मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, - एक संदेश - हजारो लोकांकडून, खेडयातल्या आणि झोपडपट्टीतल्या ज्यांनी या देशातल्या दूर्गम भागात अवघड प्रश्न सोडवले आहेत केवळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, बाहेरून कुठल्याही प्रकारची मदत न घेता. काही आठवड्यापूर्वी जेव्हा आपल्या गृहमंत्र्यांनी एक तृतियांश भारताबरोबर युद्ध पुकारले तेव्हा त्यांनी सांगितले जवळजवळ २०० जिल्ह्यांत कायदा सुव्यवस्था राखणे शक्य नाही. (वरील वाक्याचा संदर्भ मूळ भाषण करणाऱ्याने दिलेला नाही) तेव्हा त्यांच्या हातून एक मुद्दा निसटला. जो मुद्दा आम्ही गेली २१ वर्षे नेहमी मांडत आलो आहे. हा मुद्दा की लोक अर्थिक दृष्टिने गरीब असतील, पण ते बुद्धीने गरीब नाहीत. दुस-या शब्दांत सांगायचे तर, आर्थिकदृष्ट्या गरिबी रेखेवर असलेली मनें (माणसे) ही बौद्धिकदृष्ट्या गरीब नसतात (असतीलच असे नाही). हा संदेश घेऊन आम्ही ३१ वर्षापूर्वी सुरुवात केली आणि त्यामुळे काय झाले?
मी आता माझी जीवनयात्रा तुम्हाला थोडक्यात सांगतो, ज्या यात्रेने मला या मुद्द्यापर्यंत पोचवले आहे. १९८५ ते १९८६ मध्ये मी बांग्लादेशमध्ये तिथल्या सरकार आणी संशोधन संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी होतो. शास्त्रज्ञ लोकांना गरीब लोकांच्या जमिनीवर काम करण्यास कशी मदत करावी आणि त्यातून लोकांच्या ज्ञानावर आधारित नविन संशोधन तंत्रज्ञानाचा विकास कसा करावा ह्यावर मी मार्गदर्शन केले. मी १९८६ मध्ये (भारतात) परत आलो. तिथल्या ज्ञानामुळे आणि त्या देशात मला सापडलेल्या प्रतिभेमुळे माझ्यात प्रचंड उत्साह संचारला होता. जिथे ६० टक्के भूमिहीनता आहे, पण आश्चर्यकारक सर्जनशीलता आहे. (मग) मी माझ्या कामाचा विचार करू लागलो. जे काम मी गेल्या १० वर्षांत केले होते, आणि जवळजवळ प्रत्येक वेळी, त्यात असे ज्ञानांश होते जे इतर लोकांकडून आलेले होते.
मला सल्लागार म्हणून डॉलर्समध्ये पैसे मिळत होते, आणि मी माझ्या आयकर परतावा (रिटर्नवर) पाहिले आणि स्वत:लाच विचारले:"यातली ती ओळ कुठे आहे, जी अशा लोकांकडे गेलेले पैसे दाखवते, ज्यांच्या ज्ञानामुळे हे शक्य झाले आहे?" मी जास्त शहाणा आहे म्हणून मला हे बक्षीस मिळत आहे, की मी फार चांगले लिहीतो म्हणून ? का मी फार व्यवस्थित मुद्दे मांडतो म्हणून? का मी माहिती फार काटेकोर विश्लेषण करू शकतो म्हणून? का मी प्राध्यापक आहे म्हणून, मला समाजाकडून हे बक्षीस मिळते आहे? मी मलाच समजावयाचा प्रयत्न केला, "नाही, नाही, मी धोरण बदलांसाठी प्रयत्न केला आहे, असं पहा, म्हणजे सामाजिक धोरण जे गरीबांच्या गरजा भागवणारे बनेल, आणि सगळं काही ठीक चालू आहे अशी मी माझी समजूत घातली. पण प्रत्यक्षात मला असे आढळले की इतकी वर्षे मी लोकांची फसवणूक/शोषण करतच काम करत आहे. जशी फसवणूक/शोषण जमिनदारांकडून, सावकार आणि मध्यास्थांकडून होत असते ती बघितल्यावर मला असे जाणवले की मी सुद्धा एक प्रकारे अशीच फसवणूक/शोषण करत आहे. कारण माझ्या आयकर परतावा (रिटर्नवर) अशी कुठलीही ओळ नाही जी असे उत्पन्न दाखवते जे लोकांच्या हुशारीने मिळाले आहे, त्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पण त्यांना त्यातून काहीच मिळाले नाही. एवढेच नाही तर त्यावेळी माझे बरेचसे काम इंग्लिश भाषेत होते.
