पृथ्वीच्या पर्यावरणाचे रक्षण करणारी आफ्रिकन दलदल
1,632,177 views |
व्हेरा सॉंगवे |
Countdown Summit
• October 2021
आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील दलदलीचा विस्तीर्ण प्रदेश हिरवाईने नटलेला आहे. हा जगातील अतिशय परिणामकारक अशा कार्बन शोषकांपैकी एक प्रदेश आहे. या प्रदेशातील पर्यावरणाचा विनाश होण्याचा धोका संभवतो. या दलदलीत शोषल्या जाणाऱ्या कार्बनची किंमत ठरवल्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या संसाधनाचे संरक्षण होईल. तसेच हवामान बदलाला अतिशय थोडा हातभार लावणाऱ्या आफ्रिकन समाजांची दखल घेतली जाऊन त्यांना योग्य इनाम मिळेल, असे अर्थशास्त्रज्ञ व्हेरा सॉंगवे सांगताहेत. त्या म्हणतात, "यामागचा हेतू केवळ कार्बन नष्ट करणे असा नाही, तर सन्मानपूर्वक विकास घडवणे हादेखील आहे."