Follow TED
Be the first to know about new TEDTalks, TED news and other announcements.
Click on any phrase to play the video from that point.
तर, वरील निवेदन अगदीच स्पष्ट आहे. मी १२ वर्षापूर्वी या वाक्याने सुरुवात केली आणि संदर्भ होता विकसनशील देशांचा पण आपण जगाच्या काना-कोपर्यातून इथे जमले आहात तर, तुमच्या देशाच्या नकाशाचा विचार केल्यास मला वाटते, हे तुम्हाला कळेल की पृथ्वीवरच्या प्रत्येक देशासाठी तुम्ही छोटे वर्तुळ काढून दाखवू शकता की "ह्या अशा जागा आहेत जिथे चांगले शिक्षक जाणार नाहीत ." यावर वरताण म्हणजे ही समस्याप्रधान क्षेत्रे आहेत. तर ही एक उपरोधिक समस्या आहे चांगले शिक्षक जाऊ इच्छित नाहीत नेमक्या त्या ठिकाणी, जिथे त्यांची खरी गरज आहे .
मी १९९९ साली सुरुवात केली एका प्रयोगाद्वारे या प्रश्नाची उकल करण्यास . जो नवी दिल्लीमधील एक अतिशय साधा प्रयोग होता . मी एक संगणक संच खोवला नवी दिल्लीतील एका झोपडपट्टीतील घराच्या भिंतीत तेथील मुले जेमतेम शाळेत जायची . त्यांना इंग्रजीचा गंध नव्हता त्यांनी कधी संगणक बघितला नव्हता आणि त्यांना इंटरनेट माहीतच नव्हते मी त्याला हाय स्पीड इंटरनेट जोडणी दिली - जमिनीपासून साधारण तीन फुटांवर मी तो सुरु केला आणि तेथून बाहेर पडलो त्यानंतर आम्ही काही गोष्टींचे निरीक्षण केले , ते तुम्हाला कळेलच . हे मी देशातील अनेक ठिकाणी केले . आणि नंतर जगभरातील बर्याच भागात आणि असे लक्षात आले की मुले तेच शिकतील 3 जे त्यांना शिकायची इच्छा आहे
हा आम्ही केलेला पहिला प्रयोग होता तुमच्या उजवीकडील हा आठ वर्षाचा मुलगा सहा वर्षाच्या त्याच्या विद्यार्थिनीला शिकवत आहे . आणि तो तिला शिकवत होता इंटरनेट चाळणे हा भारताच्या मध्य भागातील मुलगा राजस्थानातील एका खेड्यातील जिथे मुलांनी स्वतःचे संगीत ध्वनिमुद्रीत केले आणि मग एकमेकांना ऐकवले, आणि या प्रक्रियेत, त्यांनी स्वतःची खूप करमणूक करून घेतली. आणि हे सर्व त्यांनी चार तासात केले संगणक प्रथमच पाहिल्यापासून. दक्षिण भारतातील दुसर्या एका खेड्यात या मुलांनी एका व्हिडीओ कॅमेर्याची जुळणी केली होती आणि एका मोठ्या माशीचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी Disney.com या संकेत स्थळावरून ते डाऊनलोड केले. किंवा अशाच संकेतस्थळावरून संगणक त्या खेड्यात बसविल्यापासून १४ दिवसात. तर शेवटी, आम्ही असा निष्कर्ष काढला कि मुलांचा गट संगणक व इंटरनेटचा वापर करणे स्वतःच शिकू शकतात, आपण कोण आहोत किंवा कुठे आहोत याच्या निरपेक्ष
या क्षणी मी अधिक महत्वाकांक्षी झालो . आणि बघायचे ठरवले की मुले संगणकाचा आणखी कसा वापर करू शकतात. आम्ही भारतातील हैदराबाद येथे एका प्रयोगाने सुरुवात केली जिथे मी मुलांच्या एका गटाला - जी मुले तेलुगु भाषेच्या वळणाचे इंग्रजी बोलत . मी त्यांना एक संगणक दिला . संवादाद्वारे मजकूर लिहिण्याची क्षमता असलेला जी आता विंडोज प्रणालीत विनामूल्य मिळते, आणि त्यांना त्यात बोलायला सांगितले. आणि जेव्हा ते त्यात बोलले, संगणकाने त्याचे अशुद्ध टंक लेखन केले, यावर ती मुले म्हणाली, "आम्ही जे बोलतोय ते याला कळतच नाही." मी म्हटले ” होय . दोन महिन्यासाठी हा संगणक मी इथेच ठेवतो . तुम्ही असे बोला जे संगणकाला समजेल." मुलांनी विचारले, "हे कसे करायचे ?" आणि मी म्हटले, “खरे तर मलाही माहित नाही." (हशा) आणि मी तेथून निघालो. (हशा) दोन महिन्यांनंतर - आणि याच्या नोंदी आहेत संगणक माहिती प्रणालीत आंतरराष्ट्रीय विकास नियतकालिकात - की त्यांचे भाषेचे वळण बदलले आणि आश्चर्यकारकरीत्या साध्या ब्रिटीश वळणाच्या अगदी जवळचे बनले. की ज्यात मी संवाद आणि मजकूर यांची जुळणी केली होती . दुसर्या शब्दात, ती सर्व मुले जेम्स टुली सारखे बोलत होती. (हशा) म्हणजे त्यांनी स्वतःच हे घडवून आणले त्यानंतर , मी प्रयोग सुरु केले इतर अनेक गोष्टींवर की ज्या मुले स्वतः करू शकतील.
