सप्टेंबर १० तारखेला सकाळी, माझ्या सातव्या वाढदिवशी, मी खाली स्वयंपाकघरात आले, माझी आई भांडी घासत होती, आणि माझे वडील पेपर का काहीतरी वाचत होते, आणि मी त्यांना दारातूनच "दर्शन" दिले, आणि ते म्हणाले, "हॅपी बर्थडे!" आणि मी म्हणाले,"मी सात वर्षांची झाले." मग माझे वडील हसून म्हणाले, "मग याचा अर्थ तुला माहिती आहे ना?" आणि मी म्हणाले,"हो, आज माझ्यासाठी मेजवानी असणार आहे, केक आणि भरपूर भेटवस्तूसुद्धा." आणि वडील म्हणाले, "हो, ते ठीक आहे पण जास्त महत्त्वाचे हे आहे की तू सात वर्षांची झाली आहेस म्हणजे विचार करू शकशील अशा वयाची झाली आहेस आणि देव आणि माणसांविरुद्ध सगळी पापे करण्यास तयार झाली आहेस." (हशा)
मी "विचार करण्याचे वय" हा वाक्प्रचार आधी ऐकला होता. सिस्टर मेरी केवीन माझ्या दुसरीच्या वर्गात तो आमच्या डोक्यात हाणत होत्या. पण त्या ज्यावेळेस याबद्दल बोलत होत्या तेव्हा हा वाक्प्रचार, आमच्या पहिल्या सामूहिक प्रार्थनेविषयी आणि आमच्या पहिल्या पापांच्या कबुलीबाबतच्या उत्सुकतेत अडकल्यासारखा वाटायचा, आणि सर्वांना माहिती होते हे सगळे खरेतर पांढरा पोषाख आणि चेहरा झाकायच्या पांढऱ्या जाळीबद्दल होते, आणि मी "विचार करण्याचे वय" या वाक्प्रचाराकडे एकूणच जास्त लक्ष दिले नव्हते. म्हणून मी म्हणाले,"'विचार करण्याचे वय', नक्की काय अर्थ आहे त्याचा?" आणि वडील म्हणाले, "आपण कॅथॉलिक ख्रिस्ती धर्मावर विश्वास ठेवतो, इथल्या देवाला माहिती आहे की लहान मुलांना चांगल्या-वाईटातील फरक कळत नाही, पण जेव्हा तुम्ही सात वर्षांचे होता, तुम्हाला चांगले काय ते कळण्याची अक्कल येते. तर, तू मोठी झाली आहेस आणि विचार करू शकणाऱ्या वयाची झाली आहेस आणि आता देव तुझ्याविषयी नोंदी ठेवण्यास सुरू करेल ज्या कायमच्या तुझ्याबद्दलच्या नोंदवहीत ठेवल्या जातील." (हशा) आणि मी म्हणाले, "आं, एक मिनीट थांबा, म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या काळात, मी इतकी चांगली वागले तेव्हा देवाने काही पाहिलेच नाही?" आणि माझी आई म्हणाली, "पण मी नोंद ठेवली आहे." (हशा) आणि मी विचार केला, "मला हे आधीच का कळाले नाही? ते मला सांगत असताना माझ्या डोक्यात कसे घुसले नाही? येवढे सगळे चांगले वागल्याचा काहीच उपयोग नाही, आणि सगळ्यात वाईट म्हणजे ही महत्त्वाची माहिती मला ज्या दिवशी तिचा उपयोग शून्य आहे त्या दिवशीच का कळाली?" मग मी म्हणाले, "पण, आई-बाबा, सांता क्लॉजचे काय? सांता क्लॉजला तर माहितीच असते ना तुम्ही वांड आहात की शहाणे ते, बरोबर?" आणि माझे बाबा म्हणाले, "होय पण, मला वाटतय तांत्रिकदृष्ट्या त्याला फक्त थँक्सगिव्हींग आणि ख्रिसमसच्या मधल्या काळातलेच माहिती असते." आणि माझी आई म्हणाली, "बॉब, थांब. आपण तिला सांगूनच टाकू या. म्हणजे ती आता झाली सात वर्षांची. ज्युली सांता क्लॉज नसतोच." (हशा) आता खरेतर यात मला वाईट वाटण्यासारखे काही नव्हते.
