Patricia Ryan

इंग्रजी भाषेचा/माध्यमाचा आग्रह करू नका.

1,600,023 views • 10:35
Subtitles in 53 languages
Up next
Details
Discussion
Details About the talk
Transcript 53 languages
Translated by Naga rick
Reviewed by Pratik Dixit
0:12

तुम्हाला काय वाटतय याची मला माहिती आहे. तुम्हाला वाटतय मी चुकलेय कुठेतरी. आणि आता एक मिनिटात कोणीतरी या व्यासपीठावर येऊन मला सोबत घेऊन माझे आसन दाखवण्यास मार्गदर्शन करेल. (टाळ्यांचा गजर) हे मला दुबईत नेहेमीच अनुभवास मिळते. तुम्ही दुबईत सुट्टीवर आलात काय? (हास्य) मुलांना भेटावयास आल्या आहात का? किती दिवस आहात तुम्ही इथे दुबईत?

0:38

खरे तर, आम्हाला आशा आहे तुम्ही काही दिवस रहाल इथे दुबईत. मी तीस वर्षापासून खाडीप्रदेशातमध्ये (गल्फ मध्ये) राहतेय आणि शिकवते आहे. (टाळ्यांचा गजर) आणि या काळात, मी बरेच बदल पाहिले आहेत. आणि ती सांख्यिकी जरा धक्कादायक आहे. मला तुमच्याशी आज बोलायचय (इतर) भाषांची हानी आणि इंग्रजीच्या जागतिकीकरणाबाबत मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीबाबत सांगते, ती अबू धाबीत प्रौढांना इंग्रजी भाषा शिकवायची. एक दिवस ती सर्व विद्यार्थ्यांना बागेत निसर्गासंबंधीचे (इंग्रजी) शब्द शिकवण्यासाठी घेऊन गेली. पण खरे तर ती स्वतःच स्थानिक झाडांची सर्व अरबी नावे आणि उपयोग शिकून गेली — त्यांचे उपयोग - वैद्यकीय, सौंदर्यवर्धनातील, स्वयंपाकातील, वनौषधींसंबंधी. हे सर्व (स्थानिक झाडांचे) ज्ञान विद्यार्थ्यांना कुठे मिळाले? त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे. त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांपासून - आई, वडील, आजोबा, पणजोबा वगैरे. या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये. या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये. या सर्व पिढ्यांमध्ये (त्यांच्या भाषेत) बोलाचाली होणे किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याची आवशक्यता नाहीये.

1:42

सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. सध्या या भाषा प्रचंड वेगाने मरतायत. प्रत्येक १४ दिवसात एक भाषा नष्ट होतेय. आणि, याच आजच्या काळात, इंग्रजी ही बिनविरोध जागतिक भाषा आहे. (इतर भाषा मरण्याचे) इंग्रजीशी काही संबंध आहे? मला माहित नाही. परंतु मला हे माहिती आहे की मी बरेच बदल पाहिले आहेत. मी जेंव्हा प्रथम गल्फला आले, मी कुवेतला आले त्या काळात तिथे काम करणे अतिशय कठीण होते फार काळ नाही झाला त्याला ते बहुतेक लवकर झाले. तरीही त्या काळात, ब्रिटीश कौन्सिलने माझी नेमणूक केली इतर २५ शिक्षकांबरोबर आणि आम्ही कोणीही मुस्लीम नसणारे प्रथमच कुवेतच्या शाळेत शिकवणारे शिक्षक होतो. आम्हाला इंग्रजी शिकवण्यासाठी आणले होते कारण सरकारला देशाचे आधुनिकीकरण करायचे होते आणि शिक्षणामार्फत नागरिकांचा विकास करावयाचा होता. अर्थात, यात इंग्लंडचा फायदा झाला त्या गल्फच्या पेट्रोलच्या संपत्तीपासून

