मला एका खेळापासून सुरुवात करायची आहे. आणि हा खेळ जिंकण्यासाठी, तुम्हाला फक्त तुमच्या समोरील सत्य पाहायचे आहे जसेच्या तसे. ठीक आहे? तर, इथे दोन पुठ्ठे आहेत, रंगीबेरंगी ठिपके असलेले. आणि दोन्ही पुठ्ठ्यांवर असा एकच ठिपका आहे की ज्याचा रंग समान आहे. ठीक आहे? आणि तुम्ही मला सांगायचे आहे कोणता ते.
आता, उत्तर फक्त करड्या, हिरव्या आणि नारिंगी रंगातील ठिपक्यांपैकीच असेल तर तर सुरू करुया सोप्यापासून -- हात वर करा -- ज्या लोकांना वाटते की करड्या रंगाचा ठिपका दोन्ही पुठ्ठ्यांवर आहे? खरोखर? बरं. किती लोकांना वाटते की हिरवा ठिपका आहे? आणि किती लोकांना वाटते की नारिंगी आहे? जवळजवळ समान विभागणी आहे.
आता पाहूया प्रत्यक्षात काय आहे ते. हा नारिंगी ठिपका. (हशा) हा हिरवा ठिपका. आणि हा करडा. (हशा) तर, ज्यांनी ज्यांनी ते पाहिले, तुम्ही संपूर्ण वास्तवतावादी आहात. ठीक ना? (हशा)
हे खरोखर एकदम अफलातून आहे, नाही का? कारण जवळजवळ प्रत्येक जीवंत प्रणाली मध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकाश ओळखण्याची क्षमता उत्क्रांत झाली आहे. म्हणूनच, आपल्या मेंदूसाठी, रंग पाहणे ही सगळ्यात सोप्या कामांपैकी एक आहे. आणि तरीही, या सर्वात मुलभूत पातळीवरही, आजूबाजूची परिस्थितीच(context) सर्व काही आहे. मला "आजूबाजूची परिस्थितीच म्हणजे सर्व काही" याबद्दल बोलायचे नाही आहे, पण ती तशी का आहे, याबद्दल बोलायचे आहे. कारण त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगते फक्त "आपण जे पाहतो ते का पाहतो" एवढेच नाही तर, आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत, आणि समाज म्हणून कसे आहोत, हेही.
पण पहिल्यांदा, आपण आणखी एक प्रश्न विचारायला हवा, जो आहे, "रंग कशासाठी आहे?" आणि तुम्हाला सांगण्याऐवजी, मी फक्त तुम्हाला दाखवतो. तुम्ही जे पाहता आहात तो एक जंगलातील देखावा आहे. आणि तुम्हाला पृष्ठभाग दिसतात ते त्यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या प्रमाणानुसार आता, तुमच्यापैकी कोणाला तुमच्यावर उडी मारण्याच्या बेतात असलेला शिकारी प्राणी दिसतो का? आणि जर तुम्हाला तो दिसला नाही तर तुम्ही मेलेले असाल. बरोबर? (हशा) कोणाला दिसतो का? एकतरी? नाही? आता, आपण पृष्ठभाग पाहू परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या प्रकारानुसार. आणि आता तुम्ही पाहू शकता.
म्हणजे, रंग आपल्याला पृष्ठभागांमधील समानता आणि फरक दाखवण्यास मदत करतात, त्यांच्यावरून परावर्तित होणाऱ्या विविध प्रकारच्या रंगलहरींनुसार. पण तुम्ही जे काही केले ते, बऱ्याच अंशी, गणितीय दृष्ट्या अशक्य आहे. का? कारण, जसे बर्कली आपल्याला सांगतात, आपल्याला आपल्या भोवतालच्या भौतिकी विश्वाला थेट प्रवेश नाही आहे, तो फक्त आपल्या संवेदनांतर्फे आहे. आणि आपल्या डोळ्यांवर पडणारा प्रकाश जगातील बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो -- फक्त गोष्टींचा रंगच नाही तर, त्यांच्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग, आणि त्यांच्या आणि डोळ्यांमधील माध्यमाचा रंग यांच्यावरही. तुम्ही यातील एकही गोष्ट बदला, आणि तुमच्या डोळ्यावर पडणाऱ्या प्रकाशाचा रंग तुम्ही बदललेला असेल.
