझा आत्मविश्वास वाढला. माझे रुपांतर मेजाला चिकटलेल्या संगणकी किड्यातून फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले. फक्त मजेसाठी सायकलने कामावर जाणाऱ्या व्यक्तीमध्ये झाले. मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला. मागच्या वर्षी तर मी आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत - किलीमंजारो - सर केला. ही ३०-दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो. ही ३०-दिवसांची आव्हाने सुरु करण्यापूर्वी मी कधीच एवढा धाडसी नव्हतो.

1:27 मला असाही उलगडा झाला की तुम्हाला अगदी मनापासून काही हवे असेल, तर तुम्ही ३० दिवस काहीही करू शकता. तुम्हाला कधी कादंबरी लिहावीशी वाटली? दर वर्षी नोव्हेंबर मध्ये, हजारो लोक त्यांची स्वतःची ५०००० शब्दांची कादंबरी अगदी सुरुवातीपासून लिहायचा प्रयत्न करतात, ३० दिवसांमध्ये. तसं पाहिलं तर, तुम्हाला फक्त प्रत्येक दिवशी १६६७ शब्द लिहायचे असतात, एक महिनाभर. मी ते केले. आणि गुपित असं आहे की, झोपायचंच नाही तुम्ही त्या दिवसाचे सगळे शब्द लिहिले नाहीत - तोपर्यंत. शक्य आहे की तुमचा निद्रानाश होईल. पण तुम्ही कादंबरी नक्की लिहून पूर्ण कराल. आता माझं पुस्तक काय पुढची थोर अमेरिकन कादंबरी आहे का? नाही. मी ती एका महिन्यात लिहिली. ती अतिशय वाईट आहे. पण माझ्या उर्वरित आयुष्यात, जर मी जॉन हॉजमन यांना टेडच्या एखाद्या पार्टीत भेटलो तर, मला असं म्हणावं लागणार नाही की, "मी एक संगणक शास्रज्ञ आहे." नक्कीच नाही, मला वाटलं तर मी म्हणू शकेन की 'मी एक कादंबरीकार आहे."

2:25 (हशा)

2:28 मला सांगायला आवडेल अशी शेवटची गोष्ट म्हणजे मी शिकलो की, जेव्हा मी छोटे, चालू ठेवण्याजोगे बदल केले, जे मी नेहमी करू शकत होतो, तेव्हा ते बहुतेककरून टिकून राहिले. मोठ्या किंवा विक्षिप्त आव्हानांमध्ये चुकीचे काहीच नाही. खरंतर त्यांची मजाच काही और आहे. पण शक्यतो ती टिकणार नाहीत. जेव्हा मी ३० दिवस साखर वर्ज्य केली, एकतिसावा दिवस असा होता.

2:50 (हशा)

2:52 माझा तुम्हाला प्रश्न असा आहे: तुम्ही कशाची वाट पाहताय? मी हमी देतो की पुढचे ३० दिवस कोणासाठी थांबणार नाहीत तुम्हाला आवडो या नावडो, मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे. मग तुम्हाला नेहमीच कराव्याश्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करायला काय हरकत आहे. आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा. आणि पुढचे ३० दिवस त्यासाठी प्रयत्न करून बघा.

3:11 धन्यवाद.

3:13 (टाळ्या)