ज्या लोकांकडून मी शिकलो त्यातल्या ब-याच जणांना इंग्लिश येत नव्हते, तर मग मी कुठल्या पद्धतीने योगदान करीत होतो? मी सामाजिक न्यायाबद्दल बोलत होतो, आणि इथे मी धंदेवाईक होतो जो अन्याय करत होता, अन्याय लोकांकडून ज्ञान घेऊन त्यांना अनामिक बनवण्याचा, आणि त्यातून स्वतः मात्र उत्पन्न मिळवायचा ते पसरवून, सल्लागार म्हणून, शोधनिबंधांतून आणि वर्तमानपत्रांतून छापून, अभ्यास परिषदांची आमंत्रणे मिळवून, सल्लागारपदे मिळवून आणि विविध प्रकारे आणि मग माझ्या मनात द्वंद्व उभारले, जर मीही फसवा असेन तर हे बरोबर नाही; जीवन असे चालू शकत नाही. आणि तो क्षण अतिशय दुःखदायक आणि धक्कादायक होता. कारण मी तसाच राहू शकलो नसतो. म्हणून मी परिक्षण केले, संशोधनाचे १०० पर्यंत शोधनिबंध लिहिले, वाचले. आणि या अनुमानावर येऊन पोचलो की, जरी मनातील द्विधा परिस्थिती नवीन नव्हती, तरी त्यावरचे उत्तर नवीन हवे आहे.
आणि एक दिवशी -- काय झाले कोणास ठाऊक -- कचेरीतून घरी येताना, बहुतेक मी मधमाशी पाहिली, किंवा माझ्या मनात असे आले की मी जर ह्या मधमाशीसारखा झालो, तर जीवन एकदम जादूमयी होईल. मधमाशी काय करते, तर ती परागण करते, आणि मध गोळा करते, आणि दुसऱ्या फुलाचे परागण करते. आणि जेंव्हा ती मध घेते, तेव्हा फुलांना फसवणूक झाल्याचे वाटत नाही. खरं तर फुलंच मधमाश्यांना आपल्याकडे आकर्षित करतात, आपल्या रंगांच्या माध्यमातून. आणि मधमाश्या सगळा मध स्वतःकडे ठेवत नाहीत. आणि हीच हनी बी नेटवर्कची मार्गदर्शक तत्वे आहेत -- की जेंव्हाजेंव्हा आपण लोकांकडून काही शिकतो ते त्यांच्याच भाषेत परत पसरवले पाहिजे. आणि ते लोक अनामिक राहता कामा नयेत.
आणि मला हे सांगावे लागेल की २० वर्षांनंतर सुद्धा, ह्या व्यवसायाच्या पद्धतीमध्ये मी एक टक्का सुद्धा बदल घडवू शकलेलो नाही आहे. हे कटू सत्य अजूनही तसेच आहे, आणि मला वाटते की तुम्हालाही हे ऐकून दुःख होईल, की या व्यवसायात लोकांचे नाव न देता त्यांना अनामिक बनवून त्यांचे ज्ञान छापणे मान्य आहे. युएस नॅशनल अकॅडमीच्या, किंवा रिसर्च कौन्सिल ऑफ युकेच्या किंवा भारतीय शास्त्रीय अनुसंधान परिषदेच्या संशोधन मार्गदर्शक तत्त्वांत अशी कोठेही गरज नाही की जे लोकांकडून तुम्ही शिकाल ते परत त्यांच्याबरोबर वाटले पाहिजे. आपण एका जबाबदार समाजाबद्दल बोलत आहोत, असा समाज जो खरा आणि न्यायी आहे. आणि ज्ञानाच्या बाजाराला आपण न्याय देतच नाही. आणि भारताला ज्ञानावर आधारित समाज हवा आहे. तो ज्ञानाधारित समाज अशा रितीने कसा बनेल? म्हणुन, खरतर, तुमच्याकडे न्यायाची दोन तत्त्वे असुन चालणार नाही, एक स्वतःसाठी आणि एक दुसर्यांसाठी. ते सर्वांसाठी एकच असले पाहिजे. तुम्ही भेदभाव करू शकत नाही. तुम्ही तुमची स्वतःची वेगळी बाजू घेऊ शकत नाही, जी तुम्ही मांडत असलेल्या तत्वांपासून दूर आहे. म्हणुन दोन लोकांसाठी वेगवेगळा न्याय असू शकत नाही.