माझ्या पालकांकडे सांताक्लॉज बद्दल एक भलीमोठी गोष्ट होती: ते कसे सांताक्लॉजशी बोलले आहेत आणि तो इतर घरात जशा ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू देत होता आणि त्यांना सकाळी उठल्या उठल्या त्या उघडायची संधी द्यायचा , त्याऐवजी आमच्या कुटूंबाने त्याला भेटवस्तू देण्यास जास्त वेळ कसा दिला होता, आम्ही ख्रिसमसच्या सकाळच्या ९ च्या प्रार्थनेला गेलो असताना तो आमच्या घरी यायचा, आणि तेही आम्ही मुलांनी जास्त हट्ट केला नाही तरच. त्यामुळे मला शंका आलीच होती. आमचे पालकच आम्हाला भेटी देत होते हे उघडच होते. म्हणजे असे की, माझ्या बाबांची भेटवस्तूंना कागदाने सजवण्याची एक विशिष्ट पद्धत होती, आणि माझ्या आईचे हस्ताक्षर सांतासारखेच होते. आणि, सांताकडे सगळ्यांकडे रात्री जाऊन आल्यावर परत आमच्या घरी यायला कशी काय सवड होती? आणि या सगळ्या पुराव्यांच्या पर्वतावरून एकच निष्कर्ष निघाला: आमचे कुटूंब एवढे वेगळे आणि विचित्र होते की सांताही आमच्याकडे येण्यास तयार नव्हता, आणि माझे बिचारे पालक सांताने आव्हेरल्यामुळे आम्हाला लाज वाटू नये किंवा कमीपणा वाटू नये म्हणून आम्हाला ते कळू देत नव्हते. सांता आनंदी होता पण मान्य करावेच लागेल की तो लोकांना जरा जास्तच चांगले-वाईट ठरवत होता. म्हणून सांता क्लॉज नाही हे कळल्यावर मला खरोखर हायसेच वाटले होते.
मी स्वयंपाकघरातून बाहेर पडले त्यावेळी सांता नसल्याचा मला धक्का बसला नव्हता पण ही "विचार करण्याचे वय" गोष्ट मला आतापर्यंत कशी कळाली नाही हे कोडे पडले होते. मला फारच उशीर झाला होता, पण ज्याला या माहितीचा उपयोग करता येऊ शकेल अशा दुसऱ्या कोणालातरी मला मदत करता आली असती. ते दोन नियमांत बसणारे हवेत: त्यांना "विचार करण्याचे वय" ही भानगड काय आहे ते कळेल इतके त्यांचे वय हवे पण ते सात वर्षांचे नसतील. उत्तर स्वच्छच होते: माझा भाऊ बिल. तो सहा वर्षांचा होता. तर, माझ्या घरापासून जवळच असलेल्या शाळेच्या मैदानात मला बिल सापडला. तो एक शनिवार होता आणि तो एकटाच भिंतीच्या बाजूवर पायाने चेंडू मारत खेळत होता. मी त्याच्याकडे पळाले आणि म्हणाले,"बिल! मला आत्ताच कळाले की आपण सात वर्षांचे झालो की 'विचार करण्याचे वय' सुरू होते. आणि देव व माणसांविरुद्ध सगळी पापे करण्यास आपण तयार होतो." आणि बिल म्हणाला, "मग?" आणि मी म्हणाले, "तर, तू सहा वर्षांचा आहेस. तुझ्याकडे आणखी एक वर्ष आहे तुला वाटेल ते करण्यासाठी आणि देव ते पाहणारही नाही." आणि तो म्हणाला, "तर मग?" आणि मी म्हणाले, " तर मग? तर मग सगळेच" आणि मी परत जायला निघाले. मला त्याचा इतका राग आला होता. पण जेव्हा मी पायऱ्यांवर चढले मी नाटकीपणाने वळाले आणि म्हणाले, "आणि, जाता जाता सांगते बिल, सांता क्लॉज नसतोच." (हशा)
