Munir Virani

मुनीर विरानी: मला गिधाडे का प्रिय आहेत ?

921,605 views • 6:41
Subtitles in 33 languages
Up next
Details
Discussion
Details About the talk
Transcript 33 languages
Translated by CHIDANAND PATHAK
Reviewed by Abhishek Suryawanshi
0:11

मला तुमच्याशी बोलायला आवडेल एका विशेष प्राण्याच्या गटाबद्दल

0:15

जगात पक्ष्यांच्या १०००० प्रजाती आहेत. नामशेष होत असलेल्या पक्ष्यांच्या गटातील गिधाडे हा मोठा गट हे असे गिधाड पाहिले की प्रथमच तुमच्या मनात विचार येतो की हे घृणास्पद , ओंगळ खादाड पक्षी केवळ तुमच्या मांसासाठी आहेत राजकारणी लोकांसारखे ( हंशा , टाळ्या ) मला ही धारणा बदलायची आहे , मला बदलायच्या आहेत . या पक्ष्याबद्दलच्या तुमच्या भावना , कारण त्याना सहानुभूतीची गरज आहे. खरच आहे (हंशा) मी सांगतो का ते

0:51

सर्वात प्रथम, ती इतकी कुप्रसिद्ध का असतात ? १८३२ साली जेह्वा चार्ल्स डार्विन अटलांटिक ओलांडून गेला, त्याच्या बीगल (जहाज) वर त्याने मोठी गिधाडे पाहिली आणि तो म्हणाला " हे किळसवाणे पक्षी आहेत , घाण वास येणारे , टक्कल पडलेले डोके असलेले (हंशा) चार्ल्स डार्विनने केला तितका यांचा अपमान कुणी केला नसेल ??????? तुम्हाला माहित आहे की परत आल्यावर त्याचे मत बदलले? का ते मी सांगतो. ती (गिधाडे) 'डिस्ने' शी सुद्धा निगडीत आहेत. (हंशा) वेंधळी , मठठ , मूर्ख म्हणून नावाजलेली

1:28

अगदी अलीकडे केनियातील वृत्त पत्र वाचत असलात तर, (हंशा, टाळ्या, वाहवा) ही लक्षणे त्यांनी जोडली होती. केनियातील खासदारांशी . पण मी त्याना आव्हान देतो . मी त्याना आव्हान देतो , माहित आहे का? कारण खासदार वातावरण स्वच्छ ठेवत नाहीत.(हंशा) खासदार रोग निर्मुलनास मदत करत नाहीत. ते क्वचितच एकपत्नित्व पाळतात .(हंशा) (टाळ्या, आणि ते नामशेषही होत नाहीत.(हंशा) आणि, हे मला आवडते —गिधाडे ज्यास्त चांगली दिसतात . (टाळ्या आणि हंशा)

2:17

तर या पृथ्वीवर दोन प्रकारची गिधाडे आहेत. नवीन प्रकारची गिधाडे प्रामुख्याने अमेरिकेत आहेत.जसे कोन्डोर आणि कारकारस आणि जुन्या प्रकारात आहेत, १६ प्रजाती ; या १६ पैकी ११ ना नामशेष होण्याचा धोका आहे

2:35

तर मग गिधाडांना इतके महत्व का? एक तर , ती निसर्ग संवर्धनाचे महत्वाचे कार्य करतात. स्वच्छता करतात ती आपले सफाई कामगार आहेत. ती मृत प्राण्यांची शरीरे स्वच्छ करतात, अगदी हाडांपर्यंत जीव जंतू नष्ट करतात. रोग प्रसारक जंतू शोषून घेतात जे अन्यथा पसरतील आणि घडवतील मोठ्या प्रमाणात इतर प्राण्यांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव . अलीकडील अभ्यासातून असे आढळले आहे की ज्या ठिकाणी गिधाडे नाहीत तिथे तिप्पट , चौपट वेळ लागतो मृत प्राण्यांच्या शरीराचे विघटन होण्यास . आणि याचे प्रचंड दुष्परिणाम होतात रोगराई वाढण्यात.

3:09

गिधाडांना खूप मोठा ऐतिहासिक संदर्भही आहे. ती प्राचीन इजिप्शिअन संस्कृतीशी संबंधित आहेत. नेख्बेटत नेखबेटची (इजिप्शिअन देवता) प्रतीक आहेत. संरक्षण कर्त्याचे आणि मातृत्वाचे आणि नागासाहित वरच्या (उत्तरेच्या) व खालच्या (दक्षिणेच्या) इजिप्तची एकी दर्शवितात. हिंदू पुराणात जटायू हा गिधाडांचा देव होता. आणि त्याने प्राणार्पण केले सीतेला वाचविण्यासाठी दशमुखी रावणापासून. तिबेटी संस्कृतीत ती महत्वाचे काम करतात . आकाशात शव नष्ट (विघटन) करण्याचे. तिबेट सारख्या ठिकाणी जागा नाही शव पुरण्यास,किंवा लाकडे नाहीत दहन करण्यास . तर ही गिधाडे पुरवितात नैसर्गिक विघटनाची प्रक्रिया. .