या चित्राकडे पाहा. हे कोठे घेतले आहे सांगू शकाल का, आणि कशासाठी घेतले आहे? मी प्राध्यापक आहे; मी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. कोणी आहे? काही कल्पना? माफ करा?? (प्रेक्षक : राजस्थान) पण हे कशासाठी वापरले आहे ? (कुजबुज) माफ करा?? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही एकदम बरोबर आहात, यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण या माणसाला माहिती आहे आमचे सरकार किती निर्दयी आहे ते. हे पाहा. हे संकेतस्थळ आहे भारत सरकारचे. हे प्रवाश्यांना बोलावते, आमच्या देशातील लाजिरवाणी परिस्थिती पाहण्यासाठी. मला हे सांगताना वाईट वाटत आहे. आता हे सुंदर चित्र आहे -- की खराब चित्र आहे? हे तुम्ही लोकांच्या जीवनाकडे कसे पाहता त्यावर अवलंबून आहे. जर ह्या स्त्रीला मैलोन्मैल डोक्यावरून पाणी घेऊन जावे लागत असेल, तर तुम्ही ते चित्र आनंदी आहे असे म्हणू शकत नाही. आपण त्यासाठी काहीतरी केले पाहिजे. आणि मला हेही सांगूदे. आपल्या हातात शास्त्र आणि तंत्रज्ञान असुनही लाखो महिला अजुनही डोक्यावरून पाणी वाहतात. आणि आपण हा प्रश्न विचारत नाही (किंवा त्याचा विचारही करत नाही).
तुम्ही सकाळी चहा घेतला असेल. एक मिनीट विचार करा. चहाची पाने झाडावरून खुडतात. ते कसे करतात ठाऊक आहे तुम्हाला : ती महिला काही पाने खुडते आणि मागच्या बुट्टीत टाकते. असे फक्त दहावेळा करा; (आणी) तुम्हाला या खांद्यातले दुखणे कळेल. आणि ती हे काही हजार वेळा करते - ते ही दररोज. तुम्ही जेवणात जो भात खाल्ला आणि जो आज तुम्ही खाल, तो लाखो महिलांनी विचीत्र पद्धतीने वाकून, आणि त्यांचे पाय पाण्यात बुडवून पेरलेला असतो. जेंव्हा अशाप्रकारे त्या भाताची पेरणी करतात तेव्हा पाय सतत पाण्यात असल्याने त्यांच्या पायावर बुरशी येते, रोग संक्रमण / जखम होते, आणि ते दुखते, कारण त्याठिकाणी किडे चावतात. आणि प्रत्येक वर्षी, ९९.९ टक्के भाताची पेरणी माणसांकडून होते. कोणतेही यंत्र त्यासाठी विकसित झालेले नाही.
आणि शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञांच्या, सार्वजनिक नीतिकारांच्या ह्या विषयातील निश्क्रीयतेकडे आमचे लक्ष वळले. हे असे चालणार नाही, चालणार नाही, समाज अशा पद्धतीने चालू शकत नाही. आणि ह्याची आम्हाला कल्पना आहे की आमची संसद हे करणार नाही आमच्याकडे रोजगार योजना आहे - 25 कोटी लोकांना १०० दिवसांसाठी नोकरी या महान देशात दिली जाते, कशासाठी? तर दगड तोडण्यासाठी, जमिन खणण्यासाठी. म्हणुन आम्ही संसदेत प्रश्न विचारला, की गरीबांना डोकी आहेत की नाहीत? की त्यांना फक्त पाय, हात आणि तोंडे आहेत पण डोकी नाहीत?
