ख्रिस अँडरसन: वेलकम, ज्युलियन. असं आढळून आलं आहे की, तुमचं अपत्य, 'विकिलीक्स' ने, ... गेल्या काही वर्षांत इतकी क्लासिफाईड डॉक्युमेंट्स प्रसिद्ध केली आहेत जी जगभरातल्या माध्यमांच्या एकत्रित संख्येहून अधिक आहेत. असं खरंच होऊ शकतं?
ज्युलियन असांजः हं, असं होऊ शकतं का? काय दुर्दैव आहे, नाही का? जगभरची माध्यमं इतकं टुकार काम करतायत की मूठभर कार्यकर्ते प्रसिद्ध करु शकतात या पद्धतीची इतकी माहिती जी जगभरच्या माध्यमांच्या एकत्रित संख्येहून जास्त आहे.
ख्रिसः हे कसं होतं? लोक ही कागदपत्रं प्रसिद्ध कशी करतात? आणि तुम्ही त्यांना गोपनीय कसं ठेवता?
ज्युलियनः आमच्या मते... हे आहेत उत्कृष्ट धोकादर्शक. आणि आम्ही त्यांच्यासाठी अनेक मार्ग बनवलेत आम्हाला माहिती पुरविण्याचे. तर आम्ही वापरतो उत्कृष्ट सांकेतिक पद्धत इंटरनेट वरुन महिती गोळा करायला, पुरावे नष्ट करायला, कायद्याच्या कचाट्यातून सुटायला स्वीडन व बेल्जियम सारख्या देशांत कायदेशीर बंधनांना चकवायला. ही माहिती आमच्याकडं टपालानं येते, साध्या पोस्टाच्या टपालानं, सांकेतिक असो वा नसो, कोणत्याही वृत्तपत्र संस्थेप्रमाणं आम्ही ती तपासतो, तिला फॉरमॅट (सुस्वरुप) करतो... जे काहीवेळेला अतिशय अवघड काम असतं, जेव्हा गोष्ट असते माहितीच्या प्रचंड साठ्याची... तिला सार्वजनिक प्रसिद्धी देतो आणि मग स्वतःचा बचाव करतो अटळ कायदेशीर व राजकीय हल्ल्यांपासून.
ख्रिसः तर तुम्ही याची खात्री करता की डॉक्युमेंट्स अधिकृत आहेत. पण खरोखर तुम्हाला त्यांचा स्रोत कधीच कळून येत नाही.
ज्युलियनः बरोबर. फारच क्वचित आम्हाला कळतं. आणि आम्हाला कधी कळालंच तर आम्ही ताबडतोब ती माहिती नष्ट करतो. (फोन वाजतो) बाप रे.
ख्रिसः मला वाटतं सीआयए ला कोड हवा असेल टेड मेंबरशिपचा.
तर आपण हे एक उदाहरण घेऊ. हे काहितरी तुम्ही काही वर्षांपूर्वी लीक केलंत. हे डॉक्युमेंट बघता आलं तर... तर काही वर्षांपूर्वी केनिया मध्ये घडलेली गोष्ट आहे. आम्हाला सांगू शकाल तुम्ही काय लीक केलंत आणि काय घडलं?
ज्युलियनः तर हा क्रोल रीपोर्ट आहे. हा गुप्तहेर खात्याचा रिपोर्ट होता केनियन सरकारनं बनवलेला २००४ च्या निवडणुकांनंतर. २००४ पूर्वी, केनियावर राज्य केलं डॅनियल अराप मोई नं सुमारे १८ वर्षं. तो केनियाचा मवाळ हुकुमशहा होता. आणि जेव्हा किबाकी सत्तेवर आला -- काही घटकांच्या युतीमार्फत, ज्यांना केनियातील भ्रष्टाचार संपवायचा होता -- त्यांनी हा रिपोर्ट बनवला सुमारे दोन दशलक्ष पाउंड खर्चून या व यासारख्या अजून एका रिपोर्टवर. आणि मग शासनानं हा रिपोर्ट दडपला आणि त्याचं राजकीय हत्यार बनवलं मोई विरुद्ध, जो सर्वात श्रीमंत माणूस होता -- आजही सर्वाधिक श्रीमंत माणूस आहे -- केनियातला. केनियन पत्रकारितेचा संवेदनशील भाग होता तो. तर २००७ मध्ये मी तिथं पोचलो, आणि आम्ही हे मिळवलं निवडणुकीच्या तोंडावर -- राष्ट्रीय निवडणूक, २८ डिसेंबर. तो रिपोर्ट आम्ही प्रसिद्ध केला, तीन दिवसांनंतर, जेव्हा नवे अध्यक्ष, किबाकी, तयारीत होते युती करायच्या त्याच्यासोबत, ज्याला ते उधळून लावणार होते, डॅनियल अराप मोई. तर मग हा रिपोर्ट बनला गळफास अध्यक्ष किबाकींसाठी.