मला त्यावेळी माहिती नव्हते, पण मी सप्टेंबर १० ला सात वर्षांची झाले नव्हते. माझ्या १३ व्या वाढदिवसाला, मी माझ्या मैत्रिणींना रात्री झोपायला घरी बोलवून एक मेजवानी द्यायची ठरवले, पण दोन आठवडे आगोदरच आईने मला बाजूला घेतले आणि म्हणाली, "मला तुझ्याशी काहीतरी खाजगी बोलायचे आहे. सप्टेंबर १० तुझी जन्मतारीख नाही आहे. तुझा जन्म १० ऑक्टोबरला झाला होता आणि मी म्हणाले, "काय?" (हशा) आणि ती म्हणाली, "ऐक. बालवाडीच्या प्रवेशाची शेवटची तारीख सप्टेंबर १५ होती." (हशा) "म्हणून मी त्यांना सांगितले की तुझी जन्मतारीख सप्टेंबर १० आहे, आणि मला अशी शंका आली की तू तुझी खरी जन्मतारीख सगळीकडे सांगत सुटशील, म्हणून तुलाही जन्मतारीख १० सप्टेंबरच आहे असे सांगायला सुरू केले. पण ज्युली तू शाळेत जाण्यासाठी तयार होतीस, अगदी पूर्णपणे." मी त्यावर विचार केला, ज्यावेळी मी ४ वर्षांची होते तेंव्हा मी माझ्या ३ भावंडांची सर्वात मोठी बहीणही बनले होते आणि आईची पुढच्या बाळाच्या आगमनाची तयारी सुरू झाली होती, त्यामुळे ती जेव्हा तू तयार होतीस असे म्हणाली त्याचा खरा अर्थ ती तयार होती असा होता हे मला समजून चुकले. मग ती म्हणाली, "काळजी करू नकोस, ज्युली, प्रत्येकवर्षी १० ऑक्टोबरला म्हणजे तुझ्या वाढदिवशी तुला माहिती नसतानाही तू एक केकचा तुकडा खाशील हे मी पहात होते" (हशा) हे आरामदयक होते पण त्रासदायकही. माझी आई माझा वाढदिवस माझ्याबरोबर साजरा करत होती, मला सोडून! या सगळ्या नवीन माहितीतली सर्वात दुःखदायक गोष्ट ही नव्हती की मला मैत्रीणींसाठीच्या मेजवानीची तारीख बदलायला लागणार होती, सर्वात जास्त दुःखदायक गोष्ट होती की मी कन्या राशीची राहिले नव्हते. माझ्या बेडरूममध्ये कन्या राशीचे एक मोठे पोस्टर होते, आणि मी माझे भविष्य प्रत्येक दिवशी वाचले होते आणि ते मला हुबेहूब लागू पडले होते. (हशा) आणि याचा अर्थ होता की तूळ राशीची होते? मग नवीन तूळ राशीचे पोस्टर घेण्यासाठी मी बसने गावात गेले. कन्या राशीच्या चित्रात पाण्याशेजारी चालणारी लांब केस असलेली एक सुंदर स्त्री होती पण तूळ राशीच्या चित्रात फक्त मोठाच्या मोठा तराजू होता. हे तेव्हाचेच आहे ज्यावेळी माझी शारीरिक दृष्ट्या वाढ होत होती आणि माझी वाढ इतर मुलींपेक्षा जरा जास्तच होत होती आणि खरे सांगते, माझी राशी म्हणजे एक तराजू असणे ही कल्पनाच अपशकुनी आणि निराशावादी होती. (हशा) पण मी ते नवीन तूळ राशीचे पोस्टर आणले आणि माझे तूळ राशीचे भविष्य वाचायला सुरूवात केली आणि आश्चर्य म्हणजे तेही मला हुबेहूब लागू पडत होते.
