Return to the talk Watch the talk

Subtitles and Transcript

Select language

Translated by Hemant Patil
Reviewed by CHIDANAND PATHAK

0:11 पांच हजार एक्काहत्तर दशलक्ष दोनशे तीस हजार पौंडाचे कागदी रुमाल अमेरिकन नागरिकांकडून वापरले जातात दर वर्षी. जर आपण —- दुरुस्ती, चुकीची संख्या — १३ अब्ज दर वर्षी वापरले जातात. जर आपण कागदी रूमालांचा वापर कमी केला, एक कागदी रुमाल प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी, ५७१,२३०,००० पौंड कागद वापरलाच जाणार नाही. आपण ते करू शकतो.

0:47 आता तेथे सर्व प्रकारचे कागदी रूमालांचे यंत्र आहेत. हा आहेत त्रि-दुमड प्रकार .लोक साधारणतः दो किंवा तीन घेतात. हा एक आहे फाटणारा ,याला तुम्हाला फाडावा लागतो. लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार फाडला. इतकेच ,बरोबर ? हा एक आहे जो स्वतः फाटतो. लोक घेतात एक , दोन ,तीन ,चार. किंवा अजून एक सारखाच प्रकार ,परंतु पुनर्वापरता येणाऱ्या कागदाचा, हे तुम्हाला पांच घ्यावे लागतील कारण यात शोषक घटक नाहीत, साहजिकच.

1:19 वस्तुस्थिती अशी आहे कि हे सर्व तुम्ही एकाच रुमालाने करू शकतात. महत्वाचे, दोन शब्द: तुम्ही अर्धे सभागृह, तुमचा शब्द आहे "झटका" चला ऐकुयात. झटका . मोठ्याने.

1:34 प्रेक्षक : झटका.

1:35 Joe Smith: तुमचा शब्द आहे "दुमडा".

1:37 प्रेक्षक : दुमडा.

1:39 Joe Smith: पुन्हा.

1:39 प्रेक्षक : दुमडा. Joe Smith: खरच मोठ्याने.

1:42 प्रेक्षक : झटका. दुमडा.

1:43 Joe Smith: ठीक आहे. ओले हात. झटका — एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ, १०, ११, १२. १२ का? १२ धर्मदूत, १२ जाती, १२ राशी चिन्हे , १२ महिने . आणि एक जे मला सर्वात जास्त आवडते: एक शब्दांश असलेला हा सर्वात मोठा अंक आहे.

2:01 (हशा)

2:06 त्रि-दुमड . दुमडा ... कोरडा.

2:14 (टाळ्या)

2:19 प्रेक्षक : झटका.

2:24 दुमडा.

2:27 Joe Smith: स्वयं फाटणारा .दुमडा. दुमडणे महत्वाचे कारण हे तुम्हाला आतील हलकेपण देते. तुम्हाला तो भाग लक्षात ठेवायची गरज नाही, माझ्या वर विश्वास ठेवा.

2:37 (हशा )

2:42 प्रेक्षक : झटका.. दुमडा.

2:49 Joe Smith : स्वतः फाटणारा . तुम्हाला एक गंमत माहित आहे, जे लोक तीन किंवा चार वापरून करतात त्यापेक्षा माझा हात जास्त कोरडा आहे, कारण ते भेगांच्या आतील घेत नाही. जर तुम्ही विचार केला तर हे चांगलेच नाही का ...

3:03 प्रेक्षक : झटका..दुमडा.

3:12 Joe Smith : आता , तेथे खरोखरच मजेशीर शोध आहे. हे एक आहे जेथे तुम्ही तुमचा हात हलवू शकतात. जे त्याला ओढून बाहेर काढेल. हा एक प्रकारचा मोठा रुमालच आहे. चला , मला तुम्हाला एक गुपित सांगू द्या . जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल ,जर तुम्ही खरोखरच तरबेज असाल — आणि हे मी सिद्ध करू शकतो — हा अर्धा रुमाल या इमारतीतील यंत्रातला आहे . कसा ? जसा तो सुरु होईल , तुम्ही त्याला फाडून टाका. हे तत्काळ थांबण्या इतपत हुशार आहे. आणि तुम्हाला अर्धा रुमाल मिळेल.

3:40 प्रेक्षक : झटका . दुमडा .

3:53 Joe Smith: आता, सर्वांनी एकत्र म्हणा . झटका . दुमडा . तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनभर हे शब्द लक्ष्यात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही घ्याल एक कागदी रुमाल. आणि लक्षात ठेवा , एक रुमाल प्रत्येक माणशी , प्रत्येक वर्षी — ५७१,२३०,००० पौंड कागद . छोटी गोष्ट नाही. आणि पुढील वर्षी , शौचालयाचा कागद .

4:19 (हशा)