ख्रिसः आणि... थोडक्यात सांगायचं तर... केनियामधला रिपोर्ट लीक केला, माध्यमांनी, अधिकृत नव्हे तर अप्रत्यक्ष. आणि तुमच्या मते, त्यानं निवडणुकीचं चित्रच पालटून टाकलं. ज्युलियनः बरोबर. तर हे झळकलं गार्डीयनच्या पहिल्या पानावर आणि मग छापून आलं केनियाभोवतालच्या सर्व देशांमध्ये, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्रांतून. आणि अशाप्रकारे या क्षेत्रात प्रवेश झाला. आणि मग, काही दिवसांनी, केनियन माध्यमांना त्यावर बोलायचं धैर्य आलं. केनियन टी.व्ही. वरुन हे सलग २० रात्री प्रसारीत झालं, जनमत १० टक्क्यांनी बदललं, केनियन गुप्तचर संस्थेच्या रिपोर्टनुसार, ज्यानं निवडणुकीचा निकाल बदलला.
ख्रिसः व्वा, म्हणजे तुमच्या लीकमुळं खरोखर काहितरी परीवर्तन घडलं?
ख्रिसः इथं - आम्ही दाखवत आहोत एक शॉर्ट क्लिप बगदाद हवाई हल्ल्याची. मूळ व्हिडीओ मोठा आहे. पण आपण एक शॉर्ट क्लिप बघूया. हे संवेदनशील चित्रण आहे - मी आधीच सावध करतोय.
रेडीओः ... त्यांच्यावर पोहोचताच चालू करा. मला दिसतंय, हं, चार हम्वी गाड्या आहेत, हं, तिथंच... रस्ता साफ आहे. एकदम. फायरींग. ते दिसले की मला सांगा. हल्ला सुरु करा. पेटवून टाका सगळं. आक्रमण! (मशिन गन सुरु) गोळीबार चालू ठेवा. (मशिन गनचं फायरींग) ठोकत रहा. हॉटेल... बुशमास्टर टू-सिक्स, बुशमास्टर टू-सिक्स वेळ झालीय, निघायची! अच्छा, आठ जणांना अडकवलंय. हं, दोन पक्षी (हेलिकॉप्टर) दिसतायत, आणि आमचं फायरींग सुरुच आहे. रॉजर. मी टिपलं त्यांना. टू-सिक्स, टू-सिक्स बोलतोय, आम्ही निघालोय. अरेच्चा. काय झालं? च्यामारी, काईल. ठीकाय, हाहाहा. मी टिपलं त्यांना.
ख्रिसः तर, याचा काय परिणाम झाला?
ज्युलियनः यावर काम करणार्या लोकांवर परिणाम भयंकर झाला. शेवटी आम्ही दोन माणसं बगदादला पाठवली याचा पुढं तपास करण्यासाठी. तर हा तीनपैकी फक्त एक हल्ला आहे या दृश्यात दिसलेला.
ख्रिसः तर, त्या हल्ल्यात ११ लोक मारले गेले, बरोबर, दोन रुचर्स प्रतिनिधींसह?
ज्युलियनः होय. दोन रुचर्स प्रतिनिधी, दोन तरुण मुलं जखमी झाली. एकूण जवळपास १८ ते २६ लोक मारले गेले.
ख्रिसः आणि हे प्रसारीत झाल्यामुळं असंतोषाचा वणवा पेटला. यातल्या नेमक्या कोणत्या बाबीमुळं खरोखर वणवा पेटला, तुमच्या मते?