ही मोठी अवघड गोष्ट आहे कारण याचा अर्थ कारण एकाच चित्राचे खऱ्या जगात अनंत स्रोत असू शकतात. मला काय म्हणायचे आहे ते मला दाखवू दे. समजा, ही तुमच्या डोळ्याची मागची बाजू आहे. आणि या बाहेरील जगातून आलेल्या दोन प्रतिमा आहेत. त्या सर्व प्रकारे एकसारख्याच आहेत. आकारानुसार, लहान-मोठेपणानुसार, किंवा प्रकाशाच्या तरंगलांबीनुसार. आपल्याला डोळ्यांच्या दृष्टीने त्या समानच आहेत. आणि तरीही त्या दोन संपूर्णतः वेगळ्या स्रोतांपासून तयार झाल्या आहेत. उजवीकडची पिवळ्या पृष्ठभागापासून येते, सावलीतील, डावीकडे तोंड असलेल्या, गुलाबी माध्यमातून पाहिले तर. आणि डावीकडील प्रतिमा तयार होते एका नारिंगी पृष्ठभागापासून, थेट प्रकाशातील, उजवीकडे तोंड असलेल्या, निळ्या माध्यमातून पाहिली असता. संपूर्णतः वेगळे अर्थ, पण दृष्टिपटलावर अगदी एकसारखीच माहिती. आणि आपल्याला फक्त दृष्टिपटलावर असेल तेवढीच माहिती मिळते.
मग आपल्याला पाहता येणे शक्य तरी कसे आहे? म्हणून, जर तुम्हाला पुढच्या १८ मिनीटांतील काही लक्षात ठेवायचे असेल, तर हे ठेवा: जो प्रकाश तुमच्या डोळ्यावर पडतो, ज्ञानेंद्रियांतर्फे मिळणारी माहिती, अर्थशून्य आहे. कारण तिचा अक्षरशः काहीही अर्थ असू शकतो. आणि जे ज्ञानेंद्रियांच्या माहितीबद्दल खरे हे ते कोणत्याही माहिती विषयी खरे आहे. माहितीमध्ये अंतर्भूत अर्थ नसतो. आपण जे त्या माहितीबरोबर करतो त्याला महत्त्व आहे.
तर, आपण कसे पाहतो? आपण पाहतो पाहायला शिकून. मेंदूने आकृतीबंध शोधून काढण्याची पद्धती उत्क्रांतीतून विकसित केली आहे, विविध माहितीमधील नाते-संबंध शोधून काढण्यासाठी, आणि त्या नात्यांचा आपल्या वागणूकीतील अर्थांशी संबंध जोडण्यासाठी, महत्त्वाच्या गोष्टींशी, जगाबरोबर चालत-बोलत असताना. आपल्याला याची जाण आहे संज्ञानात्मक/आकालनात्मक गुणांच्या स्वरूपावरून, "भाषेसारख्या". मी तुम्हाला काही अक्षर मालिका दाखवणार आहे. आणि तुम्ही मला त्या वाचून दाखवा, जर तुम्हाला जमत असेल तर.
प्रेक्षक: "Can you read this?" "You are not reading this." "What are you reading?"
बो लोटो : "What are you reading?" यातील अर्धी अक्षरे गायब आहेत. बरोबर? "H" ला "W" आणि "A" च्या मध्ये असण्याचे मूलतः किंवा आधीपासून काही कारण नाही. पण तुम्ही तिथे ते जोडता. का? कारण तुमच्या जुन्या अनुभवांच्या सांख्यिकीनुसार तसे केल्याने तुम्हाला पूर्वी उपयोग झाला आहे. म्हणून तुम्ही तसे परत करता. आणि तरी तुम्ही पहिल्या "T" च्या आधी अक्षर जोडत नाही, का? कारण पूर्वी तसे करण्याचा काही उपयोग झाला नव्हता. म्हणून आताही तुम्ही तसे करत नाही.