यानंतर बरेच वर्षांनी या विचार-करण्याचे-वय/जन्मतारखेतील-बदल याबद्दल विचार करताना माझ्या डोक्यात प्रकाश पडला की ज्यावेळी मला मी सात वर्षांची झाले असे वाटत होते त्यावेळी मी सात वर्षांची नव्हतेच. देवाने माझ्याविषयी नोंदी ठेवणे सुरू करण्यापूर्वी माझ्याकडे मला काही वाटेल ते करण्यासाठी संपूर्ण एक महिना होता. आयुष्य किती दुष्ट असू शकते. एके दिवशी दोन मॉर्मन मिशनरी माझ्या दारावर आले. आता, मी राहते लॉस-एंजलेसच्या मुख्य धावपळीच्या भागाच्या बाजूलाच आणि माझा भाग -- दारोदारी वस्तू घेऊन हिंडणाऱ्या लोकांसाठीचा पहिला बिंदू आहे. कधीकधी सेवंथ डे अॅडवेंटिस्ट चर्चच्या छोटूकल्या म्हाताऱ्या मला स्वर्गाची चित्रे दाखवायला येतात. आणि कधी कधी पौगंडावस्थेतील मुले येतात जी मला वचन देतात की जर मी फक्त कुठल्या तरी मासिकाची त्यांच्याकडे वर्गणी भरली तर ती लोकांना लुबाडणाऱ्या कोणत्याही गुंडाच्या टोळीत जाणार नाहीत. त्यामुळे मी सहसा दारावरच्या घंटेकडे दुर्लक्ष करते, पण त्यादिवशी मी दार उघडले. आणि तेथे उभे होते पांढरे-शुभ्र छोट्या बाह्यांचे सदरे घातलेले १९ वर्षांचे दिसणारे दोन मुलगे आणि त्यांच्या सदऱ्यांवर ते जिझस ख्रिस्त ऑफ लॅटर डे सेंट्स या चर्चचे अधिकृत प्रतिनिधी आहेत हे सांगणाऱ्या छोट्याशा पट्ट्या होत्या. आणि ते म्हणाले देवाने त्यांच्यातर्फे मला संदेश पाठवला आहे. मी म्हणाले, "माझ्यासाठी संदेश? देवाकडून" आणि ते म्हणाले, "हो." मी प्रशांत महासागाराकडील वायव्येकडे लॅटर डे सेंट्स या चर्चवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्यात वाढले असले म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम केले आहे आणि त्यांच्या बरोबर बाहेर फिरायला गेले असले तरी त्यांच्या धर्मातील तत्त्वे मला माहिती नव्हती किंवा प्रसारासाठी बाहेर पडल्यावर ते काय बोलतात तेही माहिती नव्हते आणि मला वाटते मला थोडीशी जिज्ञासा होती, म्हणून मी म्हणाले, "बर, कृपया आत या." आणि ते एकदम खूश झालेले दिसले कारण त्यांच्याबाबतीत असे सहसा कधी घडत नसणार. (हशा)
आणि मी त्यांना बसवले आणि पेले भरून पाणी दिले -- ठीक आहे, मला जमलय. मी त्यांना पेले भरून पाणी दिले. एक गोष्ट सांगते, माझ्या केसांना धक्का लावू नका (हशा) तुम्ही माझी चलचित्रिका माझ्यासमोर लावता आणि मी माझे केस सावरणार नाही असे वाटते तरी कसे? (हशा) ठीक आहे, तर मी त्यांना बसवले आणि पेले भरून पाणी दिले आणि औपचारिक चौकशीनंतर ते म्हणाले, "तुम्हाला यावर विश्वास आहे का की देव तुमच्यावर त्याच्या हृदयाच्या तळापासून प्रेम करतो?" आणि मी विचार केला, "माझा देवावर नक्कीच विश्वास आहे, पण, पण मला तो शब्द 'हृदय' नाही आवडला कारण त्यामुळे देवाचे मानवीकरण केल्यसारखे वाटते आणि मला 'त्याचा' शब्दही नाही आवडला कारण त्यामुळे देवाला उगीचच कुठले तरी लिंग लावले असे होते." पण मला फक्त शाब्दिक चुकांवर उगीचच चर्चा करायची नव्हती, म्हणून अगदी लांब आणि अस्वस्थ अशा शांततेनंतर मी म्हणाले, "हो, हो, मला वाटते. माझ्यावर त्याचे नक्कीच प्रेम आहे." आणि त्यांनी एकमेकाकडे पाहून असे स्मितहास्य केले की ते बरोबर उत्तर होते. आणि ते म्हणाले, "तुम्हाला असे वाटते का की या ग्रहावर आपण सारे बंधू-भगिनी आहोत?" आणि मी म्हणाले, "हो, हो, मला वाटते". मी लगेचच उत्तर देऊ शकल्याने मला हायसे वाटले आणि ते म्हणाले, "बर, मग आम्हाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे."