ज्युलियनः ठाऊक नाही, बहुतेक लोकांना दिसला हल्ल्यातला एकंदर अन्याय. कुणीतरी रस्त्यानं निवांत चालत निघालंय, आणि मग एक किलोमीटर वरचं एक अपाची हेलिकॉप्टर ३० मिलिमीटरचे तोफगोळे डागतंय प्रत्येकावर... कुठल्याही क्षुल्लक कारणावरुन ... आणि जखमींना मदत करणार्यांनाही ठार मारलं जातंय. आणि त्यात दोन पत्रकार होते जे नक्कीच बंडखोरांपैकी नव्हते कारण ही त्यांची पूर्ण-वेळ नोकरी होती.
ख्रिसः माझ्या माहितीनुसार, या अमेरिकी गुप्तचर विश्लेषकाला ब्रॅडली मॅनिंगला अटक झाली. आणि असं म्हणतात की त्यानं एका चॅट रुममध्ये कबूल केलं हा व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोचवल्याचं, २,८०,००० अमेरिकी वकिलातीच्या क्लासिफाईड केबल्ससह. म्हणजे, हे खरंय?
ज्युलियनः अं, आम्ही या केबल्स मिळाल्याचा इन्कार केला आहे. त्याच्यावर आरोप लावला आहे, पाचेक दिवसांपूर्वी, १,५०,००० केबल्स चोरण्याचा आणि ५० प्रसिद्ध करण्याचा. आता, आम्ही प्रसिद्ध केली होती या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या रेकजाविक वकिलातीतली एक केबल. पण यांचा काही संबंध असायचं कारण नाही. म्हणजे, मी त्या वकिलातीमध्ये परिचित होतो.
ख्रिसः म्हणजे, तुम्हाला खरंच मिळाली असती हजारो यु.एस. वकिलातीची कागदपत्रं...
ज्युलियनः तर आम्ही ती प्रसिद्ध केली असती. (ख्रिसः खरंच?)
ज्युलियनः अं, कारण अशा गोष्टी उघडकीस आणतात सत्य स्थिती जशी अरब राज्यकर्त्यां सारख्यांची, अशा शासनांकडून होणार्या मानवी हक्कांच्या पायमल्लीची. या क्लासिफाईड केबल्स बघितल्या तर, याच प्रकारची माहिती त्यांमध्ये दिसेल.
ख्रिसः तर याबद्दल अजून थोडं विस्तारानं बोलूयात. म्हणजे, सर्वसाधारणपणे, तुमची तत्त्वं काय आहेत? का योग्य वाटतं गुप्त माहिती लीक करायला प्रोत्साहन देणं?
ज्युलियनः हं, प्रश्न असा आहे की जगातली कुठल्या प्रकारची माहिती महत्त्वाची आहे, कुठल्या प्रकारची माहिती परिवर्तन घडवू शकते. तर अशी खूप सारी माहिती आहे. अशी माहिती ज्यावर संस्था पैसा ओततायत ती लपवण्यासाठी, हेच अधोरेखित करतं की जेव्हा ही माहिती बाहेर येईल, तेव्हा काहितरी विधायक जरुर घडेल. कारण ज्या संस्था ती पूर्णपणे जाणतात, ज्यांना त्याबद्दल सर्व माहिती आहे, त्याच ती लपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हीच सगळीकडची पद्धत असल्याचं आम्हाला दिसलं. आणि हाच आहे पत्रकारितेचा इतिहास.
ख्रिसः पण याचा धोका संभवतो का, संबंधित व्यक्तिंसाठी किंवा एकंदर समाजासाठी, की या लीकींगचे खरंच काही अनपेक्षित परिणाम होतील?
ज्युलियनः आम्ही प्रसिद्ध केलेल्या माहितीतून तरी असं काही आढळलं नाही. म्हणजे, आमचं एक धोके प्रतिबंधक धोरण आहे. आमची एक पद्धत आहे अशी माहिती हाताळण्याची जिच्यात व्यक्तिगत - खाजगी माहिती असते. पण काही वैध गुपितं असतात - जसे, तुमच्या डॉक्टरकडील तुमचे रेकॉर्ड्स; ते वैध गुपित आहे. पण आम्ही समोर येणार्या धोकादर्शकांवर काम करतो जे खरंच उपयुक्त असतात.