म्हणुन हनी बी नेटवर्क अशा साधनांवर बांधली आहे ज्यात गरीब ही श्रीमंत आहेत. आणि काय झाले? अनामिक, चेहरा नसलेला, नाव नसलेला माणूस अशा जाळ्यात, अर्थात इतर लोकांच्या, संपर्कात येतो आणि त्याला स्वत:चे अस्तित्व, ओळख मिळते. हनी बी नेटवर्क म्हणजे हेच आहे. आणि हे जाळे (नेटवर्क) आपोआप वाढले, आणि अजुनही स्वयंसेवी पद्धतीनेच चालते. आणि लाखो लोकांच्या मनांना (कल्पनांना) जोडण्याचा प्रयत्न करते, ज्यात आपल्या देशातील आणि बाहेरील प्रतिभावंत / सर्जनशील लोक आहेत. ते शिक्षणाच्या बाबतीत प्रतिभावंत / सर्जनशील असतील; किंवा संस्कृतीच्या बाबतीत; किंवा संस्थांच्या बाबतीत, पण आमचे जास्तितजास्त काम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आहे, नविन शोधांसंबंधात, एकतर समकालीन शोधांबाबत, किंवा पारंपरिक ज्ञानाबद्दल. आणि हे सारे सुरू होते कुतूहुलापोटी, जिज्ञासेपोटी. सारे काही जिज्ञासेपासूनच सुरु होते
हा आम्हाला भेटलेला मनुष्य, आणि हे तुम्ही संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकाल, सोशिदोतो आरजी, हा आदिवासी माणूस, ह्याची एक इच्छा होती. आणि तो म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण झालीतर" -- कोणीतरी आजारी होते आणि हा काळजी घेत होता -- "देवा, याला कृपया बरे कर. आणि तू जर याला बरे केलेस, तर माझी भिंत मी रंगवेन." आणि अशी त्याने ती रंगवून घेतली. कोणीतरी काल मास्लोवियन श्रेणीरचने बद्दल बोलत होते. गरजांच्या मास्लोवियन श्रेणीरचनेपेक्षा दुसरे काही चुकीचे असूच शकत नाही कारण या देशातील गरीब लोकांनाही उद्बोधन होऊ शकतो. कबीर , रहिम, सगळे महान सुफी संत, हे सगळे लोक गरीब होते, आणि ह्यांच्याकडे महान तर्कशक्ती होती. कृपा करून असा जराही विचार करू नका की फक्त तुमच्या शारीरिक व इतर गरजा भागवल्यावर तुम्ही तर्क शक्तीच्या आध्यात्मिक गरजा भागवण्याचा विचार करू शकता कुठलाही कोणताही माणूस यशप्राप्तीचे शिखर गाठण्यास सक्षम असतो काहीतरी करायचेच या आपल्या मनाच्या निश्चयाच्या आधारे.
हे पाहा हे आम्ही पाहिले आमच्या शोध यात्रेमध्ये. सहा महिन्यातून एकदा आम्ही देशाच्या विविध भागातून फिरतो. मी गेल्या १२ वर्षांत अंदाजे ४००० किमी चाललो आहे. तर जाता जाता आम्हाला शेणाच्या गोवरी दिसल्या. त्या इंधन म्हणून वापरल्या जातात. ह्या स्त्रीने शेणाच्या गोवरीच्या ढिगाच्या भिंतीवर, हे चित्र रंगवले आहे. त्या एकाच जागेवर ती तिची प्रतिभा / सर्जनशीलता दाखवु शकते. आणि ती इतकी अफलातून आहे. या स्त्रीकडे पाहा, राम तिमारी देवी, धान्याच्या कोठीवर चंपारण्यात, आमची एक सभा होती आणि आम्ही अशा भागात चालत होतो जेथे गांधीजी नीळ कामगारांचे दुःख ऐकण्यासाठी गेले होते. बंकुराच्या पुरूलियामधील भाभी महातो यानी पाहा काय केले आहे. सगळी भिंत त्यांचा चित्रफलक आहे आणि त्या झाडू बरोबर तेथे बसल्या आहेत. त्या कलाकार आहेत की कलावंत ? स्पष्टपणे त्या कलावंत आहेत; एक प्रतिभावंत / सर्जनशील व्यक्ती. जर आपण यासाठी बाजारपेठ तयार करू शकलो, तर त्यांना खोदकाम किंवा खडीफोड करावी लागणार नाही. ज्या गोष्टीत ते चांगले आहेत त्यातून त्यांना पैसे मिळतील, ज्यात चांगले नाहीत त्यातून नाही (टाळ्या)
आता बघुयात रोजादिन यांनी काय केले आहे. मोतीहारी चंपारण्यात बरेच लोक टपरीवर चहा विकतात आणि चहाची बाजरपेठ मर्यादित आहे, प्रत्येक दिवशी सकाळी तुम्ही चहा कॉफी घेता. तर त्यांनी विचार केला, आपण प्रेशर कुकरचे कॉफी मशीन का नाही बनवायचे? हे आहे ते कॉफी मशीन - काही शेकडा रुपयात तयार झालेले. लोक त्यांचा स्वतःचा कुकर आणतात, ते त्याला झडप आणि वाफेची नळी लावतात, आणि तुम्हाला मिळते एस्प्रेसो कॉफी आता हे खरे, परवडणारे कॉफी मशीन जे गॅसवर चालते. (टाळ्या) आता पाहा शेख जहांगीर यांनी काय केले आहे. बऱ्याच गरीब लोकांकडे दळण्यासाठी पुरेसे धान्य नसते. म्हणून हा माणूस पिठाची गिरणी दुचाकीवरून त्यांच्या घरापर्यंत नेतो जर तुमच्याकडे अर्धा किलो, एक किलो धान्य असेल तर हे ते दळून देतील; सामान्य गिरणीवाला ते देणार नाही.