एकदा मला कोलम्बोतून एक मजेदार फोन आला, कै . आर्थर सी क्लार्क यांच्याकडून , ते म्हणाले, "मला बघायचे आहे काय चालले आहे ते." आणि त्यांना येणे शक्य नव्हते , म्हणून मी त्यांच्याकडे गेलो . त्यांनी मला दोन लक्षवेधी गोष्टी सांगितल्या , "शिक्षकाची जागा जर यंत्र घेत असेल तर घेऊ द्यावी" (हशा) दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे, “मुलांना जर रुची असेल, तरच (त्यांचे ) शिक्षण होते ." मी तर ते प्रत्यक्षात करत होतो . तर प्रत्येक वेळी ते बघताना मी त्यांचा विचार करतो.
(चित्रफीत ) आर्थर सी क्लार्क : ते नक्कीच लोकाना मदत करतात कारण मुले लवकर दिशा शोधतात आणि त्याना ज्याच्यात रुची आहे अशा गोष्टी शोधतात . आणि जेव्हा रुची असते, तेव्हाच शिक्षण घडते.
सुगत मित्र :मी हा प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला हा १५ वर्षाचा मुलगा आहे
(चित्रफीत ) मुलगा :-- मी खेळ खेळतो मला प्राणी आवडतात . आणि मी संगीत ऐकतो .
सु .मिः आणि मी त्याला विचारले, ” तू इ-मेल्स पाठवतोस ?" तो म्हणाला “हो . आणि त्या समुद्रापलीकडे उडी मारुन जातात ." हे कंबोडिया आहे . ग्रामीण कंबोडिया एक साधा गणिती खेळ जो कुणीही मुलगा शाळेत अथवा घरात खेळणार नाही . ते , तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे परत फेकतील . आणि म्हणतील ” हे खूपच कंटाळवाणे आहे ." पण तुम्ही जर ते रस्त्यावर सोडून दिले आणि जर सर्व प्रौढ तिथून निघून गेले तर ती (मुले ) एकमेकात फुशारक्या मारतील याचे काय करता येईल याबद्दल ही मुले तेच करत आहेत ती अनेक पटीने वाढत आहेत भारत देशभर दोन वर्षाच्या अखेरीस मुले गुगल वर त्यांचे गृहपाठ करू लागली . परिणामी शिक्षकांनी अहवाल पाठवला ‘इंग्रजीत प्रचंड सुधारणां’ बद्दल (हशा) ‘वेगवान सुधारणा ’ वगैरे , वगैरे . त्यांनी म्हटले ”मुले सखोल विचार करणारी झाली आहेत इत्यादी इत्यादी (हशा) आणि खरंच ती तशी झाली होती . माझ्या मते, जे गुगल मध्ये संग्रहित आहे ते डोक्यात कशाला भरायचे . म्हणून, त्यानंतर ४ वर्षांनी मी ठरवले कि मुले आता संगणकाचा वापर करू शकत आहेत त्यांची स्वतःची शैक्षणिक उद्दिष्टे स्वतःच पूर्ण करण्यासाठी.