ख्रिसः तर ते खरंच उपयुक्त असतात. मग तुम्ही काय उत्तर द्याल, जसं की, म्हणजे, कुणाच्या तरी पालकांना - ज्यांचा मुलगा अमेरिकी सैन्यात आहे, आणि ते म्हणतायत, "हे बघा, तुम्ही असं काहितरी दाखवताय जे कुणालातरी हानिकारक आहे. ते दाखवतंय एक अमेरिकी सैनिक हसताना लोकांच्या मृत्युवर. यातून असा समज पसरतो - पसरला आहे जगभरातल्या लाखो लोकांमध्ये की अमेरिकी सैनिक अमानुष असतात. खरं तर, ते तसे नसतात. माझा मुलगा नाहीय. तुम्ही असं दाखवलंच कसं?" तुम्ही यावर काय उत्तर द्याल?
ज्युलियनः हं, आम्हाला याला खूप तोंड द्यावं लागतं. पण लक्षात घ्या, बगदादच्या लोकांना, इराकच्या लोकांना, अफगाणिस्तानच्या लोकांना - हे व्हिडीओ बघायची गरज नाही; ते हे दररोज प्रत्यक्ष बघतात. त्यामुळं त्यांची मतं बदलणार नाहीयेत. त्यांचे समज बदलणार नाहियेत. हेच ते दररोज बघताहेत. यामुळं समज आणि मतं बदलतील त्या लोकांची जे या सगळ्यासाठी पैसे मोजतायत. आणि एवढीच आमची आशा आहे.
ख्रिसः तर तुम्हाला मार्ग सापडला प्रकाश टाकण्याचा त्यावर जे तुम्हाला दिसतंय जशा या कंपन्या व शासनामधील अत्यंत गुप्त गोष्टी. उजेडात येणं चांगलं असतं. पण या वस्तुस्थितीतला विरोधाभास तुम्हाला जाणवतो का, की हे प्रकाशात आणण्यासाठी, तुम्हाला, स्वतःला, तुमच्या स्रोतांची गुप्तता सांभाळावी लगते?
ज्युलियनः तसं काही नाही. म्हणजे, आम्हाला आढळला नाही विकीलीक्सबद्दल असंतोष, अजूनतरी. आम्ही पाहिले नाहीत असे स्रोत जे इतर स्रोतांबद्दल असंतुष्ट असतील. असं कुणी आलं तर मात्र, आमच्यासाठी संकटच असेल. पण आम्ही सोयीस्करपणे असं काम करतोय की लोकांना वाटावं नैतिक जबाबदारीतून आमचं कार्य चालू ठेवावंसं, न की ते बिघडवावंसं.
ख्रिसः मला खरं तर जाणून घ्यायचंय, आत्तापर्यंत ऐकलेल्या माहितीवरुन - मला उत्सुकता आहे 'टेड'च्या प्रेक्षकांची मतं जाणून घ्यायची. म्हणजे, काही निराळी मतं असतील विकीलीक्स बद्दल आणि ज्युलियन बद्दल. जशी की, हिरो - लोकनायक - हा महत्त्वपूर्ण प्रकाश आणणारा. धोकादायक संकटं ओढवणारा. कुणाला तो हिरो वाटतो? कुणाला धोकादायक संकटं ओढवणारा वाटतो?
ज्युलियनः अरेच्चा. कुणीतरी असेलच की.
ख्रिसः खूपच मवाळ लोक आहेत, ज्युलियन, खूपच मवाळ. जरा अजून प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना अजून एक उदाहरण दाखवू. आता हे अजून तुम्ही लीक केलेलं नाहीये, पण मला वाटतं 'टेड'साठी तुम्ही करताय. म्हणजे हे एक गुप्त कारस्थान आहे नुकतंच घडवलेलं, बरोबर? काय आहे हे?