तर मी तुम्हाला दाखवतो मेंदूची साधारणपणाची व्याख्या किती लगेच बदलते, अगदी सोप्या गोष्टीची, जसे की रंग. आता, जर येथील वरचा प्रकाश थोडा कमी करता आला तर. पहिल्यांदा याची नोंद करा की ती वाळवंटाची चित्रे अगदी एकच आहेत. एक दुसऱ्याचे प्रतिबिंब आहे. ठीक? आता तुम्ही पाहा त्या बिंदूकडे हिरव्या आणि लाल चौकटींमधील. ठीक आहे? आणि त्याकडे टक लावून पाहा. आणखी कोठेही पाहू नका. आणि आपण त्याकडे पाहणार आहोत जवळजवळ ३० सेकंद, १८-मिनीटांच्या भाषणात फार जास्त वेळ आहे हा. (हशा)
पण तुम्ही खरोखर हे शिकावे असे वाटते. आणि मी तुम्हाला सांगेन -- कोठेही दुसरीकडे पाहू नका -- आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात काय होत आहे. तुमचा मेंदू शिकत आहे. तो शिकत आहे की उजव्या बाजूच्या दृष्टिक्षेत्रावर लाल रंगाचा प्रकाश आहे; आणि डाव्याबाजूला हिरव्या रंगाचा प्रकाश आहे. तो हे शिकत आहे. ठीक ना? आता, जेव्हा मी सांगेन, त्यावेळी दोन वाळवंटांच्या चित्रांच्या मधल्या बिंदूकडे पाहा. तुम्ही लगेचच का नाही पाहात? (हशा) कृपया प्रकाश वाढवणार का?
तुमच्या प्रतिसादावरून असे वाटते आहे की ती चित्रे आता एक सारखी दिसत नाहीत. खरे ना? (टाळ्या) का? कारण तुमचा मेंदू तीच माहिती पाहतो आहे, ज्यात उजवी बाजू लाल प्रकाशात आणि, आणि डावी बाजू हिरव्या प्रकाशात होती. ते तुमच्यासाठी नवीन "साधारण" बनले.
तर आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की मी हे दोन समान चौरस घेऊन, प्रकाशित किंवा अंधाऱ्या भागात ठेवले तर अंधाऱ्या भागातील चौरस, प्रकाशित भागातील चौरसापेक्षा जास्त फिकट दिसतो. महत्त्वाचे हे नाही की भोवतालचा रंग काळपट किंवा फिकट आहे. महत्त्वाचे हे आहे की काळपट किंवा फिकट रंग भोवताली असण्याचा तुमच्या वागण्यावर पूर्वी काय परिणाम झाला आहे.
मी तुम्हाला दाखवतो मला काय म्हणायचे आहे. येथे आपल्याकडे आहे अगदी तोच दृष्टिभ्रम. आपल्याकडे आहेत दोन एकसारख्या फरशा, डावीकडे, भोवताली अंधार असलेली, आणि एक प्रकाशात. आणि तशाच उजवीकडे. आता, मी परत त्या देखाव्याकडे पाहणार आहे. पण त्या डब्यांतील काहीही मी बदलणार नाही, पण त्यांचा अर्थ बदलेन. आणि पाहा काय होते तुमच्या आकलनशक्तीला.
नोंद करा की डावीकडे दोन्ही फरशा एकमेकीच्या एकदम विरुद्ध दिसतायत: एक अगदी पांढरी आणि एक अगदी काळी. ठीक आहे? पण, उजवीकडे, दोन्ही फरशा एकसारख्याच दिसतायत. जरी त्यातील एकीच्या भोवताली अंधार आहे आणि एकीच्या भोवताली प्रकाश. का? कारण सावलीतील ती फरशी जर खरोखर सावलीत असेल, आणि जर तेवढाच प्रकाश तुमच्या डोळ्यांकडे परावर्तित करत असेल जेवढा सावली बाहेरील फरशी करते, तर ती जास्त परावर्तनशील असली पाहिजे -- भौतिकशास्त्रातल एक नियम. म्हणूनच तुम्हाला ती तशी दिसते.
पण उजवीकडे माहिती एकसारखीच आहे, कारण दोन्ही फरशा समान प्रकाशाखाली आहेत. जर समप्रकाशित फरशा समान प्रमाणात प्रकाश परावर्तित करत असतील तर तुमच्या डोळ्यांसाठी, त्या समान परावर्तनशील असल्या पाहिजेत. म्हणून तुम्हाला त्या तशा दिसतात. याचा अर्थ असा की आपण ही माहिती एकत्र आणून अशक्य ताकदीचे भ्रम तयार करू शकतो.