2:39

ठीक आहे. आणि हा प्रमुख बदल मी पहिला आहे - इंग्रजी शिकवणे हे कसे बदलले आहे परस्परहिताच्या आचरणापासून ते♫ आजचा प्रचंड आंतरराष्ट्रीय धंदा होण्यापर्यंत. (इंग्रजी भाषा) आता परदेशी भाषा म्हणून कुठल्याही शाळेच्या अभ्यासक्रमात नाही. आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर. आणि इंग्लंडचा एकटा मक्ता राहिला नाहीये तिच्यावर. ती मिळून गेलीय जगातील प्रत्येक इंग्रजी बोलणाऱ्या देशात. आणि का नाही? शेवटी, अत्युत्तम शिक्षण हे जागतिक विद्यापीठांच्या दर्जेनुसार इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते. इंग्लंड आणि अमेरिकेच्या विद्यापीठातच मिळते. म्हणजे, आता सगळ्यांचे शिक्षण इंग्रजीत हवे हे साहजिकच झाले. पण तुम्ही जर स्थानिक भाषा बोलणारे असाल तर, तुम्हाला परीक्षा पास व्हावी लागणार

3:30

आता हे बरोबर आहे का? विधार्थ्याला नकार देणे त्याच्या फक्त (इंग्रजी) भाषेवरील क्षमतेवरून? कदाचित, तो कोणी संगणक शास्त्रज्ञ असेल अतिशय बुद्धीमान उदा: त्याला वकील होण्यासाठी त्याच (इंग्रजी) भाषेची गरज आहे? माझ्या मते नाही. आम्ही इंग्रजी शिक्षक त्या (स्थानिक भाषा बोलणाऱ्या) विद्यार्थ्यांना कायम नाकारतो. आम्ही त्यांना नकार देतो. आणि त्याना रस्त्यातच थांबवतो. त्यांची (शिक्षणाची) स्वप्ने त्या नकारामुळे ते पूर्ण करू शकत नाहीत. जोपर्यंत त्यांना इंग्रजी येत नाही तोपर्यंत. आता मी हे असे समजावून सांगते. समजा, मी फक्त डच भाषा बोलणाऱ्या एका माणसाला भेटले ज्याच्याकडे कॅन्सरचा उपाय आहे मी त्याला ब्रिटीश विद्यापीठात प्रवेश करावयास/शिकण्यास आडवेन का? नाही, बिलकुल नाही. पण खरे तर, आम्ही नेमके तेच (प्रवेश न देणे) करतो. आम्ही इंग्रजी शिक्षक हे त्या प्रवेशद्वारावरचे पहारेकरी आहोत. आणि तुम्ही आमचे आधी समाधान केले पाहिजे की तुम्हाला नीटनेटके इंग्रजी येते याचे आता लोकांच्या छोट्या समूहाला एवढी जास्त ताकद देणे हे धोकादायक होऊ शकते. कदाचित हा अटकाव सार्वत्रिक असावा.

4:37

ठीक आहे. तुम्ही म्हणताय "पण, संशोधनाचे काय? ते सगळे इंग्रजीमध्ये आहे." पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत. संशोधनाची नियतकालिके इंग्रजीमध्ये आहेत. ते स्वपुर्ततेचे भाकीत झाले. ते इंग्रजी आवश्यकतेतून सुरू होते. आणि मग (चक्र) चालू राहते. मी हे विचारते - भाषांतराचे काय झाले? तुम्ही जर इस्लामी सुवर्णयुगाचा विचार केला तर, त्या काळात बरेच भाषांतर झाले. त्यांनी लॅटीन आणि ग्रीकचे भाषांतर अरबी आणि फारसीमध्ये केले. आणि त्याचे भाषांतर युरोपमध्ये जर्मन भाषेत आणि रोमन भाषेत झाले. आणि मग युरोपच्या अंधारमय युगावर प्रकाश पडला. आता मला चुकीचे समजू नका मी इंग्रजी शिकवण्याच्या विरुद्ध नाही सर्व इंग्रजी शिक्षकांनो आपली एक जागतिक भाषा आहे हे मला आवडते. एक जागतिक भाषा असणे ही आजच्या काळाची गरज आहे. पण माझा विरोध आहे त्या भाषेचा उपयोग प्रतिबंध/अडथळा म्हणून करण्याचा. खरच आपल्याला ६०० भाषा नष्ट करून इंग्रजी किंवा चीनी प्रमुख भाषा करायची आहे का? आपल्याला यापेक्षा जास्त काहीतरी हवे आहे. आणि याला (एकभाषीयतेला) सीमा आहे की नाही? हि (एकभाषीयतेची) पद्धत बुद्धिमत्तेला इंग्रजी किती येते यास जोडते हे खरे तर अवास्तविक आहे.