त्याच वेळी बरीच मोठी रक्कम न्यू कॅसल विद्यापीठाला मिळाली होती भारतातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्यासाठी त्यांनी मला विचारणा केली . मी सांगितले, "मी दिल्लीत राहून काम करेन ” ते म्हणाले, "तुम्हाला शक्य नाही होणार हाताळणे विद्यापीठाचे १० लाख रुपये दिल्लीत बसून ." तर २००६ साली, मी माझ्यासाठी एक ओवरकोट विकत घेतला . आणि न्यू कॅसल इथे गेलो मला चाचणी करायची होती मर्यादांची व्यवस्था प्रणालीच्या . न्यू कॅसल मध्ये मी केलेला पहिला प्रयोग भारतामध्ये झाला होता. आणि मी स्वतःपुढे एक अशक्य वाटणारे उद्दिष्ट ठेवले . काय तमिळ बोलणारी १२ वर्षाची मुले दक्षिण भारतातील एका खेड्यातील स्वताला जीव तंत्र विज्ञान (biotechnology) स्वतःच्या इंग्रजी भाषेतून शिकवू शकतील ? मी त्यांची परीक्षा घेत्तो . त्याना शून्य गुण मिळतील . मी त्याना सामग्री देईन . तीन महिन्यांनी परत येऊन परीक्षा घेईन . त्याना आणखी एक शून्य मिळेल . मी परत जाऊन म्हणेन “ होय . आम्हाला काही कारण्याआसाठी शिक्षक पाहिजेत ."
मी २६ मुलाना बोलावले . ती सर्व आल्यावर मी त्यांना सांगितले . की या संगणकावर काही दुर्बोध गोष्टी आहेत . तुम्हाला त्या समजल्या नाहीत तरी मला आश्चर्य वाटणार नाही हे सर्व इंग्रजीत आहे आणि मी जातो आहे . (हशा) तर मी त्याना सोडून निघून गेलो . आणि दोन महिन्यांनी परत आलो आणि २६ मुले आत आली अगदी गुपचूप , निशब्द . मी विचारले , “ काही पाहिलं का ?” ती म्हणाली , “ हो , पाहिले ” “ काही समजले का ?” “ नाही , काही नाही ” तेव्हा मी म्हणालो, “ठीक आहे . किती वेळ सराव केला ” “काही कळले नाही हे सांगण्यापूर्वी ?” ती म्हणाली, “आम्ही त्यात रोज पाहिले ” यावर मी म्हटले, "दोन महिने तुम्हाला काही समजत नव्हते तरी पहात होतात? तेन्ह्वा एक मुलगी हात वर करून म्हणाली, अगदी शब्दशः . डी . एन . ए . च्या रेणूची अयोग्य निर्मिती अनुवांशिक रोगाला कारक असते याच्याशिवाय आम्हाला दुसरे काही समजले नाही .
हे प्रसिद्ध करायला मला तीन वर्षे लागली ते नुकतेच ब्रिटीश नियतकालिक ‘शैक्षणिक तंत्रज्ञान ’ यात प्रसिद्ध झाले आहे . माझा निबंध तपासणारे एक परीक्षक म्हणाले . “खरे वाटत नाही इतके हे चांगले आहे . असे म्हणणे ठीक नव्हते . एक मुलगी जी शिकली होती शिक्षक होण्यासाठी ती त्या तिथे आहे . लक्षात ठेवा , ती मुले इंग्रजी शिकली नाहीत मी सुधारणा करीत विचारले , "न्यूरॉन कुठे आहे ?” आणि ती म्हणते ,” न्यूरॉन? न्यूरॉन?” आणि मग तिने पाहिले आणि असे केले . काहीही हाव भाव असले , तरी ते चांगले नव्हते
तर त्यांचे गुण शून्यावरून ३० प्रतिशत झाले . जी या परिस्थितीतील शैक्षणिक अशक्यता आहे पण ३० टक्के म्हणजे उत्तीर्ण नव्हे . म्हणून मी तपास केला त्यांच्या मैत्रिणीचा , एक स्थानिक हिशेबनिसाचा . ती मुले तिच्या बरोबर फुटबाल खेळायची मी तिला विचारले , “ तू त्यांना शिकवशील ?” जीव तंत्रज्ञान पास होण्यापुरते ? आणि ती म्हणाली , “मी कसे शिकवणार ? मला तर तो विषय माहित नाही ." मी म्हणालो , “ तू आजीची पद्धत वापर ” ती म्हणाली , “ती काय आहे ?” मी म्हणालो , “ तू काय करायचे . की मुलांच्या मागे उभे राहायचे आणि सतत त्यांचे कौतुक करायचे . एव्हढेच म्हणायचे ,'झकास . खूप छान . हे काय केले ? परत करतोस ? मला आणखी दाखवतोस ?" तिने ते दोन वर्षे केले . गुणसंख्या ५० झाली . जी दिल्लीतील झकपक शाळात असते जीव तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षित शिक्षिका असलेल्या .