हा एक मी काही वर्षांपूर्वी केला. आणि तुम्हाला एक गडद तपकिरी रंगाची फरशी वरच्याबाजूला दिसेल, आणि एक प्रकाशमान नारिंगी बाजूला. ते आपण आकलन केलेले सत्य आहे. भौतिक सत्य हे आहे की दोन्ही फरशा एकसारख्याच आहेत.
येथे डावीकडे तुम्हाला दिसतायत ४ करड्या फरशा, आणि सात करड्या फरशा उजवीकडे. मी त्या फरशा जराही बदलणार नाही आहे. पण मी बाकीचे चित्र तुमच्यासमोर उघड करणार आहे. आणि पाहा काय होते तुमच्या आकलनाला. डावीकडील चार निळ्या फरशा करडया आहेत. उजवीकडील सात पिवळ्या फरशाही करड्या आहेत. त्या एकसारख्याच आहेत. ठीक? माझ्यावर विश्वास नाही बसत? आपण परत पाहू.
जे रंगांबद्दल खरे आहे ते हालचालींसारख्या क्लिष्ट गोष्टींच्या आकलनाबाबतही खरे आहे. तर इथे आपल्याकडे आहे -- आपण हे फिरवू -- एक हिऱ्याचा सांगाडा. आणि मी काय करणार आहे -- मी इथे धरणार आहे, आणि मी तो फिरवणार आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी तो बहुधा या दिशेला फिरत असलेला दिसेल. आता त्याकडे पाहत राहा. तुमचे डोळे थोडे बाजूला न्या, एक डोळा मिटा किंवा उघडझाप करा. आणि एकदम ते बदलेल आणि दुसऱ्या दिशेला फिरताना दिसेल. कोणाला तसे दिसले असले तर हात वर करा. उघडझाप करत राहा. प्रत्येक वेळी दिशा बदलेल. बरोबर? जर मी तुम्हाला विचारले की कोणत्या दिशेला फिरत आहे? तुम्हाला कसे कळेल? तुमच्या मेंदूला माहिती नाही कारण दोन्ही दिशांना फिरणे शक्य आहे. म्हणून पाहण्याच्या पद्धतीनुसार दिशा बदलते दोन शक्यतांमध्ये.
फक्त आपल्यालाच भ्रम होतात का? त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. सुंदर भुंगाही, ज्याच्या मेंदूत फक्त दशलक्ष पेशी आहेत, म्हणजे तुमच्या डोळ्यांतील पेशींपेक्षा २५० पटीने कमी, भ्रम पाहतो, आणि अती क्लिष्ट गोष्टी करतो ज्या आपले नवीनतम संगणकही करू शकत नाहीत. म्हणून माझ्या प्रयोगशाळेत, आम्ही भुंग्यावरच काम करतो. कारण आम्ही त्यांच्या संपुर्ण अनुभवावर नियंत्रण ठेवू शकतो, आणी त्याचा त्यांच्या मेंदूच्या रचनेवर काय परिणाम होतो याचे निरीक्षण करतो. आणि आम्ही हे करतो 'बी मॅट्रीक्स' मध्ये.