3:51

मग गिधाडांचा प्रश्न तरी काय आहे? केनियात आठ प्रजाती आहेत. त्यातील सहाना नष्ट होण्याचा धोका आहे, कारण त्यांच्यावर विषप्रयोग होत आहे. आणि विषप्रयोग होतो आहे, कारण तिथे आहे, मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष. ग्रामीण जमातीत हिंस्र पशूना मारण्यासाठी विष वापरतात . आणि त्यानंतर (मृत प्राणी खाल्यावर ) गिधाडे मरतात

4:15

दक्षिण आशियातील भारत आणि पाकिस्तान सारख्या देशात नष्ट होत असलेल्या गिधाडांच्या चार प्रजाती आहेत याचा अर्थ १० ते १५ वर्षाच्या आत त्या नामशेष होतील. आणि कारण असे की त्या बळी पडत आहेत असे प्राणी खाल्याने की ज्यांच्यावर उपचार केले गेले आहेत , डीक्लोफेनाक सारख्या वेदना शामक औषधांनी. जनावरावर उपचार करण्यास भारतात या औषधावर बंदी आहे आणि त्यांनी असे ठरविले आहे कारण गिधाडे नसल्यामुळे प्रादुर्भाव झाला आहे , मृत जनावरे टाकलेल्या जागी जमणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येत. आणि भटकी कुत्री म्हणजे कोणत्याही क्षणी फुटणारा मोठा बोंब गोळा जलभी ( रेबीज )रोगाचा . रेबीज च्या घटनांमध्ये भारतात प्रचंड वाढ झाली आहे .

4:52

आफ्रिकेत सर्वात मोठे पवनचक्क्यांचे मळे केनियात होणार आहेत. तुर्काना तळयाजवळ ३५३ पवनचक्क्या बांधणार आहेत मी पवन उर्जेच्या विरोधात नाही. पण आपण संपर्क साधला पाहिजे तेथील शासना बरोबर , कारण की पवनचक्क्यांचे पंखे हे करतात , पक्ष्यांचे दोन तुकडे करतात. ती पक्ष्यांचे मिश्रण करणारी यंत्रे आहेत. पश्चिम अफ्रिकेत भयानक असा व्यापार चालतो. मृत गिधाडांचा चेटूक आणि जादुटोणा यासारखे अघोरी छंद जोपासण्यासाठी.

5:18

मग काय केले जाते आहे? आम्ही एक संशोधन करत आहोत . या पक्ष्याबाबत . त्यांच्यावर आम्ही ट्रान्समीटर बसवत आहोत. त्यांच्या मूळ जीवसृष्टीचा विचार करत आहोत ते कुठे जातात हे पाहत आहोत ते निरनिराळ्या देशात प्रवास करतात. आपण केवळ स्थानिक प्रश्नाचा विचार केला तर त्याचा उपयोग नाही. आपण विभागीय शासनाशी समन्वय केला पाहिजे . आम्ही स्थानिक समुदाया बरोबर काम करत आहोत. आणि त्यांच्याशी संवाद साधत आहोत गिधाडाना समजून घेण्याबद्दल मनापासून दाद देण्याच्या गरजेबद्दल, या आश्चर्यकारक, सुंदर पक्ष्यांना आणि ते देत असलेल्या सेवेला.

5:49

काय करू मदत शकता? तुम्ही क्रियाशील व्हा आवाज उठवा , तुमची निवेदन पत्रे द्या आणि सांगा की आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे या अपसमज असलेल्या पक्ष्या बद्दल. स्वतः चा वेळ द्या प्रचार करण्यासाठी. प्रचार करा. तुम्ही येथून बाहेर पदाल, तुम्हाला माहिती झाली असेल गिधाडांबद्दल. पण तुमच्या कुटुंबाशी, मुलांशी बोला, शेजार्यांशी बोला , गिधाडां बद्दल .

6:10

ती खूप डौलदार आहेत. चार्ल्स डार्विन म्हणाला , मी माझे मत बदलले आहे, त्याना उडताना पाहिल्यावर आकाशात उर्जे शिवाय , सहज , विना प्रयास. केनिया, हे जग, खूप गरीब असेल या आश्चर्य कारक पक्ष्याशिवाय खूप खूप आभार ( टाळ्या ).

निसर्ग निर्मित सफाई कर्मचारी -गिधाडे आपल्या पर्यावरणासाठी फार महत्वाची आहेत. मग त्याना वाईट प्रसिद्धी का? त्याना नामशेष होण्याचा धोका का? जीवशास्त्रज्ञ मुनीर विरानी म्हणतात की दृष्टीकोन बदलण्यासाठी आणि त्याना वाचविण्यासाठी आपण या अद्वितीय पण गैरसमज असलेल्या जीवांकडे लक्ष दिले पाहिजे

About the speaker
Munir Virani · Raptor biologist, wildlife photographer

Munir Virani is a raptor biologist and wildlife photographer, and Director of the Peregrine Fund Africa Program, devoted to conserving birds of prey.

Munir Virani is a raptor biologist and wildlife photographer, and Director of the Peregrine Fund Africa Program, devoted to conserving birds of prey.