कृपया गरीब लोकांचे प्रश्न लक्षात घ्या. त्यांच्या ही गरजा आहेत ज्या कार्यक्षमतेने सोडवल्या पाहिजेत उर्जा , किंमत आणि दर्जा यांच्या अनुषंगाने त्यांना द्वितीय श्रेणीचे आणि द्वितीय दर्जाचे उत्पादन नको पण त्यांना चांगला दर्जाचा माल देण्यासाठी .तंत्रज्ञान त्यांच्या गरजांच्या अनुरूप बदलले पाहिजे आणी तेच शेख जहांगीर यांनी केले. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. हे पाहा त्यांनी येथे काय केले. जर तुमच्याकडे मळके कपडे असतील पण धुण्यास वेळ नसेल, तर त्यानी लोकांच्या दरवाजात एका दुचाकीवरून कपडे धुण्याचे यंत्र आणले. हा बघा त्याचा एक नमुना दुचाकीवरून आणलेले कपडे धुण्याचे यंत्र.. ते तुमचे कपडे तुमच्या दारात कपडे धुतात आणि वाळवतात. (टाळ्या) तुम्ही तुमचे पाणी आणी साबण घेऊन यायचा आणि तुमचे कपडे ५० पैसे किंवा १ रुपया मध्ये धुवून दिले जातात. आणि व्यवसायाचा एक नवीन मार्ग निर्माण होतो आता आपल्याला गरज आहे, ती याचा विस्तार करू शकणारया लोकांची.
हे पाहा, हे एका सुंदर छायाचित्रासारखे दिसते आहे. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे? कोणी सांगू शकेल? भारतातील कुणीही ओळखेल हा एक तवा आहे. हा मातीपासून तयार केलेला आहे. आणि, यात सुंदरता कशात आहे? तुमच्याकडील एका निर्लेप तव्याची किंमत साधारणपणे जवळजवळ २५० रू, पाच किंवा सहा डॉलर पण याची आहे एक डॉलर पेक्षाही कमी आणि हा निर्लेप अथवा न-चिकटणारा आहे. ह्यावर काही खाण्यायोग्य पदार्थांचे आवरण दिलेले आहे आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा महागडा निर्लेप तवा वापरता तेव्हा तुम्ही टेफ्लोन किंवा टेफ्लोन सदृश वस्तू खाता. कारण काही काळाने ते नाहीसे होते . ते कुठे जाते? तर तुमच्या पोटात. ज्यासाठी ते नव्हते पण इथे या मातीच्या तव्यातून तुमच्या पोटात ते कधीच जाणार नाही म्हणून हे अधिक चांगले आणि सुरक्षित आहे हे परवडणारे आणि उर्जेची बचत करणारे आहे दुसरया शब्दात सांगायचे तर, गरिबांनी शोधलेले उपाय दुय्यम दर्जाचे, दुर्बोध, कामचलाऊ असायची गरज नाही
पण ते अधिक चांगले , कार्यक्षम असावेत . परवडणारे असावेत . आणि मनसुखभाई प्रजापतीनी हेच केले आहे त्यांनी तव्याला एक मूठ बसविली आणि आता फक्त एक डॉलरला तुम्हाला परवडणारा चांगला पर्याय बाजारपेठेला दिला . ही महिला. तिने विकसित केले एक कीटक नाशक औषध बनविण्याचे यंत्र आम्ही तिच्यसाठी विशेषाधिकारा साठी (पेटंट) राष्ट्रीय संशोधन न्यास प्रतिष्ठान संस्थेमध्ये अर्ज आखल केला आहे. आणि कुणास ठाऊक, कुणीतरी या शोधाचा परवाना घेईल आणि विकसित करेल एक विक्रीयोग्य उत्पादन आणि त्या महिलेला उत्पन्न मिळेल. आता मला एक सांगू द्या मला वाटते कि आपल्याला बहुकेंद्रीय विकसनाच्या प्रकल्पाची गरज आहे जिथे मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन देशातील अनेक ठिकाणांचे आणि जगभरातील (संशोधक) स्थानिकांच्या गरजांवर अतिशय कार्यक्षम आणि परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या पद्धतीने उपाय शोधतील. उपाय जितके स्थानिक परिस्थितीला योग्य असतात, तितकेच ते सर्वसमावेशक वाढीसाठी अनुकूल नसतात.