5:57

(टाळ्यांचा गजर)

6:03

आणि मला तुम्हाला याची आठवण करून द्यायची आहे की ज्या श्रेष्ट लोकांच्या खांद्यावर आजचे बुद्धीजीवी उभे आहेत, त्या श्रेष्ठांना इंग्रजी आवश्यक नव्हते. त्यांना इंग्रजी भाषेची परीक्षा पास व्हावी लागत नव्हती. उदा: (आल्बर्ट) आइनस्टाइन (मातृ भाषा: जर्मन) तो शाळेत शिक्षणात कठीण विद्यार्थी समजला जायचा. त्याला खर तर डिस्लेक्सिया होता. (डिस्लेक्सिया म्हणजे लिहायला, वाचायला व समजून घ्यायला येणारी अडचण.) या जगासाठी, सुदैवाने त्याला इंग्रजी भाषेची परीक्षा द्यावी लागली नाही. कारण त्याची सुरुवात १९६४ पर्यंत झाली नव्हती टोफल (TOEFL) मार्फत. (TOEFL - Test Of English as Foreign Language), अमेरिकेची इंग्रजी भाषेची परीक्षा आता त्याचा अतिप्रसार झाला आहे. इंग्रजी भाषेच्या आता अनेक परीक्षा आहेत. आणि लाखो विद्यार्थी दर वर्षी या परीक्षा देतात. आता तुम्ही (आणि मी) असा विचार कराल ती फी फार जास्त नाहीये, ठीकठाक आहे. ती फी मनाई करणारी आहे लाखो गरीब लोकांसाठी आणि त्यामुळे आम्ही तत्काळ त्यांना नकार देतो.

6:54

(टाळ्यांचा गजर)

6:57

माझ्या मनात नुकतीच वाचलेली एक ठळक बातमी येतेय शिक्षण - एक मोठी दुफळी. आता मला समजतय लोक इंग्रजीवर का लक्ष देतात. त्यांच्या मुलांना ते उत्कृष्ट शिक्षण देऊ इच्छित आहेत. त्यासाठी त्यांना हवे आहे - पाश्चात्य शिक्षण. कारण, अर्थात, चांगल्या नोकऱ्या पाश्चात्य विद्यापीठाच्या लोकांना मिळतात. हे मी आधी सांगितले आहेच. हे एक चक्र आहे.

7:23

ठीक. मी तुम्हाला दोन शास्त्रज्ञांची गोष्ट सांगते. दोन इंग्रजी शास्त्रज्ञ प्रयोग करत होते, जनुकशास्त्र (जेनेटिक्स) आणि प्राण्यांच्या पुढच्या आणि मागच्या अवयवावर. परंतु त्यांना जो परिणाम मिळायला हवा तो मिळत नव्हता. त्यांना समजत नव्हते काय कराव याबाबत. शेवटी एक जर्मन शास्त्रज्ञ आले. त्यांच्या लक्षात आले की ती दोघे दोन शब्द (विभाग) वापरत होते पुढचे अवयव आणि मागचे अवयव. आणि जनुकशास्त्र तर अशी विभागणी करत नाही. तसेच जर्मन भाषा देखील नाही. अहा! प्रश्न सुटला. तुम्ही जर असा विचार करू शकला नाही, तर तुम्ही अडकता (त्या एकाच जागेवर) परंतु जर दुसरी भाषा त्या विचाराचा विचार करू शकत असेल, तर सहकार्याने आपण बरच शिकू आणि साध्य करून शकतो.