तर मी परत न्यू कॅसल इथे आलो हे परिणाम घेऊन . आणि ठरवले की इथे असे काहीतरी घडते आहे . जे नक्कीच विचारप्रवर्तक आहे . तर दूरदूरच्या ठिकाणी अनेक प्रयोग करत करत मी सर्वात दुर्गम अशा ठिकाणी पोहोचलो . (हशा) दिल्लीपासून साधारण ५,००० मैल . एका लहान गावात Gateshead . इथे मी ३२ मुले घेतली आणि मग मी पद्धतीत सुधारणा करायला सुरुवात केली मी त्यांचे चार गट केले . मी म्हटले ,” तुम्ही तुमचे गट करा प्रत्येक गट एकच संगणक वापरेल , चार नाही" लक्षात ठेवा , भिंतीतील खिंडारातून "तुम्ही गट बदलू शकता दुसऱ्या गटात जावू शकता, तुम्हाला तुमचा गट आवडला नाही तर तुम्ही दुसऱ्या गटात जाऊन ते काय करत आहेत ते डोकावून पाहू शकता , आणि परत तुमच्या गटात येऊन ते स्वतःचे आहे असे म्हणू शकता . आणि मी त्यांना समजावले बरेच शास्त्रीय संशोधन अशा पद्धतीने केले जाते .
मुले उत्साहाने मला विचारू लागली, “आता आम्ही काय करायचे ?’ मी त्याना ६ GCSE चे प्रश्न दिले . पहिला गट जो सर्वोत्तम होता त्यांनी २o मिनिटात ते सर्व सोडवले सर्वात वाईट गटाने ४५ मिनिटात . त्याना माहित असलेले सर्व वापरले . न्यूज ग्रूप , गुगल , विकिपीडिया \ आस्क जीवस इत्यादी शिक्षक म्हणाले , “ हे काय सखोल शिक्षण आहे ?” मी म्हणालो , “ प्रयत्न करुया ” दोन महिन्यांनी मी परत आलो . त्यांना एक चाचणी दिली .--- 19 संगणक नाही , एकमेकांशी बोलणे नाही . सर्वसाधारण गुणसंख्या , संगणक आणि गट असताना ७६ % होती मी प्रयोग केले आणि चाचणी घेतली तेह्वा दोन महिन्यांनी ७६ % होती . छायाचित्रा सारखी स्मरणशक्ती मुलांच्यात होती असे वाटते कारण ते एकमेकांशी चर्चा करतायत. एका संगणकापुढे एक मुलगा हे करू शकणार नाही माझ्याकडील पुढील परिणाम विश्वास बसणार नाही असे गुण काळानुसार वाढणार्या पट्टीवर. कारण त्यांचे शिक्षक म्हणतात की सत्र संपल्यावर मुले त्यानंतरही गुगल करायची
इथे ब्रिटन मध्ये मी आवाहन केले ब्रिटीश आज्याना माझ्या प्रयोगानंतर आणि , माहित आहे ब्रिटीश आज्या खूप बलवान असतात . त्यांच्यातील २०० लगेच स्वयंसेवक झाल्या . {हशा) असे ठरले कि त्यांनी मला एक तास मोकळा द्यायचा . स्वतःच्या घरी बसून आठवड्यातून एक दिवस त्यांनी तसे केले आणि गेली दोन वर्षावर ६०० तासाच्या वर सुचना मिळाल्या स्काईप वर माझे विद्यार्थी ज्याला ग्रॅनी क्लाऊड म्हणतात. तो (ढग ) तिथे बसतो. मला हवे असेल त्या शाळेत मी तो पाठवतो..
(चित्रफीत )शिक्षक : तुम्ही मला पकडू शकत नाही तुम्ही म्हणा तुम्ही मला पकडू शकत नाही
मुल्रे : तुम्ही मला पकडू शकत नाही
शिक्षक : मी जिंजरब्रेड माणूस आहे .
मुले : मी जिंजरब्रेड माणूस आहे .
सु . मि.: तिकडे Gateshead ला एक १० वर्षाची मुलगी हिंदू धर्माच्या मूळाशी जाते १५ मिनिटात अशा गोष्टी ज्यांच्याबद्दल मला काहीही माहिती नाही दोन मुले TED वरची भाषणे ऐकतात . आधी त्यांना फुटबॉल खेळाडू व्हायचे होते ८ TED भाषणे ऐकल्यावर, त्याला लिओनार्दो द व्हिन्सी.व्हायचे आहे .
