अफगाण मुलींना शिक्षण देण्याचं स्वप्न साकारतंय
2,248,582 views |
शबाना बसिज रसिख |
TEDWomen 2021
• December 2021
शिक्षिका शबाना बसिज रसिख यांनी आपल्या या हृदयंगम व्याख्यानात एक दुःखदायक कहाणी सांगितली आहे. School of Leadership, Afghanistan (SOLA) ही अफगाणिस्तानातील मुलींची निवासी शाळा चालवणारी प्रथम आणि एकमेव संस्था. २०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर SOLA मधून २५० हून अधिक विद्यार्थिनी, कर्मचारी आणि कुटुंबीय यांचं स्थलांतर रवांडा देशात करतानाची ही कहाणी आहे. आशा, लवचिकता आणि अफगाण मुलींच्या पुढच्या पिढ्यांसाठी मोठी स्वप्नं पाहण्याची ही एक अपवादात्मक कहाणी आहे. आणि त्याबरोबर जगाला आवाहन आहे.. त्यांच्याकडे पाठ न फिरवण्याचं.