उत्पादनवाढीच्या वेळी स्थानिक लोकांच्या गरजा विचारात घेतल्या जात नाहीत आणि ही तडजोड केली जाते. आणि मग ग्राहक ही तडजोड का स्वीकारतो? उत्पादन वाढवता येते आणि वाढवले गेलेही आहे उदाहरणार्थ , मोबाईल फोन आपल्या देशात ४० कोटी मोबाईल फोन आहेत आता हे शक्य आहे कि मी मोबाईल फोनची फक्त दोनच बटणे आणि फक्त तीनच सुविधांचा वापर करतो पण त्यात असतात ३०० सुविधा आणि पर्याय. मी वापरतो तीन गोष्टी पण पैसे देतो तीनशेचे. पण मी हे स्वीकारतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर (उत्पादन) वाढवता येते पण मला जर गरजे पुरते हवे असेल तर अर्थातच वेगळ्या प्रकारचा आराखडा लागेल म्हणून आम्ही असे म्हणतो कि वाढ हि प्रचलित पर्यायांना मारक नसावी. जगात एक उचित वाव असावा स्थानिक लोकांच्या गरजांना सुसंबद्ध उपायांसाठी आणि तरीही वित्त पुरवठा करता आला पाहिजे
आमच्या एका अभ्यासात असे आढळले कि गुंतवणूकदार असे विचारतात की उत्पादन वाढीच्या काय योजना आहेत ? जणू काही समाजाच्या स्थळ आणि काळापुरत्या मर्यादित गरजा आणि ज्या गरजा त्या त्या ठीकाणापुरत्या आहेत, त्या विनामूल्य (अर्थात सुलभ रीतीने) भागवल्या जाण्याचा (समाजाला) कोणताही हक्क नाही. कारण मोठ्या प्रमाणावरील उत्पादनात त्यांचा भाग नाही त्यामुळे एक तर तुम्हाला तुमच्या गरजा मोठया उत्पादन क्षमतेसाठी बदलाव्या लागतात किंवा (व्यवसायातून) बाहेर राहावे लागते. आता एक प्रमुख प्रतिकृती (लाँग टेल) असे दर्शविते कि छोट्या प्रमाणावरील विक्री, उदाराहाराणार्थ बऱ्याच पुस्तकांची पण प्रत्येकी कमी अशी विक्री सुद्धा फायदेशीर होऊ शकते आणि आपण अशी यंत्रणा निर्माण केली पाहिजे कि अनेक जण एकत्र येतील, आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करतील जिथे निरनिराळे शोध स्थानिकांच्या छोट्या समुदायाला उपलब्ध होतील आणि तरीही ते व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर होईल.
हा पहा काय करतोय सैदुला साहेब एक आश्चर्य कारक व्यक्ती आहे. वयाच्या ७० व्या वर्षी ते काहीतरी सर्जनशील काम करत आहेत.
सैदुला साहेब: मी नावेसाठी थांबू शकलो शकलो नाही मला माझ्या प्रेमिकेला भेटायचे होते माझ्या अगतिकतेने मला शोधक संशोधक बनविले प्रेमालाही तंत्रज्ञानाची गरज असते नवीन शोध लावणे हा माझ्या बायकोचा, नूरचा अधिकार आहे नवीन शोध लावणे हे माझ्या आयुष्यातील उत्कटता आहे, माझे तंत्रज्ञान.
सैदुला साहेब आहेत मोतीहारी, चम्पारण मधील एक आश्चर्यकारक व्यक्ती पण ह्या वयातही ते उपजीविकेसाठी सायकल वरून मध विकतात. कारण आम्ही जल-क्रीडा तलाव (चालविणाऱ्या) आणि नगर पालिकेच्या लोकांना ह्याची उपयुक्तता पटवून देऊ शकलो नाही. आणि मुंबई, जिथे काही वर्षापूर्वी पूर आला होता आणि लोकांना पाण्यातून २० किलो मीटर चालावे लागले अशा ठिकाणच्या अग्नीशमन दलाच्या लोकांना आम्ही हे पटवून देऊ शकलो नाही आहोत कि हे बघा तुमच्या अग्नी शामक दलाच्या कार्यालयात अशी दुचाकी हवी जेणे करून तुम्ही गल्ली बोळातून जाऊ शकाल जिथे बस किंवा इतर वाहने जाणार नाहीत पण अजून तरी आम्ही ही समस्या सोडवू शकलो नाही आहोत जेणेकरून हे बचावाचे साधन म्हणून उपलब्ध होईल किंवा पूर्व भारतातील पुराच्या वेळी जेव्हा तुम्हाला निरनिराळ्या बेटांवरील अडकलेल्या लोकांना वस्तू वाटायच्या असतात तेव्हाही याचा वापर होऊ शकतो. या कल्पनेत नक्कीच गुणवत्ता आहे. नक्कीच आहे.