आणि मग त्यांनी मला या जेरुसलेममध्ये इसपूर्व ६०० मध्ये रहात असलेल्या लेही नावाच्या माणसाची गोष्ट सांगण्यास सुरूवात केली. आणि इसपूर्व ६०० मध्ये जेरुसलेममधील सगळेच लोक वाईट आणि दुष्ट होते म्हणे. अगदी प्रत्येकजण: पुरूष, स्त्री, मुल, बाळ, अर्भक. आणि देव लेहीकडे आला आणि त्याला म्हणाला, "तुझ्या कुटूंबाला नावेत घाल आणि मी तुला येथून बाहेरचा रस्ता दाखवतो." आणि देवाने त्याला रस्ता दाखवला, अमेरिकेचा. मी म्हणाले, "अमेरिका? इसपूर्व ६०० मध्ये नावेतून जेरुसलेम ते अमेरिका?" आणि ते म्हणाले, "हो." (हशा) मग त्यांनी मला पुढे सांगितले की लेही आणि त्याचे वंशज कसे वाढतच गेले आणि पुढील ६०० वर्षांच्या काळात त्यांच्यात कसे दोन वर्ण निफाईट्स व लॅमेनाईट्स तयार झाले आणि निफाईट्स कसे संपूर्णपणे चांगले होते - त्यांच्यातील प्रत्येकजण -- आणि लॅमेनाईट्स कसे संपूर्णपणे वाईट आणि दुष्ट होते -- त्यांच्यातील प्रत्येकजण अगदी मुळापासून वाईट. (हशा)
मग, जिझस क्रॉसवर आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी मृत्यूमुखी पडला आणि, स्वर्गाच्या रस्त्यावर तो अमेरिकेत थांबला आणि निफाईट्स लोकांना भेटला. (हशा) आणि त्याने त्यांना सांगितले की जर त्यांच्यातील प्रत्येकजण अगदी संपूर्णपणे चांगला राहिला -- तर ते दुष्ट लॅमेनाईट्सच्या विरूद्धचे युद्ध जिंकतील. आणि बहुतेक कोणीतरी घोटाळा, कारण लॅमेनाईट्सनी सर्व निफाईट्स लोकांना ठार मारले. फक्त एकाला सोडून ज्याचे नाव होते मॉर्मन, ज्याने जंगलात लपून स्वतःला वाचवले. आणि त्याने ही सर्व गोष्ट बदललेल्या ईजिप्तीय भाषेत एका सोन्याच्या पाट्यांवर कोरून नंतर पाल्मायरा, न्यू यॉर्क येथे पुरून ठेवली. (हशा) मी खुर्चीवरून पडायची बाकी होते. (हशा) मी म्हणाले, "लॅमेनाईट लोकांचे काय झाले?" आणि ते म्हणाले, "ते म्हणजे अमेरिकेत ज्यांना आपण अमेरिकेतील मूलनिवासी म्हणतो ते." आणि मी म्हणाले, "तुला असे वाटते की अमेरीकेतील मूलनिवासी संपूर्णपणे वाईट असलेल्या लोकांचे वंशज आहेत?" आणि ते म्हणाले, "हो" आणि मग त्यांनी मला सांगितले जोसेफ स्मिथ नावाच्या माणसाला कशा त्या सोनेरी पाट्या त्याच्या अंगणात मिळाल्या आणि त्याला एक जादूई दगडही मिळाला जो त्याने आपल्या टोपीत ठेवला आणि त्या टोपीत आपला चेहरा घुसवला आणि त्यामुळे त्याला बदललेल्या ईजिप्तिय भाषेतून इंग्रजीत भाषांतर करता आले याबद्दल.