मी आता पहा काय करत आहे त्याना म्हणतात SOLEs: सेल्फ ऑर्गनाइझ्ड लर्निंग एन्व्हायर्नमेंट्स. फर्निचरची रचना अशी आहे . 24 की मुले मोठ्या शक्तिशाली पडद्यासमोर बसू शकतील मोठी ब्रॉडबॅंड जोडणी , पण गटात . त्यांना हवे असेल तर ते ग्रॅनी क्लाऊड ला बोलावतील . हे न्यू कॅसल मधील SOLE आहे मध्यस्थ भारतातील आहे .
आणखी किती सांगू ? एक शेवटचे आणि मग थांबतो . मी मे मध्ये तुरीन ला गेलो होतो मी सर्व शिक्षकांना माझ्या १० वर्षाच्या गटाच्या मुलापासून लांब जायला सांगितले . मी फक्त इंग्रजी बोलतो आणि ते इटालियन त्यामुळे संवाद नव्हता . मी इंग्रजीत प्रश्न फळ्यावर लिहायला सुरुवात केली. मुलांनी पहिले आणि विचारले, "हे काय आहे ?" मी म्हटले “ सुरु करा .” त्यांनी गुगल वर टाईप केले आणि त्याचे इटालियन , मध्ये भाषांतर केले . परत इटालियन गुगल मध्ये गेले १५ मिनिटानंतर . पुढील प्रश्न “कलकत्ता कुठे आहे ?” याला फक्त १० मिनिटे लागली यानंतर मी खरच कठीण प्रश्न विचारला . पायथागोरस कोण होता ? आणि त्याने काय केले थोडा वेळ शांतता पसरली नंतर ती म्हणाली तुमचे स्पेलिंग चुकले आहे . ते पेतागोरस आहे . आणि नंतर २० मिनिटात काटकोनातले त्रिकोण फळ्यावर दिसू लागले माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ही १० वर्षाची मुले आहेत . आणखी ३० मिनिटात ती सापेक्षतेच्या सिद्धांतापर्यंत पोहोचतील . आणि मग?
सु . मि . तर, माहित आहे काय झाले ? माझ्या मते, आपण अडखळतो आहोत एका स्वयं चालित प्रणालीवर . स्वयं चालित प्रणालीवर ज्यात सांगाडा निर्माण होतो बाह्य स्पष्ट हस्तक्षेपाशिवाय. स्वयं चालित प्रणाली नेहमी दाखवतात उदय अशा गोष्टींचा ज्या साठी प्रणालीचा आराखडा केला नव्हता . त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अशी झाली . कारण हे अशक्य वाटते . मला वाटते मी अंदाज करू शकतो . शिक्षण ही स्वयं चालित प्रणाली आहे . ज्यात विद्वत्ता , ज्ञान उदयाला येणारी विलक्षण गोष्ट आहे . हे प्रयोगाद्वारे सिद्ध करायला मला आणखी काही वर्षे लागतील . पण मी ते करणार आहे . पण मधल्या काळात, एक पद्धत आहे . १०० कोटी मुलांसाठी १० कोटी शिक्षक लागतील . पृथ्वीवर त्यापेक्षा जास्त आहेत . १ कोटी SOLE. १८००० कोटी डॉलर आणि १० वर्षे आपण सगळे बदलू शकतो .
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation, or join one of these:
शिक्षणशास्त्रतज्ञ सुगत मित्रा हाताळत आहेत एक मोठा शैक्षणिक प्रश्न - सर्वाधिक गरज असलेल्या ठिकाणी चांगले शिक्षक व चांगल्या शाळा नसणे . दिल्ली पासून दक्षिण आफ्रिका , इटली पर्यंतच्या स्वानुभवावर आधारित उपक्रमांमधून त्यांनी मुलांना दिली स्व-नियंत्रित वेब सुविधा आणि त्यातून प्रकटले क्रांतिकारी निष्कर्ष, शिक्षणविषयक दृष्टीकोन बदलणारे.
Sugata Mitra's "Hole in the Wall" experiments have shown that, in the absence of supervision or formal teaching, children can teach themselves and each other, if they're motivated by curiosity and peer interest. Full bio »
Translated into Marathi by CHIDANAND PATHAK
Reviewed by Mandar Shinde
Comments? Please email the translators above.
Education is a self-organizing system, where learning is an emergent phenomenon.” (Sugata Mitra)
20:59 Posted: Aug 2008
Views 575,341 | Comments 114
16:48 Posted: May 2010
Views 2,795,676 | Comments 977
17:37 Posted: Aug 2006
Views 128,021 | Comments 88
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign out.