आता बघुयात अप्पाचन ने काय केले. दुर्दैवाने तो आता आपल्यात नाही. पण त्याने एक संदेश मागे ठेवला आहे अतिशय शक्तीशाली संदेश.
अप्पाचन: मी रोज जग जागे होताना पाहतो
असे नाही कि माझ्या डोक्यावर एक नारळ पडला आणि मला ही कल्पना सुचली शिक्षणासाठी पैसे नसताना मी नवीन उंची गाठली आता ते मला स्थानिक स्पायडरमन म्हणतात माझे तंत्रज्ञान
आपल्यापैकी बरेच जण विश्वास ठेवणार नाहीत कि हे उत्पादन आम्ही परदेशात विकले ज्याला मी G2G असे म्हणतो स्थानिक तळापासून ते जगभर (grassroots to global) आणि मासाचूसेट्स विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील एका प्राध्यापिकेने झाडांच्या शेंड्यावरच्या जीव जंतूंच्या वैविध्यतेचा अभ्यास करण्यासठी हे उपकरण विकत घेतले. आणि या उपकरणा मुळे जास्त संख्येने पाम च्या झाडावरचे नमुने घेणे साध्य झाले आहे नाही तर तिला विटांचा ढीग बनवून त्यावर तिच्या संशोधक विद्यार्थ्याना त्यावर चढवावे लागले असते. बघा कि येथे आधुनिक वैज्ञानिक संशोधनातही ह्याचा कसा फायदा होत आहे.
रेम्या जोस ने विकसित केले आहे -- तुम्ही यु ट्यूब वरील 'इंडिया ईनोवेटस (India Innovates)' ह्या ठिकाणी वरील चित्रफिती पाहू शकाल. तर रेम्या ने १० व्या इयत्तेत असताना केलेला एक अविष्कार पाहूयात: एक कपडे धुण्याचे आणि व्यायामाचे यंत्र. श्री खराई जे शरीराने अपंग आहेत आणी उंची फक्त दीड फूट आहे, पण त्यांनी दुचाकीत सुधारणा करून स्वायत्तता साधली आहे आणी स्वतःला इकते तिकडे फिरण्याचे स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले. हा नाविन्यपूर्ण बदल रिओ च्या झोपडपट्टीतला आहे. हे गृहस्थ श्री उबीराजरा, आम्ही आमच्या ब्राझील मधील मित्रांबरोबर बोलत होतो कि ह्या उत्पादनाची ब्राझील आणी चीन मध्ये वाढ कशी करता येईल, आमचे विशेषकरून चीन मध्ये सबळ जाळे (नेटवर्क) आहे तसेच ब्राझील आणि जगातील इतर विकसनशील देशात सुद्धा. हा पुढच्या चाकांवरील सायकल स्टेंड तुम्हाला इतर कुठल्याही सायकलवर दिसणार नाही भारत व चीन मध्ये सर्वात जास्त संख्येने सायकल आहेत पण हे नवीन साधन ब्राझील मध्ये निर्माण झाले
मुद्दा असा कि आपण संकुचित असता कामा नये. आपल्यापैकी कुणीही इतका राष्ट्रवादी नसावा-- असे वाटणारा कि चांगल्या कल्पना फक्त आपल्याच देशात निर्माण होतील तर आपल्यात एक नम्रता असावी, शिकण्यासाठी ते कुठेही असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब लोकांच्या ज्ञानातून सुद्धा मिळू शकते. आणि पहा या दुचाकी सायकलवर आधारित बदलांच्या संपूर्ण व्याप्तीकडे सायकल जी फवारणी (स्प्रे) करते, रस्त्यावरील धक्क्यातून उर्जा निर्माण करते. मला रस्त्यांची स्थिती बदलता येत नाही पण (त्या स्थितीचा वापर करून) मी सायकल जोरात चालवू तर शकतो. हेच कनकदासने केले. आमच्यातील काही जण दक्षिण आफ्रिकेमध्ये चार गोष्टी शिकण्यासाठी आणी शिकवण्यासाठी गेले होते. जेणेकरून नविन शोध आणि अविष्कार ह्यांचा लोकांच्या कष्टदायक जीवनातून मुक्तता करण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे समजून घेण्यासाठी. आणि ही एक गाढव-गाडी आहे ज्यात त्यांनी बदल केले आहेत याला एक आस होता ३० , ४० किलो वजनाचा ज्याचा काहीही उपयोग नव्हता. तो काढून टाका आणि गाडी ओढायला एक गाढव कामे लागेल.