तर, आता मला या दोन मुलांना त्यांच्या भाषणपद्धतीबद्दल सल्ला द्यायचा होता. (हशा) मला असे म्हणायचे होते, "ठीक आहे. या गोष्टीने सुरूवात करू नका." म्हणजे, सायंटॉलॉजिस्टनाही व्यक्तिमत्व चाचणीने सुरुवात करावी येवढे माहिती आहे (टाळ्या) -- लोकांना झेनूबद्दलची सर्व माहिती लोकांना सांगण्याआधी जो एक दुष्ट आंतर्दिर्घिकीय सम्राट आहे ठीक, मग ते म्हणाले, "" तुमचा विश्वास आहे का की देव आपल्याशी विवेकी प्रेषितांच्यातर्फे बोलतो?" आणि मी म्हणाले, "नाही, मला विश्वास नाही." कारण मला लॅमेनाईट्सच्या आणि आणि त्या वेडपट सोन्याच्या पाट्यांच्या कथेने थोडे अस्वस्थ झाल्यासारखे झाले होते, पण सत्य हे होते की मी याबद्दल खोल विचार केला नव्हता, म्हणून मी थोडीशी माघारी गेले, "तर, तुम्हाला विवेकी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? आणि प्रेषितचा तुम्हाला कोणता अर्थ अपेक्षित आहे? म्हणजे असे की स्त्रिया प्रेषित असू शकतात का?" आणि ते म्हणाले, "नाही." मग मी म्हणाले,"का?" आणि ते म्हणाले, "कारण देवाने स्त्रियांना अशी भेट दिली आहे जी इतकी महान आहे, आश्चर्यकारक आहे की पुरुषांना देण्यासाठी त्याच्याकडे फक्त प्रेषितपणाचीच भेट राहिली होती." अशी कोणती आश्चर्यकारक गोष्ट देवाने स्त्रियांना भेट म्हणून दिली आहे, मी विचार करू लागले? बहुतेक त्यांची लोकांबरोबर जुळवून घेऊन काम करण्याची आणि परिस्थीतीनुसार बदलण्याची क्षमता? स्त्रियांचा लांब आयुष्यकाल? किंवा स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी हिंसक असतात हे तथ्य? पण, नाही भेट त्यापैकी कोणतीच नव्हती. ते म्हणाले, "त्यांची मुले जन्माला घालू शकण्याची क्षमता." मी म्हणाले, "ह्या. काय सांगताय, म्हणजे जरी स्त्रियांनी त्या १५ वर्षाच्या झाल्यापासून ते ४५ वर्षांच्या होईपर्यंतचा काळात अगदी प्रत्येक वर्षी मुल होण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यातून होणाऱ्या त्रासाने मेल्या नाहीत असे मानले तरी स्त्रियांना थोडासा तरी वेळ मिळेल देवाचा शब्द ऐकण्यास असे वाटते." आणि ते म्हणाले,"नाही." (हशा)
आता ते ताजेतवाने आणि गोड दिसत नव्हते, पण त्यांना अजुनी बोलायचे होते. ते म्हणाले, "बर, आमचा असा विश्वास आहे की जर तुम्ही मॉर्मन असाल आणि तुम्ही चर्चबरोबर चांगले राहिलात, तर तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही स्वर्गात जाल आणि अनंत काळापर्यंत तुमच्या कुटुंबाबरोबर रहाल." आणि मी म्हणाले, "अरे, बापरे -- (हशा) माझ्यासाठी ते तेवढे फायद्याचे नाही आहे." (हशा) आणि ते म्हणाले, "असं -- बर, आमचा असाही विश्वास आहे की तुम्ही जेव्हा स्वर्गात जाल, तुमचे शरीर पुन्हा पूर्ववत स्थितीत तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमचा पाय (अपघातात) गेला असेल तर तो तुम्हाला परत मिळेल. किंवा तुम्ही काही कारणाने आंधळे झाला असाल तर तुम्ही पाहू शकाल." मी म्हणाले, "असं -- आता, काही वर्षापूर्वी कर्करोग झाल्यानंतर माझे गर्भाशय काढून टाकले होते. मग याचा अर्थ असा आहे का की स्वर्गात गेले तर ते मला परत मिळेल?" आणि ते म्हणाले, "नक्कीच." आणि मी म्हणाले, "पण ते मला नको आहे, त्याच्याशिवाय मी सुखी आहे." देवा. जर कोणी नकटे नाक शस्त्रक्रियेने सरळ करून घेतले असेल तर ? (हशा) देव तुम्हाला तुमचे जुने नाक परत घ्यावयास लावेल? तर, मग त्यांनी 'मॉर्मनचे पुस्तक' मला दिले. आणि मला हा पाठ वाच आणि तो पाठ वाच असे सांगितले आणि ते म्हणाले की ते कधीतरी परत येऊन माझी चौकशी करतील आणि मला वाटतय की मी म्हणाले की "कृपया यायची घाई करू नका" किंवा बहुतेक " कृपया येऊ नका." आणि ते गेले.