ज्युलियनः तर हा आहे नमुना आम्ही काय करतो त्याचा जवळपास दररोज. तर गेल्या वर्षाच्या शेवटी - गेल्या नोव्हेंबरमध्ये - बाँबस्फोटांची मालिका घडली अल्बानिया मध्ये मेक्सिकोच्या आखातामधल्या स्फोटांसारखी, पण तितकी मोठीही नाही. आणि आम्हाला एक रिपोर्ट मिळाला - जे घडलं त्याचं काहीसं तांत्रिक विश्लेषण - ज्यानुसार, प्रत्यक्षात, सुरक्षा रक्षकांनी काही विरोधी, प्रतिस्पर्धी तेल कंपन्यांच्या प्रत्यक्षात, तिथं ट्रक पार्क करुन ते उडवून दिले होते. आणि काही प्रमाणात अल्बानियन सरकार यात सामिल होतं, वगैरे, वगैरे. आणि त्या तांत्रिक रिपोर्टवर कुठलेही संदर्भ नव्हते. त्यामुळं आमच्यासाठी ते एक अतिशय अवघड डॉक्युमेंट होतं. आम्हाला त्याची शहानिशा करता आली नाही कारण आम्हाला माहिती नव्हतं त्याचा लेखक कोण आणि ते कशाबद्दल होतं. तर आम्ही थोडे साशंक झालो की कदाचित हा एखाद्या प्रतिस्पर्धी ऑईल कंपनीचा मुद्दा पेटवण्याचा प्रयत्न असेल. मग या कारणास्तव, आम्ही असं जाहीर केलं की, "हे पहा, आम्ही या गोष्टीबद्दल साशंक आहोत. आम्हाला माहिती नाही, पण आम्ही काय करु शकतो? माहिती उपयुक्त दिसतीये, योग्य वाटतीये, पण आम्हाला ती तपासूनच पाहता येत नाहीये." आणि मग आम्हाला एक पत्र मिळालं याच आठवड्यात एका कंपनीकडून, ज्यात लिहिलं होतं की त्यांना, याचा स्रोत शोधून काढायचा आहे - (हशा) असं की, "हे बघा, आम्हाला याच्या मुळापर्यंत पोचायचं आहे." आणि आमचं म्हणणं असं होतं की, "अच्छा, आणखी सांगा. नक्की कुठल्या डॉक्युमेण्ट बद्दल तुम्ही बोलताय? त्या डॉक्युमेंटवरील तुमचा कायदेशीर अधिकार तुम्ही सिद्ध करु शकता? ते नक्की तुमचंच आहे का?" मग त्यांनी आम्हाला हा स्क्रीन-शॉट पाठवला ऑथर च्या नावासह मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या आयडी मध्ये. ह्म्म्. (टाळ्या) असं बर्याच वेळा घडलंय पण. ही आमची अशी एक पद्धत आहे ओळख पटवण्याची - ती माहिती काय आहे हे तपासण्याची, या लोकांना पत्र लिहायला लावायचा प्रयत्न करण्याची.
ख्रिसः अच्छा. तुमच्याकडं काही माहिती आली होती का 'बीपी' च्या आतल्या गोटातून?
ज्युलियनः होय, आमच्याकडं बरीच आहे, पण म्हणजे, आत्ता, आम्ही निधी मिळवण्याच्या व जडणघडणीच्या प्रयत्नात आहोत. त्यामुळं आमचा प्रसिद्धीचा वेग गेल्या काही महिन्यांमध्ये काहीसा मंदावलाय जेव्हा आम्ही आमच्या यंत्रणेची पुनर्बांधणी करतोय आम्हाला मिळणार्या प्रचंड सामाजिक प्रतिसादासाठी. हीच एक समस्या आहे. म्हणजे, कुठल्याही वाढत्या स्टार्ट-अप कंपनीप्रमाणं, आम्ही काहीसे दडपून गेलोत आमच्या वाढीमुळं. आणि याचाच अर्थ असा की आम्हाला प्रचंड प्रमाणात मिळताहेत धोकादर्शक कागदपत्रं अत्युच्च दर्जाची, पण पुरेशी माणसं नाहीत खरोखर या माहितीवर प्रक्रीया करुन तिचं मूल्यमापन करण्यासाठी.
ख्रिसः तर ही आहे खरी समस्या, मुळात स्वयंसेवी पत्रकार आणि/किंवा पत्रकारांच्या पगारासाठी निधी?
ज्युलियनः होय. बरोबर, आणि विश्वासू लोक. म्हणजे, आमची संस्था अशी आहे जिची फार वेगवान वाढ होणं अवघड आहे आम्ही हाताळत असलेल्या माहितीमुळं. त्यामुळं आम्हाला पुनर्बांधणी करावी लागेल असे लोक आणण्यासाठी जे अतिसंवेदनशील राष्ट्रीय सुरक्षा संबंधी माहिती हाताळतील, आणि मग सुरक्षाविषयक समस्या कमी करतील.