हे चीन मधील उदाहरण , या मुलीला श्वासोश्वासासाठी उपकरण हवे होते खेड्यातील तीन लोक ह्यावर विचार करण्यासाठी एकत्र बसले की, " या मुलीचे आयुष्य कसे लांबवता येईल ?" ते तिचे नातेवाईक नव्हते, पण त्यांनी प्रयत्न केलाह्यावर उपाय शोधण्याचा त्यांनी कपडे धुण्याच्या यंत्राची नळी आणि दुचाकी सायकल ह्याचा वापर करून एक श्वास घेण्यास मदत करणारे यंत्र बनवले. आणि त्यामुळे या मुलीचे प्राण वाचले. तिने सुद्धा हा बदल आनंदाने स्वीकारला.
आपल्याकडे अविष्कारांची व्याप्ती प्रचंड आहे. एक मोटार गाडी संकोचन केलेल्या हवेवर चालते सहा पैसे दर किलो मिटर प्रमाणे आसाम , कनक गोगोई आणि ही गाडी तुम्हाला अमेरिका किंवा युरोप मध्ये दिसणार नाही पण ही भारतात उपलब्ध आहे आता ही महिला पोचमपल्ली साडी साठी सूत गुंडाळत असे एका दिवसात १८००० वेळा तिचे सूत गुंडाळणे चालायचे फक्त दोन साड्या बनवण्यसाठी. तिच्या मुलाने सात वर्षाच्या परिश्रमा नंतर काय केले पहा ती म्हणाली "तू व्यवसाय बदल" तो म्हणाला " शक्य नाही . मला एव्हढीच गोष्ट येते. पण मी एक मशीन बनवू शकतो जे तुझा प्रश्न सोडवेल आणि त्याने हे बनविले - एक शिवण यंत्र. हे उत्तर प्रदेश मध्ये घडले. म्हणून सृष्टी म्हणते "मला उभे राहायची संधी द्या आणि मी जग बदलून दाखवीन"
अजून एक सांगायचे म्हणजे आम्ही लहान मुलांसाठी सुद्धा एक प्रतीभाविकसन आणि सर्जनशीलतेच्या विकासासाठी स्पर्धा घेत आहोत. आम्ही जगभर वस्तू विकल्या आहेत - इथियोपिया , तुर्कस्तान , अमेरिका आणि अनेक ठिकाणी आमचे उत्पादन बाजारपेठेत पोचले आहे. या लोकांच्या ज्ञानातून हे वनौषधीपासून एक्झिमा साठी मलम बनवले आहे. आणि ही संघटना (कंपनी), जिने वनौषधी पासून कीटक नाशक बनविण्याचा परवाना घेतला. तिने शोधकाचे छायाचित्र वेष्टनावर छापले ह्यामुळे जेव्हा जेव्हा हे ग्राहक वापरतो तेव्हा तेव्हा "तुम्ही सुद्धा शोधक होऊ शकता" असे सांगता येते. तुमच्या जवळ काही कल्पना असेल तर आम्हाला सांगा सर्जनशीलता मौलिक आहे, ज्ञान महत्त्वाचे आहे. शोध बदल घडवून आणतो. प्रोत्साहन आणि प्रगती स्फूती निर्माण करते. जे फक्त भौतीकच नाही तर आंतरिक किंवा अध्यात्मिक असते.
You can share this video by copying this HTML to your clipboard and pasting into your blog or web page. This video will play with subtitles.
You either have JavaScript turned off or have an old version of the Adobe Flash Player. To view this rating widget you
need to get the latest Flash player.
If your browser allows only "trusted sites" to execute Javascript, you should add the "googleapis.com" domain to your whitelist to allow our Flash detection to work properly.
Got an idea, question, or debate inspired by this talk? Start a TED Conversation.
अनिल गुप्ता विकसनशील देशातील अपरिचित संशोधकांच्या शोधात आहेत, असे लोक ज्यांची हुशारी गरिबीने झाकली आहे पण ज्याच्यात लोकांचे आयुष्य बदलून टाकण्याची ताकद आहे. ह्या भाषणात ते दाखवून देतात की अशा लोकांना जोडण्यास 'हनी बी नेटवर्क' कसे मदत करते आणि त्यांना सन्मान मिळवून देते.
Anil Gupta created the Honey Bee Network to support grassroots innovators who are rich in knowledge, but not in resources. Full bio »
Translated into Marathi by CHIDANAND PATHAK
Reviewed by Shantanu Pavgi
Comments? Please email the translators above.
17:14 Posted: Dec 2009
Views 477,070 | Comments 136
05:59 Posted: Sep 2009
Views 1,092,932 | Comments 244
Just follow the guidelines outlined under our Creative Commons license.
This comment will be attributed to . Not ? Sign Out.