ठीक, तर, मला सुरवातीला या मुलांपेक्षा मी जास्त हुशार आणि माझ्या पारंपारिक श्रद्धेमुळे छान वाटत होते. पण नंतर, मी जसा जास्त विचार करू लागले, मला स्वतःशी आणखी जास्त आणखी जास्त प्रामाणिक व्हावे लागले. जर कोणी माझ्या दाराशी आले आणि अगदी पहिल्यांदाच कॅथॉलिक अध्यात्म आणि तत्त्वे सांगू लागले आणि ते म्हणाले की "देवाने एका अगदी तरुण मुलीला गरोदर केले संभोग न करता आणि तिच्या कुमारिका असण्याला आम्ही वेड्यासारखे महत्त्व देतो -- (हशा) आणि तिला एक बाळ झाले आणि तो देवाचा मुलगा होता," तर मला तेही तेवढेच मूर्खपणाचे वाटेल, पण इतकेच की सारखे ऐकून त्या गोष्टीची आता सवय झाली आहे. (हशा) मग मला त्या मुलांपेक्षा शहाणे आहोत असे वाटेना.
पण ते आले तेव्हा त्यांनी जो प्रश्न मला विचारला तो माझ्या डोक्यात रेंगाळत होता: मला देव माझ्यावर हृदयाच्या तळापासून प्रेम करतो असा विश्वास आहे का? कारण मला त्या प्रश्नाबद्दल काय वाटते हे नक्की माहिती नव्हते. आता, जर त्यांनी मला विचारले असते की तुम्हाला देव तुमच्यावर हृदयाच्या तळापासून प्रेम करतो असे वाटते का? तर, ते एकदमच वेगळे झाले असते, मला वाटते मी लगेचच उत्तरले असते, "हो, हो, मला तसे नेहमीच वाटते. मला देवाचे प्रेम जेव्हा मी दुःखी असते किंवा गोंधळलेली असते त्यावेळी जाणवते. मला कोणीतरी समजावते आहे, माझी काळजी घेते आहे असे वाटते. खादी वाईट घटना का घडते हे मला कळत नाही तेव्हा मी देवाच्या प्रेमातच आसरा घेते आणि मी जेव्हा सर्व सौंदर्याकडे आभारपूर्वक पाहते पण त्यांनी मला तो प्रश्न "विश्वास" हा शब्द वापरून विचारला, तेव्हा तो एकदम वेगळा वाटला, कारण मला जे स्पष्टपणे वाटते त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे का याबाबत मी ठाम नव्हते.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation, or join one of these:
ज्युलिया स्वीनी( देव म्हणाला, "हा!") सादर करतायत त्यांच्या एकपात्री "देवाचा निरोप घेताना" मधील पहिली १५ मिनीटे. एक दिवशी जेव्हा दोन मॉर्मन मिशनरी त्यांचे दार ठोठावतात, तेंव्हा सुरू होतो एक प्रवास त्यांच्या स्वतःच्या श्रद्धांबद्दल पूर्णपणे परत विचार करण्याचा.
Julia Sweeney is an actor and writer who does comedic solo shows that tackle deep issues: cancer, family, faith. Her next book is "If It's Not One Thing, It's Your Mother," on parenting and being parented. She performs regularly with Jill Sobule, telling stories alongside Jill's songs, in their "Jill & Julia Show." Full bio »
Translated into Marathi by Pratik Dixit
Reviewed by pulasti choudhary
Comments? Please email the translators above.
13:25 Posted: Nov 2006
Views 1,804,479 | Comments 379
29:10 Posted: Apr 2007
Views 2,005,672 | Comments 5844
24:45 Posted: Jul 2006
Views 667,789 | Comments 713
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.