ख्रिसः तर आम्हाला तुमची व्यक्तिगत माहिती सांगा आणि तुम्ही हे कसं सुरु केलंत. आणि माझ्या माहितीनुसार मी वाचलं होतं की लहानपणी तुम्ही ३७ निरनिराळ्या शाळांमध्ये गेलात. असं होऊ शकतं?
ज्युलियनः अं, माझे आईवडील चित्रपट उद्योगात होते आणि मग एका विधीपासून पळून जात होते, तर या दोन्ही गोष्टी एकत्र करुन...
ख्रिसः म्हणजे, एखादा मानसशास्त्रज्ञ म्हणेल हा अचूक उपाय आहे मनोरुग्ण जन्माला घालायचा.
ज्युलियनः कोणता, चित्रपट उद्योग?
ख्रिसः आणि तुम्ही होतात - म्हणजे, किशोर वयात तुम्ही एक हॅकरही होतात आणि प्रशासनाशी लवकरच भिडला होतात. ज्युलियनः अं, मी एक पत्रकार होतो. म्हणजे, किशोरावस्थेत मी एक अगदी तरुण पत्रकार कार्यकर्ता होतो. मी एक मॅगझिन काढलं, त्यासाठी माझ्यावर किशोरवयात खटला भरण्यात आला. त्यामुळं हॅकर बरोबर जपून वागा. म्हणजे एखादी क्लृप्ती असते अनेक गोष्टी करण्यासाठी वापरता येणारी. दुर्दैवानं, सध्यातरी, ती जास्त करुन रशियन माफीया कडून वापरली जाते तुमच्या आजीचं बँक अकाउंट लुटण्यासाठी. त्यामुळं ही संज्ञा आता - पूर्वीइतकी चांगली राहिली नाही.
ख्रिसः हं, पण, मला अजिबात वाटत नाही की तुम्ही कुणाच्या आजीचं बँक अकाउंट लुटताहात. पण काय आहेत तुमची मुलभूत तत्त्वं? तुम्ही आम्हाला त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का आणि तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग ज्याची ती तत्त्वं ठरवण्यात मदत झाली?
ज्युलियनः प्रसंगाबद्दल मला सांगता येणार नाही. पण मुलभूत तत्त्वं - अं, लायक, उदारमतवादी व्यक्ती पिडीत लोकांना कारणीभूत नसतात; तर पिडीतांना आधारभूत असतात. आणि हे माझ्या वडीलांकडून शिकलो आणि इतर लायक, उदारमतवादी व्यक्तींकडून माझ्या आयुष्यात आलेल्या.
ख्रिसः लायक, उदार व्यक्ती पिडीतांना कारणीभूत नसतात; त्यांना आधारभूत असतात?
ज्युलियनः होय. आणि माहितीय का, माझा स्वभाव भांडखोर आहे, त्यामुळं मी इतरांची काळजी घेण्याच्या बाबतीत फार मोठा नाही. पण इतर मार्गानं - हा एक मार्ग आहे पिडीतांना आधार देण्याचा, नजर ठेवणं दुष्टकृत्यं करणार्यांवर गुन्ह्यांवर. आणि म्हणून असं काहितरी माझ्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनलं आहे बर्याच वर्षांपासून.
ख्रिसः तर आम्हाला शेवटच्या मिनीटात पटकन सांगा, ही कहाणीः आयलंड मध्ये काय घडलं? आधी तिथं तुम्ही काहीतरी प्रसिद्ध केलंत, एका बँकेशी पंगा घेतलात, मग तिथल्या वृत्त वाहिनीला ही बातमी देण्यापासून रोखण्यात आलं. तरीसुद्धा, त्यांनी तुमची बाजू प्रसिद्ध केली. त्यानं तुम्हाला आयलंड मध्ये अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. पुढं काय घडलं?