आणि इथे आहे पोळे. तुम्ही राणी माशी पाहू शकता, मध्ये बसलेली मोठी माशी. ती अंडी आणि बाकीच्या माश्या तिच्या मुली. आणि त्या ये-जा करत असतात पोळ्यापासून ते मध्यभागापर्यंत, या नळीद्वारे . आणि तुम्ही पाहाल एक माशी बाहेर येईल. तुम्ही पाहाल की कशी तिच्यावर एक क्रमांक आहे? हां, आणखी एक बाहेर येत आहे. तिच्यावर दुसरा एक क्रमांक आहे. आता, त्या तशा जन्मलेल्या नव्हत्या. बरोबर ना? आम्ही त्यांना बाहेर काढतो, फ्रिजमध्ये ठेवतो, आणि त्या झोपतात. आणि आम्ही चांगल्या डिंकाने क्रमांक त्यांच्यावर चिकटवतो. (हशा)
आणि या प्रयोगात त्या निळ्या फुलांकडे गेल्यातर त्यांना बक्षिस मिळते. त्या फुलांवर बसतात. त्यांची जीभ(डंख) आत घालतात, ज्याला 'proboscis' असे म्हणतात, आणि त्यातील साखरेचे पाणी पितात. आता ती पाणी पिते आहे एका पेल्यातून जो आपल्यासाठी तेवढाच मोठा असेल, तसे तीन वेळा करेल आणि उडेल. आणि काहीवेळा त्या निळ्या फुलांकडे दुर्लक्ष करण्यास शिकतात, पण जेथे दुसऱ्या माशा जातील तेथे जातात. म्हणजे त्या एकमेकींची नक्कल करतात. त्या पाच पर्यंत मोजू शकतात. त्यांना चेहरे कळतात. आणि येथे ती शिडीवरून खाली आली. ती पोळ्यात येईल आणि मधाचे रिकामे भांडे शोधेल, आणि ओकेल, आणि तो असेल मध. (हशा)
आता लक्षात ठेवा -- (हशा) -- तिच्याकडून निळ्या फुलांकडे जाण्याची अपेक्षा आहे. पण या वरील बाजूला उजवीकडे माशा काय करतायत? असे दिसतेय की त्या हिरव्या फुलांकडे जातायत. आता, त्यांच्याकडून काही चुक होती आहे का? त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. ती निळी फुले आहेत. पण आहेत हिरव्या रंगाच्या प्रकाशाखाली. म्हणजे त्या रंगांतील संबंधांचा उपयोग कोडे सोडवायला करत आहेत. अगदी जसा आपण करतो तसाच.
म्हणजे, भ्रम बऱ्याचदा, विशेषतः कलेमध्ये, एका जास्त समकालीन कलाकराच्या शब्दांत, "आपल्या संवेदनांची नाजूकपणा दाखवतात." हां, त्याला काहीच अर्थ नाही. संवेदन नाजूक नाहीत. आणि तश्या असत्या तर आपण येथे नसतो. उलट रंग आपल्याला संपुर्ण वेगळी अशी ही गोष्ट सांगतात की, मेंदू जगाचे खरे रूप पाहण्यास उत्क्रांत झालेला नाही. आपण पाहू शकत नाही. त्याऐवजी मेंदू उत्क्रांत झाला आहे जग असे पाहण्यासाठी की ज्या पद्धतीने पाहणे पूर्वी उपयुक्त झाले होते. आणि आपण पाहतो साधारणपणाची नेहमी नव्याने व्याख्या करत.
तर आपण ही मेंदूची असाधारण रूप बदलण्याची शक्ती आणि लोकांना जग वेगळ्या पद्धतीने दाखवण्याची क्षमता कशा पद्धतीने समजून घ्यायची? एक पद्धत जी आम्ही आमच्या प्रयोगशाळेत आणि स्टुडियोमध्ये वापरतो ती म्हणजे प्रकाशाचे ध्वनीत रूपांतर आम्ही लोकांना त्यांचे दृष्य जग ऐकवतो. आणि ते कान वापरून जगातून विहार करू शकतात.
येथे आहेत डेव्हीड, उजवीकडे. आणि त्यांनी एक कॅमेरा पकडला आहे. डावीकडे कॅमेऱ्यातील दृष्य दिसत आहे. आणि त्या चित्रावरून फिरताना तुम्हाला एक फिकटशी रेषा दिसेल. ती रेषा ३२ चौरसांत विभागली आहे. प्रत्येक चौरसात आम्ही मोजतो सरासरी रंग. आणि तो एकदम सोप्यापद्धतीने आवाजात बदलतो. आणि आता ते फिरणार आहेत डोळे बंद करून, आणि जमिनीवरची ताटली शोधणार आहेत.
त्यांना ती मिळाली. आहे ना अफलातून? तर यातून आपल्याला दृष्टिदोष असलेल्यांसाठी कृत्रिम अवयव तर तयार करता येतातच, पण आपल्याला लोक जगाचे आकलन कसे करतात याचाही अभ्यास करता येतो. पण आपण आणखीही काही करू शकतो. आपण रंगांतून संगीत तयार करू शकतो. तर मुलांबरोबर काम करताना, त्यांनी काही चित्रे तयार केली, असा विचार करून जर ही चित्रे ऐकता आली तर कशी वाटतील. आणि आम्ही त्या चित्रांचे ध्वनीत भाषांतर केले. आणि हे त्यापैकी एक चित्र आहे. आणि हा आहे सहा वर्षांचा मुलगा संगीत रचताना ३२ वाद्यांच्या ऑर्केस्ट्रासाठी. आणि ते असे ऐकू येते. ♫ तर, फक्त सहा वर्षाचा मुलगा. ठीक?
