हवामान बदलाविरुद्ध कृतीची नैतिक गरज आणि त्याकरिता तीन प्रस्ताव
1,731,037 views |
परमपूज्य पोप फ्रान्सिस |
Countdown
• October 2020
वैश्विक हवामान संकटाला तोंड देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला आपली वर्तणूक बदलावी लागेल, असे परमपूज्य पोप फ्रान्सिस या व्याख्यानात सांगताहेत. भविष्याचा आढावा घेणारे हे टेड व्याख्यान व्हॅटिकन सिटीमधून प्रक्षेपित करण्यात आले. पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विषमता यांच्याशी निगडित समस्या वाढत आहेत. त्यांच्यावर उपाययोजना म्हणून परमपूज्य पोप यांनी कृतीसाठी तीन प्रस्ताव मांडले आहेत. आपण सर्वजण कोणत्याही धर्माचे किंवा समाजाचे घटक असलो, तरी पृथ्वीच्या रक्षणासाठी, मानवाचा आत्मसन्मान जपण्यासाठी कशा प्रकारे कृती करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. "भविष्यकाळ आजच उभारला जातो आहे," ते म्हणतात, "आणि तो एकट्याने नव्हे, तर समाजातून आणि एकात्मतेतून उभा राहतो."