ज्युलियनः हं, ही एक जबरदस्त केस आहे बरं. आयलंड आर्थिक संकटातून जात होतं. जगातील कुठल्याही देशापेक्षा जास्त झळ त्याला बसली होती. तिथलं बँकींग क्षेत्र होतं १० पट जीडीपी च्या इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत. असो, तर आम्ही हा रिपोर्ट प्रसिद्ध केला गेल्या वर्षी जुलै मध्ये. आणि राष्ट्रीय दूरदर्शन केंद्रावर मनाई आदेश पोहोचला प्रसारणाच्या पाच मिनीटं आधी. एखाद्या चित्रपटातल्यासारखं, मनाई आदेश न्यूज डेस्क वर येऊन पोचला, आणि न्यूज रीडर म्हणे, "असं पूर्वी कधीच घडलं नाही. आता काय करायचं?" तर, त्याजागी आपण फक्त वेबसाईट दाखवू, पूर्ण वेळ, वेळ काढण्यासाठी. आणि आम्ही आयलंड मध्ये प्रसिद्ध झालो, आयलंडला गेलो आणि या विषयावर बोललो. आणि लोकांमध्ये अशी भावना होती की असं पुन्हा कधी घडलं नाही पाहिजे. आणि परिणामतः. काम करुन आयलंडच्या काही राजकारण्यांसोबत आणि काही आंतरराष्ट्रीय कायदेतज्ञांसोबत, आम्ही बनवली एक नव्या प्रकारची विधान संहिता आयलंड साठी ज्यायोगे बनलं एक आश्रयस्थान मुक्त पत्रकारितेसाठी, जगातील सर्वात कडक पत्रकारिता सुरक्षा नियम, सोबत एक नवीन नोबेल पुरस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी. आयलंड हे एक नॉर्डीक राष्ट्र आहे त्यामुळं, नॉर्वे प्रमाणं, तिथंही यंत्रणा राबवणं शक्य आहे. आणि एकाच महिन्यापूर्वी, आयलंडच्या संसदेत हे एकमतानं मंजूर करण्यात आलं.
शेवटचा प्रश्न, ज्युलियन. भविष्याचा विचार करता, असं वाटतं का जसं की 'बिग ब्रदर' चं पूर्ण नियंत्रण राहील, अधिक गुप्ततेनं, की आपणच नजर ठेऊ 'बिग ब्रदर' वर, की यापैकी कुणीही प्रयत्न करीत राहील?
ज्युलियनः भविष्यात काय होईल हे सांगणं अवघड आहे. म्हणजे प्रचंड दबाव येतोय सांगड घालण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायदे आणि पारदर्शक शासन व्यवस्था यांची, जगभरातून - युरोपियन युनियन मधून, चीन व अमेरिकेमधून. पारडं कुठल्या बाजूला झुकेल? सांगणं अवघड आहे. म्हणूनच या कालखंडात असणं रंजक आहे. कारण थोड्याशा प्रयत्नांती आपण ते या किंवा त्या बाजूला झुकवू शकतो.
ख्रिसः हं, तर मी जणू प्रेक्षकांच्या वतीनं सांगतोय की, ज्युलियन, काळजी घे आणि तुला अधिक सामर्थ्य लाभो.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
वादग्रस्त वेबसाईट 'विकीलीक्स' संवेदनशील अधिकृत कागदपत्रं आणि व्हिडीओ मिळवून प्रसिद्ध करते. संस्थापक ज्युलियन असांज, जे चौकशीसाठी अमेरिकी अधिकार्यांना हवे आहेत, ते बोलताहेत 'टेड'च्या ख्रिस अँडरसन सोबत, ही साईट कशी चालते, तिनं काय साध्य केलंय - आणि त्यांना स्फूर्ती कुठुन मिळते, यांबद्दल. अमेरिकेनं नुकताच बगदाद वर जो हवाई हल्ला केला त्याचं चित्रणही या मुलाखतीत समाविष्ट आहे.
Internet activist Julian Assange serves as spokesperson for WikiLeaks, a controversial, volunteer-driven website that publishes and comments on leaked documents alleging government and corporate misconduct. Full bio »
Translated into Marathi by Mandar Shinde
Reviewed by Versatile CS
Comments? Please email the translators above.
19:45 Posted: Jul 2010
Views 389,078 | Comments 130
34:25 Posted: Oct 2006
Views 385,419 | Comments 49
13:10 Posted: Jun 2010
Views 766,548 | Comments 460
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.