Return to the talk Watch the talk

Subtitles and Transcript

Select language

Translated by Aniruddha Kadne
Reviewed by Sneha Kulkarni

0:11 पक्ष्याप्रमाणे उडणं हे अवघ्या मानवजातीचं स्वप्न आहे पक्षी हे खूप चपळ असतात. ते आसाभोवती फिरणार्‍या अवयवांशिवाय फक्त पंखांची उघडझाप करून उडतात. म्हणून आम्ही पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि एक अशी प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला जी अतिशय हलकी असेल आणि जिचे वायुगतीशास्त्रीय गुणधर्म इतके उत्तम असतील की ती स्वबळावर नुसती पंखांची उघडझाप करून उडू शकेल.

0:42 तर ह्यासाठी काय वापरणं उत्तम ठरेल? हेरिंग नावाचा सागरी पक्षी जो मुक्तपणे समुद्रावर घिरट्या घालत झेपावतो ह्याशिवाय अजून कुठला आदर्श म्हणून वापरता आला असता? त्यानंतर आम्ही संघाची बांधणी केली ज्यात सामान्य ज्ञान आणि वायुगतीशास्त्र क्षेत्रातील यंत्राविना चालणारी विमाने बनविण्यात तञ्ज्ञ असणाऱ्या व्यक्ती होत्या. आणि आमचं ध्येय होतं एक अतिशय हलकी प्रतिकृती बनविणं जी एका बंदिस्त खोलीत केवळ पंखाची उघडझाप करत तुमच्या डोक्यावरून उडू शकेल नंतर काळजी घ्या आणि हाच एक प्रश्न होता की तो इतका हलका असायला हवा की कोणाला इजा होता कामा नये जर तो (कधी) खाली पडला.

1:24 आम्ही हे सगळं का करतोय? आम्ही एक स्वयंचलित यंत्र बनवणारी संस्था आहोत आणि आम्हाला अश्या वजनाने अतिशय हलक्या रचना बनवायच्यात कारण त्या ऊर्जा कार्यक्षम असतात. आणि आम्हाला हवेचा दाब आणि प्रवाह याविषयी अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे.

1:40 तर मी आता तुम्हाला सतर्क राहण्याची विनंती करतो. आणि जरा डोक्याला चालना द्या. तर आपण हा स्मार्ट बर्ड (smartBird) उडविण्याचा एकदा प्रयत्न करूया. धन्यवाद.

1:54 (टाळ्यांचा कडकडाट)

2:10 (टाळ्यांचा कडकडाट)

2:48 (टाळ्यांचा कडकडाट)

3:03 तर आता आपण स्मार्ट बर्ड (smartBird) कडे पाहू शकतो हा एक बाहेरचे आवरण नसलेला आहे त्याच्या पंखांचा विस्तार दोन मीटर आहे. लांबी एक दशांश सहा मीटर आहे आणि वजन फ़क़्त साडे चारशे ग्राम आहे आणि तो पूर्णपणे कार्बन धाग्यापासून पासून बनविलेला आहे. ह्याच्या मध्यभागी एक यंत्र आणि दाते आहेत. दात्यांचा वापर यंत्राच्या परिभ्रमणाचे स्थानांतर करण्यासाठी होतो. यंत्रामध्ये तीन "हॉल सेन्सर" (Hall sensors) आहेत जे पंखाची अचूक स्थिती दर्शवितात. आणि जर आता आपण वर खाली हालचाल केली तर ही शक्यता आहे की हे पक्ष्याप्रमाणे उडेल. जर तुम्ही खाली गेलात तर तुमच्याकडे स्वतःला पुढे ढकलण्यासाठी विस्तृत जागा आहे. आणि जर तुम्ही वर गेलात तर पंख जास्त मोठे नसल्यामुळे वर जाणं सुलभ होतं.

4:10 ह्यापुढे आम्ही जे केलं किंवा ज्याचं आव्हान होतं आमच्यापुढे (ते म्हणजे) ह्या हालचालींमध्ये समन्वय साधणे. आपल्याला हे वळवून वर आणि खाली जायचं आहे. आपल्याकडे एक दुभागलेला पंख आहे. दुभागलेल्या पंखामुळे वरच्या पंखाकडे उचल मिळते आणि खालच्या पंखाकडे पुढे ढकलण्याची शक्ती मिळते. आपण हेसुद्धा बघत आहात की आम्ही वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता कशी मोजतो. आपल्याला विद्युतयांत्रिकी कार्यक्षमतेबद्दल ज्ञान आहे आणि त्यावरून आपण वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता मोजू शकतो. आणि त्यामुळे ती अकार्यान्वित ऊर्जेतून कार्यान्वित उर्जेत ३० ते ८० टक्के वृद्धिंगत होते.

4:53 ह्यापुढे आपल्याला ह्या संपूर्ण रचनेवर नियंत्रण मिळवायचे आहे. वायुगतीशास्त्रीय कार्यक्षमता तेव्हाच मिळेल जेव्हा आपण ह्यावर नियंत्रण मिळवू शकू सर्व जमेस धरून, २५ watts ऊर्जा उड्डाण करताना आणि १६ ते १८ watts ऊर्जा उडत असताना खर्च होते. धन्यवाद.

5:16 (टाळ्यांचा कडकडाट)

5:22 ब्रुनो जि' सानी: मार्कस, मला वाटतं हे आपण आणखी एकदा उडवायला हवं.

5:25 मार्कस फिशर: हो, नक्कीच.

5:27 (हश्या)

5:49 (सगळे श्वास रोखतात)

5:58 (हर्षोदगार)

6:00 (टाळ्यांचा कडकडाट)