8:12

माझी मुलगी कुवेतमधून इंग्लंडला आली आहे. ती अरबी भाषेत शास्त्र आणि गणित शिकली आहे. ती अरबी माध्यमाची शाळा आहे. तिला अरबी भाषेचे इंग्लिश मध्ये भाषांतर करावे लागायचे. आणि ती वर्गात प्रथम होती त्या विषयात हे सर्व आपल्याला सांगतय की जेंव्हा विद्यार्थी परदेशातून आपल्याकडे येतात आपण त्यांना फारसे महत्त्व देत नाही त्यांच्या ज्ञानासाठी आणि त्यांनी ते ज्ञान त्यांच्या स्वतःच्या भाषेत मिळवलेले असते. जेंव्हा भाषा मरते, आपल्याला हे माहिती नाही की त्या भाषेबरोबर काय काय हरवेल.

8:46

हे तुम्ही नुकतेच CNN वर पाहिले असेल - त्यांनी नुकतेच बक्षीस दिले एका केनयाच्या मेंढपाळाच्या मुलाला तो गावात रात्री अभ्यास करू शकत नव्हता गावातील सर्व मुलांसारखा. कारण केरोसीनच्या कंदिलाच्या धुरामुळे त्याचे डोळे खराब झाले. आणि केरोसीनची/रॉकेलची कमतरता घरात नेहेमीच होती कारण गरिबीच्या उत्पन्नात काय मिळणार आहे? मग त्याने शोध लावला निशुल्क सौर उर्जेवर चालणाऱ्या दिव्याचा. आणि आता त्याच्या गावातल्या मुलांना शाळेत सारखेच गुण मिळतात इतर मुलांसारखे ज्यांच्या घरात वीज आहे. (टाळ्यांचा गजर) जेंव्हा त्याला हे बक्षीस मिळाले, त्याने अतिशय सुंदर शब्दात सांगितले: "मुले आजच्या आफ्रिकेला पुढे नेऊ शकतात, अंधारमय खंडापासून ते प्रकाशमान खंडापर्यंत." एक साधी कल्पना, पण तिचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.

9:46

ज्यांच्या घरात प्रकाश नाहीये - ते भौतिक असो की रूपकात्मक, जे आपल्या (इंग्रजीच्या) परीक्षा पास होऊ शकत नाही, आणि आपल्याला हे कधीही कळणार नाही त्यांना काय माहिती आहे ते. आपण त्यांना आणि आपल्याला असे अंधारात ठेवायला नको. ही विविधता साजरी करू या. तुमच्या (स्वतःच्या) भाषेवर लक्ष द्या. तिचा विशाल कल्पनांचा प्रसार करण्यासाठी उपयोग करा.

10:12

(टाळ्यांचा गजर)

10:19

आभारी आहे.

10:21

(टाळ्यांचा गजर)

दुबईतील TEDx मध्ये, अनुभवी इंग्रजी शिक्षिका पेट्रीशिआ रायन हा जिज्ञासा निर्माण करणारा प्रश्न विचारतायत: जगाच्या इंग्रजी भाषेवर असणाऱ्या अतिप्रभावामुळे इतर भाषांमध्ये व्यक्त होणाऱ्या कल्पनांकडे दुर्लक्ष होत आहे काय? (उदा: जर आइनस्टाइनला टोफेल परीक्षा पास व्हावी लागली असती तर?) हा इतर भाषांमध्येही कल्पना मांडू द्याव्यात असा आधार देणारा संवाद आहे.

About the speaker
Patricia Ryan · Language teacher

Patricia Ryan has spent the past three-plus decades teaching English in Arabic countries — where she has seen vast cultural (and linguistic) change.

Patricia Ryan has spent the past three-plus decades teaching English in Arabic countries — where she has seen vast cultural (and linguistic) change.