Return to the talk Watch the talk

Subtitles and Transcript

Select language

Translated by Deepak Patil
Reviewed by Pratik Dixit

0:11 मी न्यूयॉर्क मध्ये, मुख्य विकास अधिकारी आहे ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या रॉबिन हूड संस्थेचा जेव्हा मी गरिबीशी लढा देत नसतो, तेव्हा मी आग विझवायचे काम करतो एका स्वयंसेवी अग्निशमन संस्थेसाठी सहाय्यक म्हणून. आता आमच्या शहरामध्ये, जिथे स्वयंसेवक तज्ज्ञ अग्निशमन कर्मचाऱ्यांना मदत करत असतात, तुम्हाला आगीच्या ठिकाणी लवकर पोहचावे लागते. काही करायला मिळण्यासाठी

0:30 मला माझा पहिला आगीचा प्रसंग आठवतो मी त्या ठिकाणी दुसरा स्वयंसेवक होतो, त्यामुळे मला काही करायला मिळण्याची शक्यता फार जास्त होती. तरी पण ती एक इतर स्वयंसेवकांबरोबरची अटीतटीची शर्यत होती, कप्तानाकडे पोहोचून काम मिळवण्यासाठीची मी जेव्हा कप्तानापाशी पोहोचलो, तेव्हा तो संवादात गुंतला होता घरमालकीणीशी जिच्या आयुष्यातला हा अत्यंत वाईट दिवस असेल. इथे अशा मध्यरात्री, ती धो धो पावसामध्ये बाहेर उभी होती, छत्रीखाली, पायजम्यामध्ये, अनवाणी, जेव्हा तिचे घर आगीच्या ज्वाळांनी लपेटले होते.

1:04 दुसरा स्वयंसेवक जो नुकताच माझ्या आधी आला होता — त्याला आपण लेक्स ल्युथर म्हणूया — (हशा) प्रथम कप्तानापाशी पोहोचला त्याला घरामध्ये जाऊन घरमालकिणीचा कुत्रा वाचवायला सांगण्यात आलं होत. कुत्रा! मी असूयेने स्तब्ध झालो. इथे होता कोणी वकील किंवा चलन व्यवस्थापक ज्याला, त्याच्या उरलेल्या आयुष्यासाठी, लोकांना सांगायला मिळणार होते की, त्याने एका जळत्या इमारतीत जाऊन एका जिवंत प्राण्याला वाचविले, कारण फक्त त्याने मला पाच सेकंदाने हरविले होते म्हणून. मग माझा क्रमांक होता. कप्तानाने मला खुणावले. तो म्हणाला, "बेझोस, तू घरामध्ये जा. मग वरच्या मजल्यावर जा, आग ओलांडून, आणि ह्या बाईंसाठी चपलांचा जोड घेऊन ये." (हशा) शप्पथ. तर, हे नक्कीच मला अपेक्षित असे काम नव्हते, तरीही मी गेलो — पायऱ्या चढून, दालन ओलांडून, ’खऱ्या’ अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या जवळून, ज्यांनी तोपर्यंत जवळ जवळ आग विझवली होती, मग मुख्य शयनगृहामध्ये चपलांचा जोड आणण्यासाठी.

2:05 आता मला माहिती आहे, तुम्ही काय विचार करता आहात ते, पण मी काही नायक नाही. (हशा) मग मी माझे ओझे घेऊन खाली गेलो, जिथे मी माझ्या शत्रूला आणि त्या मौल्यवान अश्या कुत्र्याला समोरच्या दरवाजापाशी भेटलो. आम्ही आमचा खजिना बाहेर घरमालकीणीकडे घेऊन गेलो, जिथे, आश्चर्याची गोष्ट नाही, त्याने आणलेल्या (कुत्र्याला) मी आणलेल्या (चपलांपेक्षा) जास्त लक्ष मिळाले. काही आठवड्यांनंतर, विभागाला घरमालकीणीकडून पत्र आले आमचे आभार व्यक्त करणारे आम्ही दाखविलेल्या बहादूर प्रयत्नांबद्दल तिचे घर वाचवतांना. एक दयाळूपणाची गोष्ट तिने सर्वात वर नमूद केली की: कोणीतरी तिला चपलांचा जोडही आणून दिला होता.

2:44 (हशा)

2:46 माझ्या दोन्ही, रॉबिन हूड मधील नोकरी आणि अग्निशामक स्वयंसेवेच्या छंदामध्ये, मी अत्युच्च दर्जाच्या, उदारपणाच्या आणि दयाळूपणाच्या कर्मांचा साक्षीदार आहे. पण मी शालिनतेची आणि धाडसाची कामे ही पाहिली आहेत व्यक्तीगत स्तरावर. आणि तुम्हाला माहिती आहे का की मी काय शिकलोय? ती सगळी महत्त्वाची असतात. तर मी जेव्हा ह्या दालनात नजर फिरवितो माणसांवर, ज्यांनी मिळवलंय, किंवा मिळवायच्या मार्गावर आहेत, लक्षणीय यश, मी त्यांना हे लक्षात ठेवायला सांगतो: वाट पाहू नका. वाट पाहू नका तुमचे पहिले करोड कमवण्यापर्यंत दुसऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी जर तुमच्याकडे काही देण्यासारखे असेल, तर ते आताच द्या. अन्नछत्रामध्ये जेवण वाढा, जवळील उद्यान साफ करा, उपदेशक व्हा.

3:28 प्रत्येक दिवस आपल्याला संधी देणार नाही एखाद्याचा जीव वाचवायची, पण प्रत्येक दिवस आपल्याला एखाद्याला प्रभावित करायची संधी देतो. तर मग खेळात सामील व्हा; चपला वाचवा.

3:38 धन्यवाद

3:40 (टाळ्या)

3:45 ब्रुनो गियासनी: मार्क, मार्क, परत या.

3:47 टाळ्या

3:54 धन्यवाद