आता, या सर्वाचा अर्थ काय आहे? हे असे सुचविते की निसर्गाला बाहेरचा असा कोणी निरीक्षक नाही आहे. आपली व्याख्या आपल्या केंद्रीय गुणधर्मांवरून नाही, तर आपल्याला घडवणाऱ्या छोट्या छोट्या गुणधर्मांवरून बनते. आपली व्याख्या बनते आपल्या पर्यावरणावरून आणि आपल्या पर्यावरणाशी होणाऱ्या वागणुकीवरून -- म्हणजेच आपल्या पारिस्थितीकीवरून. आणि पारिस्थितीकी ही सापेक्ष, ऐतिहासिक आणि व्यवहारिकच असते. म्हणून मला हि इथली गोष्ट सांगून हे भाषण संपवायचे आहे. कारण मी जे करतो तो म्हणजे अनिश्चिततेचा सोहळा असतो. कारण मला वाटते की अनिश्चिततेतूनच आपल्या जग समजण्याची शक्ती मिळते.
तर, तुम्हाला थोडी जरी निश्चिती जाणवत असेल, मला हे करायला आवडेल, आपण जरा प्रकाश कमी केला तर, आणि येथे आहे -- तुम्हा सर्वांना २५ जांभळे पृष्ठभाग दिसतायत का, तुमच्या डाव्या बाजूला? आणि २५ पिवळसर पृष्ठभाग तुमच्या उजव्या बाजूला? मला असे करायचे आहे की: मी मधले ९ पृष्ठभाग पिवळ्या प्रकाशात ठेवणार आहे त्यांच्या मागे एक पारदर्शक पडदा ठेऊन. ठीक आहे. आता तुम्हाला दिसेल की त्यामुळे तेथून येणारा प्रकाश बदलला. बरोबर? कारण प्रकाश आता पिवळ्या पारदर्शकातून आणि नंतर जांभळ्या पारदर्शकातून येत आहे. मी याच्या बरोबर उलटे, डाव्याबाजूला करणार आहे. मधले ९ जांभळसर प्रकाशाखाली ठेवणार आहे.
आता, तुमच्यातील काही जणांनी नोंद केली असेल, उजवीकडील मधल्या ९ पृष्ठभागावरून येणारा प्रकाश किंवा तुमच्या डाव्या बाजूकडील हा डावीकडील मधल्या ९ पृष्ठभागावरून येणारा प्रकाश हा अगदी एकसारखाच आहे मान्य ना? हो? ठीक. तर ते भौतिक दृष्ट्या एक सारखेच आहेत. आता आपण उघड करू. लक्षात ठेवा, मधले ९ अगदी एकच आहेत. पण ते एक सारखे दिसतायत का? नाही. प्रश्न हा आहे की, "तो एक भ्रम आहे का?" आणि त्या प्रश्नाने मी तुमची रजा घेतो. अनेक धन्यवाद. (टाळ्या)
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
बो लोटो यांचे रंगीत खेळ तुमच्या नजरेला कोड्यात टाकतात, पण ते "तुमचा मेंदू काम कसा करतो" यावरही प्रकाश टाकतात. तुमच्या अष्टपैलू दृष्टीचे हे मजेदार दर्शन तुम्हाला तुमच्या सत्याच्या आकलनक्षमतेवर उत्क्रांतीने केलेला परिणाम दाखवून देईल.
Beau Lotto is founder of Lottolab, a hybrid art studio and science lab. With glowing, interactive sculpture -- and old-fashioned peer-reviewed research--he's illuminating the mysteries of the brain's visual system. Full bio »
Translated into Marathi by Pratik Dixit
Reviewed by Abhishek Payal
Comments? Please email the translators above.
14:33 Posted: Apr 2007
Views 896,571 | Comments 80
19:49 Posted: Jul 2008
Views 4,340,910 | Comments 503
21:48 Posted: Apr 2007
Views 1,295,561 | Comments 337
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.